१८ पुराणे. आपल्या हिंदूच्याधर्मग्रंथापैकी एक महत्वाचा स्त्रोत.
३०.१ .२०२४ .१८ पुराणे. आपल्या हिंदूच्या धर्मग्रंथापैकी महत्वाचा ज्ञानस्त्रोत.
माझ्या प्रिय वाचक वर्ग हो, तुम्ही असेच अध्ययन प्रिय रहा. मी आज अगदी थोडक्यातच या १८ पुराणांची माहिती देणार आहे. ही खरे तर, मनोरंजकात्मक आहे. तुम्ही कल्पना ही केली नसेल. इतकी मजेशीर व नवलपरी माहिती ह्यात आहे.
ह्या १८ पुराणांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
१. ब्रह्म पुराण.
२. पद्मपुराण.
३. विष्णु पुराण.
४. वायु पुराण.
५. भागवत पुराण.
६. नारद पुराण.
७. मार्कण्डेय पुराण.
८.अग्नि पुराण.
९. भविष्य पुराण.
१०. ब्रह्म वैवर्त पुराण.
११. लिंग पुराण.
१२. वराह पुराण.
१३. स्कंन्द पुराण.
१४. वामन पुराण.
१५. कुर्म पुराण.
१६. मत्स्य पुराण.
१७. गरूड पुराण.
१८. ब्रह्माण्ड पुराण.
असे आहे, पुराण म्हणजे पुरातन कथा. वाङमय.
वाग्+ मय. वाग् म्हणजे, परंपरागत संशोधित झालेले ज्ञान एकवटलेले व लिखित ग्रंथ. त्यात, ज्ञानासोबतच नीतिमत्ताचे धडे दिलेले आहेत. ह्या वाचनातून चांगले वाईटाची जाण होते. हे काही देवदेव -जपतप नाही. तर प्रसंग विशेष अनमोल अशी मानवी सभ्य वर्तनशीलता याचा, यातून परिचय घडणार आहे. सामाजिक व वैयक्तिक जीवनाचा हा आधारस्तंभ अाहे. आजही ही जाणच, सर्वांचे, परस्परसंबंध जोडण्यासाठी लाभदायक आहेत.
बघा, या पुराणांतून अनेक विषय - सृष्टीची निर्मिती, भुगोल, खगोल, तत्वज्ञान राजनीति, संस्कृती, विचारांची देवघेव व त्यावर आधारित सामाजिक रितीरिवाज ह्यांची माहिती एकत्रित केली आहे. मग माझ्या वाचक हो, हे ज्ञान
outdated कसे ठरेल बरे? ही पुराणे वेद व्यासांनी लिहिली. पण ही काही एकच व्यक्ती नव्हती. व्यास मुनी ही पदवी होती. शिष्य परंपरेने, व्यास निर्माण होत असत. अन् या ज्ञानात भर टाकत. आज हे ज्ञान मिळवण्यापेक्षा, सगळ्याचा कल, फक्त विशिष्ट परिक्षा देऊन मिळणार्या पदव्या हस्तगत करण्याकडेच असतो. नोकरी- मिळाली कि लगीन - अन् मग फक्त संसाराची अगीन गाडी , विशिष्ट track वरून धावणे, हेच इति कर्तव्य, बस. मी खोटे लिहिलेय का? हा सवाल स्वतःलाच विचारा बरे!.
उद्या सर्वसामान्यांचा कल व नाकासमोरच नजर ठेवण्याबाबत विचार करू या. ह्या विचारांच्या देवघेवीत, तुमच्या मित्रमैत्रिणींना सामिल करा हो. याने share & forward to facebook & whatsup groups.
Comments
Post a Comment