शुक्रवार व शनिवार friday & sature day
१९ .१२ .२०२३ . गुरूवारनंतर शुक्रवार व शनिवारच्या नावाची महतीही जाणून घेऊ या.
मत्प्रिय जिज्ञासू वाचक वृंद हो, गुरूवार ह्या पाचव्या वाराची माहिती, बहुदा बर्याच वाचकांना नवीन असावी. नवल म्हणजे विभिन्न, अशा दूर देशीच्या, संस्कृतीत, वारांना नावे, समान अर्थी असणे,त्या काळातील, " अजुबाच" होय. तर अाता शुक्रवार व शनिवार. या शनिवारच्या नावात ही हेच आहे, बघा शनि व sature त्याच ग्रहाचे नाव.
अाता वळू या. शुक्रवारकडे. आजचा दिवस. तुम्ही म्हणाल हा देवीचा वार. संपूर्ण भारतभर, हा शुक्रवार वेगवेगळ्या देवीच्या उपासनेचा मानला जातो. तिला प्रसन्न करण्याच्या अनेक पध्दती नेमून दिल्या आहेत. पण एक ध्यानात बाळगा. देवी मग कोठचीही असो. ती निर्मितीची प्रतिक असते. आपले जन्मदाते मातापिता व आपल्याला घडवणारी संपूर्ण दुनिया तिचेच रूप आहे. आता शुक्र ग्रहाचे नाव बघा. इंग्रजी नाव VENUS - goddess of love. प्रेमाची परिणती विवाहात होणे, अावश्यक व योग्य आहे नं? मग येतो पत्रिकेतील उल्लेख. त्याच्या/ तिच्या पत्रिकेत शुक्रबळ कमी पडतेय! मग ही काय भानगड आहे बरे. दोन जीवांना एकत्र आणतो, हा अापला शुक्र म्हणजे venus 😬
दुसरा अर्थ तो तेजस्वी तारा म्हणून ओळखला जातो. तेज रात्रीत झगमगणारा तारा. मी बोलते म्हणून, खटकेल. पण गृहलक्ष्मीला,स्वतःच्या तेजाने- पराक्रमाने , अाज चांगल्या पध्दतीने अर्थप्राप्ती करून व सर्वार्थाने सुखी समाधानी करणे, हीच शुक्राची कामगिरी. ही शुक्राची चांदणी ही तेजस्वी असते. हे महिलांनी ध्यानात ठेवावे. in return वर्तनाने सिध्द करावे.
साध्या डोळयांनी ही शुक्र रात्री सहज दिसतो, म्हणजे प्रकर्षाने चमचम करतो. संस्कृत शुक म्हणजे झगमगणारा. इंग्रजीत अर्थ gaudy. आपण या अर्थीहा शब्द कित्येकदा वापरतो. उदा. The people from circus always wear gaudy clothes.
चमचमणारे just like VENUS . जणू शुक्राची चांदणी. आपण सर्व ही आपापल्या क्षेत्रात, जणू शुक्राच्या चांदणीप्रमाणे चमकण्याची अास, "ध्यानी मनी" बाळगू या
त्यासाठी ही तेजाची ज्योत, सर्वदूर नेण्याकरिता मला हातभार लावाल नं? I am confidant in you, my dear readers. तो फिर ज्योतसे ज्योत लगाते चलो। ज्ञानकी गंगा बहाते चलो।
बघितला ना?.शुक्रवारचा प्रताप. परंतु हा ही वार, दोन्ही दूरवरच्या संस्कृतीत, एकाच अर्थाने आहे. तर उद्या शनिवारची विश्वभरातील महती पाहू या.
Comments
Post a Comment