राम म्हणजे आत्मशक्ती. स्वक्षमता. संस्कृत मध्ये एकाक्षरी शब्द आहेत. "रा" व"म".
१७.१ .२०२४ राम म्हणजे आत्मशक्ती. स्वःक्षमता.
माझ्या जिज्ञासू व धर्मनिष्ठ वाचक हो.
आज १७ जानेवारी बरोबर ५ दिवसांनी, अयोध्येला, श्रीराम, अनेक शतकानंतर मंदिरात विराजमान होणार. म्हणून आपण त्यांची, आळवणी करायला हवी नं! दिवसातून फक्त ४.५ मिनिटे.बस. आपल्या ह्रदयात, श्रीरामाची प्रतिष्ठापना करू या. त्यासाठी,या मोबाईलच्या मदतीने, कोठेही असलात तरी, तुम्ही ही भक्ति करू शकाल. ना भल्या मोठ्ठ्या रांगा, ना तासन् तास बसून, जप वा अर्चना.
चला तर मग , हो जायें शूरू।
पुढचा करूणाभरा श्लोक अभ्यासु या.
विषयजनित सूखें सौख्य होणार नाहीं ।
तुजविण रघुनाथा वोखटें सर्व कांहीं ॥
रघुकुळटिळका रे हीत माझें करावें ।
दुरित दुरि हरावें सस्वरूपीं भरावें ॥ ३ ॥
श्री राम। या शब्दाचा अर्थ समजून घेऊ या.
'रा' शक्तिरिती विख्याता: ।
'म' शिव: परिकिर्तित: ।
शिवशक्त्यात्मकं बीजं ।
राम, राम इति गीयते ।
"रा' म्हणज शक्ती आणि ' म' म्हणजे शिव
शिव शक्ती एकत्र म्हणजे शक्ति असणे
क्षमता. म्हणून आपण म्हणतो, रामबाण उपाय.
कोणत्याही गोष्टीचा नुसता हव्यास धरून सुख मिळत नसते. त्यासाठी आपली पाऊले, योग्य दिशेने टाकावी लागतात. रामा तुझ्याशिवाय सर्व व्यर्थ आहे. आपल्यात क्षमता निर्माण करणे, आवश्यक आहे. तेव्हा बा रघुराया, माझे हित कर. दुरित- अयोग्य गोष्टींंपासून, दूर राहण्याची मला बुध्दी दे. विनायास काही मिळत नाही , हे मला समजणे, जरूरी आहे. तर तुझ्या नावाप्रमाणेच, माझे सस्वरूप ,मला जाणता यावे व त्यासाठी तनमनधन भरून यावे. म्हणजेच -
तनु-मन-धन माझें राघवा रूप तुझें ।
तुजविण मज वाटे सर्व संसार वोझें ॥
प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी ।
अचल भजनलीला लागली आस तूझी ॥ ४ ॥
तुजविण= स्वतः तील क्षमतेविना.
माझी बुध्दी, क्रियाशिलतेपासून प्रचलित( दूर चळणे) न होऊ दे रे रामा.
अचल म्हणजे दृढ अशी भजन लीला- म्हणजे सदैव कार्यतत्पर व उद्योग प्रिय रहावी. तुझी - क्षमतेचा उपयोग करण्याची ओढ असावी. समर्थरामदास स्वामी, तासन् तास देव- देव करायला सांगत नाहीत, तर ज्ञानाची व उद्योगीपणाची देव-घेव करण्यास सांगत आहेत. समजून घ्या हो, हा विचार व आचार. मग start your, duty first.
स्वधर्माचे पालन करा. पालकधर्म-पाल्यधर्म, गुरूधर्म- विद्यार्थीधर्म. नेताधर्म व जनता धर्म.
राम- स्वक्षमता ह्रदयी स्थापा व त्यासाठी प्रयत्नशील रहा. बस. हीच साधना होय. तर आपल्या सोबत, आपल्या सोबत्यांना ही ह्या प्रकारे धर्मनिष्ठ बनवा. त्यासाठी. like& share these blogs to your friends. <><><>श्रीराम- स्वःक्षमता. श्रीराम- स्वःक्षमता<><><>
Comments
Post a Comment