पालकत्व हे फक्त जन्मदात्यांचीच जबाबदारी नसते. तर ती सभोवार असलेल्या व नातलगांकडे ही असते.
६.१२ .२०२३ .पालकत्व हे फक्त जन्मदात्यांचेच नसते. तर सभोवार असलेल्या व नातलगांकडे ही असते.
मत्प्रिय वाचक वर्ग हो, आपणापेक्षा लहान (वयाने व अधिकाराने) असणार्या समस्तांच्या, संस्काराची जबाबदारी, आपल्यावर असते. ती कशी निभवली जाते, त्यावर समाजात, आपल्याला मानाचे स्थान मिळते. साधे uncle and aunty म्हणवून, घेण्यात, ज्यांना कमीपणा वाटतो, त्यांना वयाने मिळणारा मान मात्र हवा असतो. मग ते शहाणपण शिकवण्यात, मात्र पुढाकार घेतात. असो.
" पालकत्व." जर लहान मुलांवर लक्ष ठेवायचे व वळण लावायचे तर हेतू चांगला असावा. आपल्याला, कथित त्रास होतो, या नाहक कल्पनेतून, राग काढू नये. आता मी माझेच, दोन अनुभव, लिहिणार आहे. असे निख्खळ, मार्गदर्शनानिमित्त. रागवणे, निश्चित योग्यच. पण मुलांना सुधारण्याचा हेतु असावा. काळजी असावी. कळकळ असावी.
१आमचे एक नातलग. म्हटले तर जवळचे वा नाते शोध घेतल्यास, जरा लांबचे. श्री. सुधाकर सबनीस.-
माझी ताई ठाण्याला राहत होती. सचिवालयमध्ये कामाला, आम्ही दादर रहात असू. ती दादरला गाडी बदलत असे. माझी भाची (वय दिड ते दोन) आमच्याकडे एकटी ही छान रहात असे. तिला माझी ओढ होती. हां, तर काय सांगावयाचे, मी, वंदनाला, घेण्यासाठी स्टेशनावर जाई. ताई ऑफिसला जाताना, मी दादर स्टेशनवर, तिला घेत असे. त्यासाठी ताईची वाट बघणारी मी. आमच्या या श्री.सुधाकरांनी मला बघितले. माझे वय १६ वर्षे. त्यांनी लगेच मला विचारले, " इथे काय करतेस, ही काय मुलींनी उभी राहावयाची जागा आहे का? मी कारण सांगितले. ते खरेतर घाईत जात होते. पण ते तिथेच थांबले, ताई आल्याची खात्री केली. मग धावत गेले. मी घरी सांगितले, तर माझ्या आईवडिलांना, त्यांचे कौतुक वाटले. हे, दोन्ही लोकांचे खरे पालकत्व.
२. आता, एक गंमत सांगते. आम्ही दादरला, खांडके चाळीत राहत होतो. माझ्या वडिलांना (दादा) प्रमोशनसह नेपियन सी रोडला क्वार्टर्स मिळाल्या. ५खोल्या. आम्ही खुशीत shift झालो. नंतर दिवाळी आली. आईला सुट्टी लागली. अन् मग, तिची व बहीणीची सुट्टी संपत आली. मी वय २० वर्षे. माझ्या पालकांना मोठा प्रश्न पडला. मला एकटे कसे ठेवायचे? चाळीची सवय नं! तेवढ्यात काय झाले. वडीलांच्या ऑफिसमध्ये(CDAnavy) मध्ये महिलांना ही join करावयाची order निघाली. तेथील वातावरण disturb होऊ नये, म्हणून, त्यांनी अशी टूम काढली कि, ज्यांच्या मुली, नोकरी योग्य असतील, त्यांना join करून घ्यावयाचे.मी नुकतीच पदवीधर झाले होते.जागा मात्र LDC ची होती. पण तो issue ठरला नाही. मग काय, माझ्या पालकांना, माझ्यासाठी babysitting मिळाले. आम्ही मुली लागलो. त्यात आणखीन् एक मजेशीर बाब म्हणजे , त्या ऑफिसमध्ये annual family gathering वगैरे कार्यक्रम होत असे. तेव्हा आम्हा मुलांमुलींना संभाळायची जबाबदारी, १.२ शिपायांकडे असे. सांगायचा मुख्य किस्सा असा कि, आम्ही join झालो, तेव्हाही, " गणपत" ने आमची जबाबदारी अंगावर घेतली😁. लंचटाईममध्ये आम्ही कोठे बसतो- बाहेर कोणी जात नाही ना? तेथे लंच टाईमसाठी अक्षरशः बेल- - घंटा वाजे. just like school. जरा कोणी रेंगाळले, तर आमचा ," हा" मास्टर आवाज देई, पोरीनो! घंटा वाजली ना! मऽऽग,चला बेगीन, सेक्शनात. अन् खरी गंमत म्हणजे, आमच्या पालकांना, " हे" योग्यच वाटे. कारण त्या गणपतचा हेतू योग्यच होता. तेव्हा खरेच शुध्द हेतूने, सामाजिकरित्या, पालकत्व निभावणे व ते स्विकारणे, हे, समाजाला, योग्य वळण लावेल, निश्चितच. तेव्हा हे दोन्ही बाजूने स्विकारा. मग बघा, जिवनात, आनंदी आनंद नांदेक हो. तेव्हा या विचाराचा व आचाराचा, अंगिकार करा. पटलेय ना! then be active & follow, these foot prints and pull, others on this way. and of course for this, like & share this blog among your society. ~~~~~~~
Comments
Post a Comment