करूणाष्टके। स्पष्टीकरण ११जाने. १ ते १० चे वाचन. आठवतेय नं!

 १६ जाने. २०२४. करूणाष्टके. स्पष्टीकरण.११ जानेवारीला वाचन.

     मत्प्रिय व ज्ञानसिध्द होऊ इच्छिणारे वाचकवृंद हो, 

     I am proud of you. आजकालच्या jokes& pranks च्या जमान्यात , आपण.मोठ्या संख्येने , माझ्या ह्या blogs ना भेट देत आहात. या ग्रंथांपासून, काही माहिती मिळवू इच्छिता आहात. मी नक्कीच आपली अपेक्षा पूर्ती करीन, हे वचन. आपण रामरक्षेच्या  मध्येच, करूणाष्टके १ ते १० वाचली. तर आज त्याचे स्पष्टीकरण करणार आहे. म्हणजे रामरक्षेच्या शेवटच्या श्लोकांआधी मी, करूणाष्टके, का लिहून, आपल्या पुढे ठेवलीत, ह्याचा खुलासा सहजी होईल. आपण सर्वांनी ,"ती" वाचली असतीलच. पण संदर्भासाठी सतत मागे जायला, हे काही पुस्तक नव्हे. तेव्हा परत एक एक पाहू. 

     अनुदिन अनुतापें तापलों रामराया ।

     परमदिनदयाळा नीरसी मोहमाया ॥

      अचपळ मन माझें नावरे आवरीता ।                         

      तुजविण शिण होतो धांव रे धांव आता ॥ १ ॥

                 समर्थरामदास स्वामींनी हे कवन, आपल्या सर्वजनांच्यावतीने  सांगितले आहे. म्हणून, ते वाचताना प्रथमपुरूषाच्या जागी स्वतःला कल्पून म्हणावयाचे आहे. 

     ते- म्हणजे मी- वाचक बोलत आहे. 

      दरदिवशी, अनेक कारणाने, मी त्रासलो आहे. प्रत्येक दिवशी ,मला ओढ देणारा मोह व माया रूपी जी आभासी दुनिया, तिच्यापासून दूर होण्याची, मला बुध्दी दे. तिचे निरसन कर. हे श्रीरामा,  माझे हे  " मन" त्याचे चापल्य कमी व्हावे. ते आवरणे, कठीण झाले आहे. बघा, " आवरणे" क्रियापद मानले तर control अर्थ व विशेषण मानले, तर " आवरण"  cover अर्थ होतो.  म्हणजे त्याच्या निरागसतेला वेगवेगळी, भावनांची व वयानुसार दडपणांची स्तरे चढली आहेत. त्यातून सुटका कर. मूळ आत्माराम  दिसावा, ही आस मनी ठेऊन, तुला शरण आले/ आलो आहे.

भजनरहित रामा सर्वही जन्म गेला ।

स्वजनजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला ॥

रघुपति मति माझी आपुलीशी करावी ।

सकळ त्यजुनि भावें कांस तूझी धरावी ॥ २ ॥

           आता पर्यंतचे आयुष्य, ह्या संपूर्ण, हिंदुस्थानांचे तुझे अस्थित्व- आवरणाखाली( बाबरमशीदी खाली) राहीले. ते आता  आमच्या समोर येत आहे, तेव्हा सकल हिंदू बंधुभगिनींना, त्याचा प्रत्यय व प्रचिती होवो. सगळे भेदभाव त्यागून, तुझी रामरूपी, आत्मक्षमतेची कांस- ओळख व्हावी. बस, हीच मनिषा आहे. आतापर्यंत आम्ही नुसतेच, स्वजन मानून, ज्यांचा- धनाप्रमाणे- स्वार्थ मानला, तो व्यर्थ ठरला. तुझा खरा भक्त- मारूतीराया, तुला आमच्या समोर, समक्ष" आणत आहे. पण हाय! इथे ही दुदैवाने, ***गण  निंदक  आहेतच. कोठे तर facebook- utube अन् tv channel वर. असो. तु समर्थ आहेस. माझे वाचक वाढवशील. हिंदुनिष्टतेची भरभराट होईल. मग या सत्कार्यात हातभार लावणार ना! 🙏🙏🙏🙏🙏.

                  ॐ श्री ॐ श्री ॐ श्री ॐ  

 =============================

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू