रामरक्षेचा उर्वरित श्लोक ३६,३७ व ३८.रामरक्षा हे कवच आहे, याची पडताळणी, होण्यासाठी करूणाष्टके १ ते १० दिलेत.
13.1.2024. रामरक्षेचे उर्वरित श्लोक ३६,३७ व३८.
रामरक्षा हे कवच. पडताळणी. मध्ये करूणाष्टके १ ते १०. सांगितलीय.
सुज्ञ वाचक मंडळी हो, मी मुद्दामच मध्ये करूणाष्टे १ ते १० सांगितली आहेत. त्यानुसार, आपल्या सर्वा़ना,, " रामरक्षेची प्रचिती येऊन, " सत्यतेची व प्रभावाची पडताळणी, करणे, सोपे जाईल.
रामरक्षा ३६ ३७ व ३८ इति समाप्त
भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदाम् ।
तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम् ॥३६॥
हा रामनामाचा जप करण्याने जीवनातील, सर्व कष्ट दूर होतात. ही अंधश्रध्हा नाहीये. प्रत्यक्षात कित्येकांना ह्या
" राम" शब्दाचा अर्थ माहित नसतो. परवाच आपण याचा अर्थ समजून घेतला. "रा" म्हणजे शक्ती व " म" म्हणजे शिव(असणे) शक्ती असणे = क्षमता.. जर थ्री इडियट मधील All is well. मनाला भावते. I can do it बोलले कि छान वाटते. मग short मध्ये तोच जप-" राम राम" म्हटले तर, क्षमता असा अर्थ असलेला राम राम बोलणे, अंधश्रध्दा का बरे? अं!
पुढची ओळ नीट वाचा. हा जप करणारा, सर्व सुख व संपत्ती व ऐश्वर्य मिळवू शकतो. बघा, इथे मिळते म्हटले नाही. तसे असते तर ती अंधश्रध्दा ठरली असती. मिळवू शकतो. He can. म्हणजे प्रयत्न केल्यास. रामनामाचा जयजयकार यमदूताला ही दूर ठेवतो. म्हणजेच ह्या जपाने आत्म विश्वास वाढून, आजकाल जे depression चा प्रकार सर्वत्र ऐकतो, ती भानगड उद् भवतच नाही.
रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे ।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम: ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोSस्म्यहम् ।
रामे चित्तलय: सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥३७॥
श्रीराम हे सर्वश्रेष्ठ राजेश्वर आहेत. त्यांना सदैव विजयच प्राप्त झाला आहे. सीता व राम हे लक्ष्मी नारायणाचे रूप ऄहे. अशा लक्ष्मीपती श्रीरामाचे मी मनपूर्वक भजन करत आहे.समस्त राक्षस सेनेचा विनाश करणार्या श्रीरामाला मी नमस्कार करत आहे. त्याच्या सारखा अन्य कोणी आश्रयदाता नाही. तो कोणी शरण आलेल्याला वत्सल ( पुत्र) मानतो. त्याचे मी दास्य पत्करेन व त्याच्या रूपात लीन होईन. हे श्रीरामा माझा उध्दार करा.
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ॥३८॥
श्री शकरजी, पार्वतीला सांगतात, " हे सुमुखी, राम- नाम हे विष्णुसहस्त्र नामांच्या बरोबरौचे आहे. मी स्वत: सदैव रामाचीच स्तुती करतो. आणि त्यातच मग्न राहतो. म्हणजेच सदाशिव ह्या तचयांच्या नावाप्रमाणे, स्वत: आत्मबळावर , आत्मनिर्भर राहतो.
आता थोडे वर्तमानकाळात येऊ या. आपल्या पंतप्रधानांनी, काल १५ ऑगस्ट या आपल्या स्वातँत्र दिनी , हेच सांगितले नं? आत्मनिर्भर बना. स्वतंत्र बना. स्वत:च्या क्षमतेवर जग जिंका. म्हणजेच जागतिक रित्या आदर्श बना.
इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं संपूर्णम् ॥
इस प्रकार बुधकौशिकद्वारा रचित श्रीराम रक्षा स्तोत्र सम्पूर्ण होता है ।
॥ श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु ॥
अशा प्रमाणे श्री बुध कौशिक मुनीं द्वारे रचिलेली ही श्रीरामरक्षा जगाच्या भल्यासाठी पूर्ण झाली आहे.
ह्याचे पठण व आत्मसात करा व बघा, काय होते.
ॐ ॐ ॐ ॐ ॐ।
Comments
Post a Comment