Sunday म्हणजेच रविवार. sun= रवि= सुर्य.
२१ .१२ .२०२३.Sunday म्हणजेच रविवार. sun= रवि= सुर्य.
अाता बघा, रसिक वाचकहो, हा आपला सर्वांचा- लहानथोरांचा आवडता वार. एकदम पटले नं! हां तर याची माहिती वाचा. हा आठवड्यातील सर्वांत शेवटचा वार. आरामाचा वा पर्यटनाचा. तसे तर outing ला शनिवारीच - सुट्टी असल्यास, नाहीतर, रजा घेऊन, मंडळी बाहेर पडतात. पण असे आहे कि, आपल्यातील बहुतेक मंडळी, पाश्चिमात्यांचे अनुकरण करण्यात, धन्यता मानतात. ख्रिसमस व new year म्हणजे पर्वणीव जणू. पण एका बाबतीत ( चांगल्या) मात्र, no followers. मी सांगते, तेव्हा आपले लोक, नाराज होतात. पण रविवारी,आपल्या आजूबाजूला रहाणारे, ख्रिचन धर्मिय लोक, उशीरापर्यंत बिछान्यात लोळत पडलेले दिसतात का? ते सकाळी तयार होऊन चर्चला जातात. आपल्या पैकी कितीजण नियमित देवदर्शन करतात बरे! हां, विशिष्ट मंदिरातच तासन् तास रांगेत उभे राहून, भक्तीचे प्रदर्शन करतात. जवळच्या एखाद्या देवळात ~~~असो.
तर वाचा, या वारांची कहाणी. सुर्य- भास्कर-रवि- भानु- सविता.--. याला आदितवार ही म्हणतात. पूर्वी माझी आजी, नेहमी,आदितवारी जाईन,आदितवारी आहे, असेच म्हणत असे. पुढे सुर्याची बारा नावे देत आहे. निदान ह्या वारी,पूर्ण दिवसात, कधी ही या प्रकारे, सुर्यवंदन करा, ही विनंती. तोच आपल्याला सर्व देत असतो.
सुर्याची बारा नावे:-
१. ॐ मित्राय नमः। ( म्हणून साथ देणार्याला मित्र
म्हणतात)
२. ॐ रवये नमः। रवि.
३. ॐ सुर्याय नमः।
४. ॐ भानवे नमः।
५. ॐ खगाय नमः।
६. ॐ पूष्णेय नमः।
७. ॐ हरिण्यगर्भाय नमः।
८. ॐ मरिचये नमः ।
९. ॐ आदित्याय नमः।
१०. ॐ सवित्रेय नमः ।
११. ॐ अर्काय नमः ।
१२. ॐ भास्कराय नमः।
या प्रार्थने बरोबर सुर्य नमस्कार घालायची पध्दत आहे. पण निदान हात जोडून, पूर्वेकडे तोंड करून🙏 म्हणा.
विश्वास ठेवा. या प्रकारे पुजन केल्याने, दिर्घ व निरोगी आयुष्य व तेजस्विता मिळते. आत्मविश्वास वाढून, आपण आत्मनिर्भर बनतो. इतर धर्मियांना विशिष्ट वेळी, विशिष्ट दिशेला, तोंड करून , प्रार्थना करताना बघितले असेलच. तेव्हा मागे उभे राहून, त्यांचे निरिक्षण करा. ते विशिष्ट लयीत, हालचाल करतात, कि जणू एक भिंतच हलतेय. अहो, ज्ञानेश्वरांनी, भिंत चालवली. त्या प्रमाणे, आपण ही, एकत्रित होऊ याव या विश्वंभर,( विश्वाच्या पालनकर्त्याच्या वारी, सकाळी उठून, जरा लवकर, स्नान करून छोटीशी मानवंदना देऊ या. करणार ना इतके मनोरथ, माझे, ह्या म्हातारीचे पुर्ण. माझे वय आहे ७३+. हो आणि ही प्रथा सर्वदूर पसरवा. मुखाने सांगा, नाहीतर, whatsup share करा.
Comments
Post a Comment