रामाच्या नामाबरोबरच रामाच्या स्वरूपाचा महिमा.

 2.1.2024 . रामाच्या नावाचा महिमा 


मत्प्रिय वाचक हो, काल लिहिल्यानुसार आज रामाचे स्वरूप व त्याचा अर्थ जाणून घेऊ या. तसे पाहता, माननिय रामानंद सागरजी की, रामकथा तर सर्वानी पाहिली आहेच. तर आता, रामरक्षाचे, अध्ययन करू या. 

॥ श्रीरामरक्षास्तोत्रम्‌ ॥

         श्रीगणेशायनम: ।

अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य ।

बुधकौशिक ऋषि: ।

श्रीसीतारामचंद्रोदेवता ।

अनुष्टुप्‌ छन्द: । सीता शक्ति: ।

श्रीमद्‌हनुमान्‌ कीलकम्‌ ।

श्रीसीतारामचंद्रप्रीत्यर्थे जपे विनियोग: ॥

अर्थ: — 

॥ अथ ध्यानम्‌ ॥

या रामरक्षेचे निर्माता बुध कौशिक ऋषी आहेत. या रक्षामंत्राचे देवता राम व सीता आहेत. हे काव्य अनुष्टुप छंदात रचिले आहे. यातून श्रीरामांना प्रसन्न केले आहे.यातील शक्ती सिता माता आहे. आणि हनुमानजी किलक आहेत. म्हणजे  एकादी गोष्ट उघडण्याची चावी आहेत.  मारूती मार्फत श्रीरामसीता दोघांना प्रसन्न करता येते. या तिघांचे स्मरण व जप करून जीवनातील खरे सौख्य मिळते. त्यांचे ध्यान करावे.               ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्दद्पद्‌मासनस्थं ।

पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम्‌ ॥

वामाङ्‌कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं ।

नानालङ्‌कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचंद्रम्‌ ॥

त्यांचे स्वरूप डोळ्या समोर आणावे. ते असे की,

       श्रीरामांच्या हातात धनुष्य बाण आहे.  व ते बद्द पद्मासनाच्या मुद्रेत पितांबर धारण करून बसले आहेत. ते कमल लोचन आहेत. त्यांच्या बाजूस,   कमलाप्रमाणे प्रफुल्लित मुख असलेल्या सीतामाता आहेत.अशा आजानबाहू नीलवर्णी अलंकारयुक्त श्रीरामाचे  आपण ध्यान करावे.तसेच ते जटाधारी आहेत 


॥ इति ध्यानम्‌ ॥ 


चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्‌ ।

एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्‌ ॥१॥ 

श्री रघुनाथांचे चरित्र शतकोटि आहे. त्यातील एक एक अक्षर  जणू आपल्या महापापांचा नाश करण्यासाठीच आहे. फक्त आपण मनापासून त्यांचे ध्यान व जप करावयाचा आहे.ि

 श्रीराम जय राम जय जय राम. 

   श्रीरामांचे प्रत्येक अभिनाम आपल्या प्रत्येक अंगांचे रक्षण करतात.

   तसेच ही रामरक्षा आपल्या हर एक भयाचा विनाश करत  असते.  आज इतकेच. कारण ,मी ही रामरक्षेचा प्रारंभ आपल्या पूढे, वाचन व मनन व चिंतन करण्यासाठी ठेवत आहे. फक्त एकदाच वाचून विसरण्यासाठी नव्हे. जमल्यास इतकाच भाग वेळा वाचाल तर खरेच वाचाल. बघा करून🙏🙏🙏🙏🙏. ॐ ॐ ॐ ॐ ॐ .

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू