आपले ध्येय नेमके ठरवा व त्या दिशेने वाटचाल करा, हाच सन्मार्ग होय.

 १९.१ .२०२४ . आपले ध्येय नेमके ठरवा. व त्या दिशेने वाटचाल करा,  हाच सन्मार्ग.

     माझ्या वाचकांनो, rather followers, तुम्ही माझ्या ह्या ब्लॉगला, चांगल्यापैकी response देत आहात. मग त्याच बरोबर, माझ्या सुचना व उपदेश ही follow करत असाल, हे गृहीत धरू नं? कारण, त्यात, तुमचे सर्वांचे भले करण्याचा हेतू मनी धरून, " ह्या ब्लॉग" चे लिखाण, मी करीत आहे. हा उपक्रम एकप्रकारे, प्रवचानाचा प्रकार आहे. पूर्वी मंदिरातून असे "किर्तन व प्रवचन" जनहिताय करण्याची प्रथा होती. माझ्या लेखी हे एक मंदिरच आहे.  माझा राम- माझी क्षमता, सामोरी असते. तो माझ्या ज्ञान देण्याचे रूपांतर, तुमच्या रूपाने, ज्ञान घेणार्‍यात करीत अाहे. हे माझे भाग्यच आहे.

     काल मी श्रीकृष्णाच्या गीतेचा उल्लेख केला होता. तर बघा. त्यांनी ही, हेच सांगितले आहे.

               भगवत गीता.द्वितीय अध्याय. श्लोक ४६.

          यावानर्थ उदपाने सर्वतःसंप्लुतोधके।

          तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ॥ ४६॥

          अर्थ:- चोहीकडे सर्व जलमय झाले असता विहिरीची किंमत( काहीच नाही), तेवढीच ज्ञानविज्ञानसंपन्नाला सर्व कर्मकांडात्मक वेदांची असते.

           आपल्या सरळ सोप्या भाषेत, सांगायचे झाले, तर

     जिथे मुबलक पाणी आहे, तेथील एखाद्या विहिरीतील पाणी, कोणी  कशाला काढण्याचा प्रयास करील. तसेच एखादा, वेदातील सकल ज्ञान संपन्न असेल, तर तो वेदातीलच, कर्मकांडात  कशाला वेळ घालवील.  म्हणजेच जगाचा उध्दार करण्याची, ज्याच्यात क्षमता असेल, तो आपल्या निहित कर्तव्यातच  दंग असतो. तो/ती जप- देवळातील रांगेत वेळ घालवत नाही. पण श्रीकृष्ण, धनंजयाला,अर्जुनाला हे ही सांगत आहेत कि, तु सर्व प्रजाननांसाठी लढले पाहीजेस, अन्याया विरूध्द सज्ज झाले पाहिजे. त्या सर्वांच्या, श्रध्दास्थानाची जपणूक केली पाहिजे. मंदिरांचे रक्षण केले पाहिजे. तेच आज २२जानेवारी २०२४ ला होत आहे. अन्यायाने, मंदिराची मशिद केली गेली. त्याचे पुनर्स्थापन होत आहे. हेच कलियुगातील धर्मपालन आहे. 

           योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय।

           सिध्द्यसिध्दोः समो भूत्वा समत्वं योग उच्यते॥ ४८॥

      अर्थ:- हे धनंजया, कर्माच्या फलाची आसक्ती - अपेक्षा सोडून आणि यश- अपयशाविषयी समबुध्दी ठेवून, म्हणजे आग्रही न राहता, योगमुक्त होत्साता कर्मे कर. अशा समबुध्दीलाच "योग" म्हणतात.

        आता पुनश्चः करूणाष्टकाकडे वळू या.


              सबळ जनक माझा राम लावण्यकोटी ।

              म्हणवुनि मज पोटीं लागली आस मोठी ॥

              दिवस गणित बोटीं ठेवूनि प्राण कंठीं ।

              अवचट मज भेटी होत घालीन मीठी ॥ ८ ॥

         राम या शब्दाच खरा अर्थ लक्षात घेऊन , आपल्या क्षमतेचा, पूर्णतः वापर करण्याची ओढ, पोटी धरून, एक एक दिवस, मोजत, जीवन जगत आहे. तेव्हा हे राघवा, ह्या प्रयासात, तुझी भेट व्हावी. बघा.  आपले दोन तीन कर्तव्यतत्पर GREAT  PERSONS  ९० नंतर ही आपल्या क्षेत्रात, कार्यरत असलेले- गानसम्राज्ञी लता मंगेशकर. वय ९५ व इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे.वय ९९.  ह्यांनी आपल्या क्षमतेचा पुरेपूर उपयोग केलाय. मग आपणच का ५०.६० वयातच निष्क्रिय होतो बरे. 

   Then no retirement - only re activeness.

         वाचा व स्वतःला वाचवा. अन् स्वजनांना ही वाचवा.  सदैव चला पुढे. पाऊल पडू द्या पुढे.  बस. ही विनंती.

     🚩 ❄❄❄❄❄❄❄❄❄🚩

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू