इतरांनी निभावलेले, "पालकत्व" समजून स्विकारा.
७.१२ .२०२३ . इतरांनी निभावलेले, "पालकत्व" समजून स्विकारा.
माझ्या सुजाण व समंजस वाचक वृंद हो, स्वागतम्. काल मी, आपल्याला, स्वःपालकत्वाची मासले सांगितले, पण पूर्वी हे, असे स्फूर्तीने, घेतलेले, पालकत्व, स्विकारले जात असे. कारण त्यामागेच खरी खुरी माया असे. शिवाय त्या मुलांच्या पालकांनीही, दुसर्यांच्या बाबतीत,
"असे पालकत्व" निभावलेले असे. पण आजच्या, "मला काय करायचेय" या वृत्तीच्या मंडळींना, या दोन्ही बाजू समजणे व उमजणे, कठीणच. सांगायचे तात्पर्य हे कि, मुलामुलींनी ही, त्यांच्या सांगण्याच्या पध्दती व शैलीची जाण ठेवून, आपले भले साधावे. त्यांचे सांगणे, आत्मसात करावे. हे असे साध्य होण्यासाठी, एकएकट्याने,समोरून एकएकट्या मुला वा मुलीला हटकण्यापेक्षा, वेगळीच कल्पना लढवता येईल. बघा. घरात बसून, एकटीने, फालतू मालिकेत, रमण्यापेक्षा, ३.४ जणी एकत्र येवून, थोडे विचार करून, एखाद्या घटनेचे, नाट्य रूपांतर करून, शाळा- कॉलेजेसमध्ये, परवानगी घेऊन, सादरीकरण करावे. त्यातून, कित्येक मुलांचे, एकलकोंडेपण, शोधावे. त्यांच्यांशी संवाद साधावा. कित्येक जेष्ठ नागरिक, सकाळी वा संध्याकाळी गटाने भेटतात, राजकारणावर वा इतर विषयांवर गप्पा मारत वेळ घालवतात. त्यांना ही, हा वेळ, सत्कारणी लावण्याची IDEA सांगते. तुम्ही जेथे जमता, तेथे, प्रथम टेहळणी बुरूज बांधा.😉😊. म्हणजे शांत बसून आजूबाजूला, जे घडतेय, त्याची लक्षपूर्वक पाहणी करा. अहो, पूर्वी किल्लावर व गडावर, टेहळणी बुरूज बांधले जात असत. आसमंतात दिसेल, ते एखाद्या अधिकार्याला सांगितले जाई. अन् विचारपूर्वक निर्णय घेऊन, चांगल्याचे कौतुक व वाईटावर कारवाई केली जाई. त्या प्रमाणे, आपल्या गटात चर्चा करून, एकत्रित रित्या action घ्या. मस्त enjoy कराल बघा. चुकीची घटना दिसल्यास काय करायचे, हे आधीच ठरवल्याने, एकटे न पडता, हातून सत्कार्य घडेल. व एकदम न डाफरण्याने, तुमची योग्य समजूतीने सांगण्याची रीत व तुमचे संख्याबळ पाहून, आपसूक मुलेमुली, ही समंजसपणे ऐकून घेतील. स्वतः त बदल करतील. हे दुसर्या बाजूलाही सांगत आहे, कोणी ओरडलेले, तुम्हाला आवडत नाही ना, मग ही वयस्क मंडळी काही सांगत असतील, तर त्यांचे ऐका व आपली वागणूक चूकीची असल्यास सुधारा. किंवा आपली बाजू, त्यांच्या समोर मांडा. उदाहरण द्यावयाचे, कोणाही मोठ्या व्यक्तीला, तोकडे कपडे घातलेले आवडत नाही. घरी दारी हेच सांगितले जाते. यात, तुमच्या जवळ, " मग काय झाले," ह्या व्यतिरिक्त, योग्य कारण( असे कपडे घालण्यासाठी) असेल, तर त्यांना पटवून द्या. तरूणींनो, मी एक point तुमच्या समोर मांडते. तुम्ही फक्त sophistical समाजात वावरत नाहीत. इतर (--) जे, तुम्हाला असे बघतात, ते तुमचे काही ही वाकडे करू शकत नाही. पण आजकाल, मोबाईलच्या वाईट कुसंस्काराने, जी काही मानसिक घडण निर्माण होतेय, त्यामुळे, त्या मंडळींना कोणीतरी असहाय्य व्यक्ती मिळतात, त्यांच्याबाबतीत, निदान स्पर्शाचा अपराध घडतो ग.
अगतिक म्हणजे, लहान मुलेमुली अन् गर्दीत, घाईत असलेल्या महिला वगैरे. हा विचार करा बरे! असो.आज इतकेच. कारण यावर विचार करण्यासच वेळ लागेल. तर निदान हे वाचून, इथे नाहीतरी, मित्रमंडळीत चर्चा करा. कारण माझा हेतू सांगण्याचा वा नुसते माझे viewers वाढविण्याचा नाही तर चांगला बदल व्हावा , हा आहे. तर मग माझा हा हेतू सफल व्हावा, ही आतंरिक इच्छा पुरी कराल, ना? <> <> जोडा. >< >< तोडू नका.
ह्यात एक मजेशीर बाब म्हणजे, उन्हात चेहरा काळा पडू नये, म्हणून असा स्कार्फ बांधला जातो कि, कोण आहे, कळतच नाही. अगदी बुरखाही कमी पडेल, पण झाकावयाचा भाग मात्र {} ? मग निदान त्यांना परंपरावादी तरी म्हणू नका. असो. विचारचक्र फिरू द्या गरागरा.
Comments
Post a Comment