करूणाष्टके. ५ ते ७. अभ्यासाची सोपी पध्दत. चत्वार वाचा.
१८.१ .२०२४ . करूणाष्टके ५ ते ७. अभ्यासाची सोपी पध्दत. चत्वार वाचा.
प्रिय वाचक जन हो, ही करूणा, समर्थांनी सर्व जनांसाठी, त्यांनी आपल्या मनावर ताबा मिळवावा, ह्यासाठी कसे प्रयास करावे, हे अधिकारवाणीने सांगितले आहे. भगवत् गीता ही हेच सांगते. आपण आपले कर्तव्य करीत रहावे. अर्थात् अपेक्षा पूर्ती, प्रत्येकाला हवीच असते. अन् ही मनीषा - मनी मानसी असणे, योग्यच आहे. पण जेव्हा ती लगोलगच व्हावी, नाहीतर, निराश होणे, चूकीचे आहे. श्रध्दा व सबुरी राखावी. आपले मन सगळ्यात गुंतलेले असते. पण ते अंतर्मुख व्हावे, म्हणून प्रयास करावा, सकलजनांनी. मी नेमके काय करू शकते/तो. हा शोध घ्यावा.आपले प्रयत्न अचूक दिशेने होत आहेत का? याचा तपास करावा. आपण जिथे कमी पडत आहोेत, तिथे, " आपणच" असावे. म्हणजे, सुधारणा निश्चितच होईल. ह्या अनुषंगानेच, पुढील श्लोक वाचा बरे. कसे तर "चत्वार वाचा" वापरून. म्हणजे बघा. आधी एका श्लोकाच्या चार ही ओळींकडे, एकदम टक लावून बघा. मग जीभ न हलवता, फक्त डोळ्यांनी वाचा. नंतर नेहमी प्रमाणे, मनातल्या मनात दोनदा वाचा. मग मोठ्याने ओठ हलवून वाचा. समोर बघा. फक्त एक मिनिट लागेल, त्या ओळी पाठ होतील. अन् मनन व चिंतन केल्यावर, त्याचा अर्थ अापसूक समजेल. हीच रीत सगळ्या प्रकारच्या अभ्यासासाठी वापरा. अन् चमत्कार बघा. sorry हा चमत्कार नाहीये, तर अध्ययनाची पारंपरिक रीत आहे. "चत्कार वाचा".
चपळपण मनाचें मोडितां मोडवेना ।
सकळ स्वजनमाया तोडितां तोडवेना ॥
घडि घडि विघडे हा निश्चयो अंतरीचा ।
म्हणवुनि करूणा हे बोलतो दीनवाचा ॥ ५ ॥
दीन वाचा:- लीन होऊन.
जळत ह्रदय माझें कोट्यानुकोटी ।
मजवरि करुणेचा राघवा पूर लोटीं ॥
तळमळ निववीं रे राम कारुण्यसिंधू ।
षड्रिपुकुळ माझें तोडि याचा समंधू ॥ ६ ॥
कोट्यानुकोटी.:- प्रथम कोटि- पहिली आहे, नंतरची कोटी दुसरी आहे. कोटि= नाना तर्हा. व कोटी= संख्या. करोड.
तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी ।
शिणत शिणत पोटीं लागली आस तुझी ॥
झडकरि झड घालीं धांव पंचानना रे ।
तुजविण मज नेती जंबुकी वासना रे ॥ ७ ॥
तो अब शुरू हि जाये। आणि ही अध्ययन पध्दती आत्मसात करून, आपल्या मुलां बाळांना शिकवा बरे!
त्याबरोबरच इतरजनांनाही सांगा. You know how to spread this .
{}{}{}{}{}{}{{}{}{}{}{}chain system.
Comments
Post a Comment