लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा ठेवा.
५.१२ .२०२३. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा ठेवा.
माझ्या सुज्ञ व जाणत्या वाचक हो, कालच्या लेखात, मी हाच मुद्दा, विचाराधीन घेतला होता, आठवतेय ना? त्याच बरोबर, या संत तुकारामांच्या उक्तिची दुसरी बाजू मांडली होती. वयस्क rather म्हातारपण आल्यावर, ते संत, परत "लहानपण" मागत नाहीत, तर समोर जी लहान मुले आहेत, त्यांचे लहान वय समजून घ्या व ते जपा, असे ते सांगता आहेत. कालच्या प्रकरणात, त्या गृहस्थांना, जर आपले बाल्य आठवले असते, तर ते त्या मुलांच्या खेळात सामील, निदान आनंदात रमले असते. असो. नंतर मी मुलांच्या, घरातील problem चा उल्लेख केला होता. आजकालचे पालकही, मुलांच्या आनंदात सामील होत नाहीत. महागड्या वस्तु आणतात. पण वेळ देणे, इल्ले! हां फक्त त्यांच्या, अभ्यासातच interested असतात. O! young parents & elder parents, please remember that, actually , when , you have laugh with yours kids' any jokes or school friends' knews which are important to them. कधी खदखदून हसलात, ते आठवा. एक म्हण आहे, विहिरीत नाही तर पोहर्यात कुठून येणार? हां, फक्त अभ्यास मार्क्स ह्या विषयीच बोलणे होत असेल. हं. मी काल जे लिहिले, तेच एका प्रख्यात लेखिकेने, आजच्या म.टा.त लिहिले आहे. दुदैवाने, असे प्रज्ञावान लेख, वर्तमामपत्रात,फक्त एक दिवसाचे आयुष्य घेऊन येतात. कालचा पेपर आज रद्दीत जातो. तर वाचा, त्या काय सांगत आहेत?
" पालकांच्या अति अपेक्षामुळे काही वेळा, मुलांच्या हातून चुका घडतात. नैराश्य येऊ शकते. अनाठायी अपेक्षामुळे, व मैत्रीच्या अभावामुळे, ते नको तेथे रमतात. digital gaming कडे वळतात. पालक हो, जर त्यांच्या चुकांकडे, Its ok, next time be careful ,असे म्हणून, आम्ही तुझ्या पाठीशी अाहोत, असे त्यांना भासवून, योग्य व सौम्य शब्दात मार्गदर्शन करत जा हो. जरा मागे वळून बघा, आपण ही हेच करत होतो. करियरमध्ये यश मिळवणार्यांची बालपणीची पाखरे उडून गेली. इतरांशी तुलना करताना, मुलांच्या मनात, काय खळबळ होत असेल, ह्याची कल्पना करायची असेल, तर आपल्या जीवन पध्दतीची तुलना इतरांशी करा बरे! हो, या विषयाबद्दल व मुद्दाबाबत खूप काही लिहिता/ विचार करता येईल. तर मग बोला बरे, इतरांशी, या बद्दल. माझ्या मते पालकांचे- दोन गट- असतात. एक म्हणजे," माझा तो बाब्या व दुसरा गट म्हणजे, काही घडले तरी, आपल्या मुलांच्यातच, दोष काढायचा! दोन्ही भुमिका चूकच. सारासार विचार करूनच मध्य साधावा, हेच योग्य. मग त्या दृष्टीने पाऊल टाकाल, तरच तुमची मुले confusion ची शिकार होणार नाहीत. बघा, आपले पुर्वज सांगून गेलेत,
"साखरेचे खाणार त्याला देव देणार." मग आपणच आपल्या पाल्यासाठी," देव" का बनू नये? तर मग अारंभ होऊ देत बरे,या संकल्पनेसाठी. 😉😊. मग खालील चिन्हाप्रमाणे बालक<>पालक जोडणारच.
पालक>< बालक असे नको हो.
Comments
Post a Comment