आज संक्रात. सर्व बाजूने," तिळगुळ घ्या, गोड बोला", चा भडिमार. पण स्वः सुचना?😉😊
१५. १ . २०२४ . शिर्षक थोडे धक्का देणारे, हो नं?
माझ्या सुज्ञ व समंजस रसिक वाचक हो, आज संक्रात.
पूर्वी लोक, भेटून, शेजारी- पाजारी जाऊन, इतरांना, तिळगुळ घ्या व गोड बोला, सांगत असत. आजकाल तर whatsup च्या कृपेने, सगळ्याच सणावारांसाठी, greeting ची wish करण्याची सोय. तीही कशी तर अगदी रेलचेल होय. आला मेसेज,दाब बोट अन् कर forward. आज प्रथमच, मी माझ्याच शब्दांत, टाईप न करता, इथले greeting तेथे व तिथले greeting तेथे सरकवले. I mean forward केले. पण खरे सांगू, समाधान नाही झाले. वयानुसार, प्रत्यक्ष भेटी शक्य नव्हत्या, परंतु, मोबाईलवरून बोलण्याचा किंवा निदान, स्वतःच्या शब्दात, लिहिण्याचा, आनंद काहीसा अौरच. पटतेय का? आता महत्वाचा अन् कळीचा मुद्दा म्हणजे, आपण इतरांना, मारे ऐटीत, तिळगुळ घ्या अन् गोड बोला, अशी नरम शब्दात, order सोडतो, पण कधी, संक्रांतीलाच नव्हे, तर एरवी, आपणा स्वतःला, ही सुचना केली असते का? मी मलाच "हा" वरवर सोपा, पण गहन प्रश्न विचारला. उत्तर शोधताना, जरा गोंधळच झाला. yes or no संमिश्र उत्तर हाती लागले. वाचक हो, बघा बरे, तुम्ही ही स्वतःच्या मनाला विचारा, हा सवाल!
समर्थरामदास स्वामींनी, मनाच्या श्लोकात (५३) हेच सांगितले आहे कि,
सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकीं ।
सदा सत्यवादी विवेकी ॥
न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥
त्यांच्यामते, ज्याच्या वाणीत, सदैव "आर्जव" असते, तो सर्व लोकांचा लाडका असतो. नेहमी सत्य तेही विवेकबुध्दीने- म्हणजे कोणाला न दुखावता बोलावे. मिथ्य - खोटे न बोलणारा, जगात सर्वोत्तमाचा, श्री रामाचा दासच ठरतो.
महर्षी विदूरजी, आपल्या विदूरनीतिमध्ये ( पहिल्या अध्यायात-श्लोक५९ ) उपदेश करतात कि,
द्वे कर्मणी नरः कुर्वन्नस्मिंल्लोके विरोचते।
अब्रुवन् पुरुषं किन्चिदसतोऽनर्चयंस्तथा ॥
जो कधी ही, कठोर वचन बोलून कोणालाही दुखावत नाही, तो सन्मान मिळवतो. तसेच जो दुष्ट लोकांना, जवळचे मानत नाही- आपल्यापासून दूर ठेवतो. व त्यांच्या सानिध्यात कदापि राहत नाही. त्यालाच आदर व मान मिळतो. समर्थरामदास स्वामी, आपल्या सर्वांच्या वतीने, त्या राघवाकडे मागणी मागतात,
मधुर वाणी दे रे रामा॥
बस, ही मागणी, माझ्यासकट, माझ्या प्रिय वाचकांनी, त्या श्रीरामाकडे मागावी, ही हात जोडून🙏🙏🙏 विनंती. प्रत्येकाने, स्वतःच गोड बोलावयाची शपथ घ्यावी हेच योग्य. अन् आपल्या परिवार व मित्रमैत्रिणींना, ही मागणी करावयास सांगावी. कशी ती, सांगणे न लगे.
📢📢📢📢📢📢📢📢📢📢📢📢
Comments
Post a Comment