हे सुर्यायेवढे सत्य आहे कि, आत्मक्षमता हीच खरी सर्वांची ताकद असते.

 २०.१ .२०२४.  हे सुर्यायेवढे सत्य आहे कि, आत्मक्षमता हीच सर्वांची ताकद असते. 

    मत्प्रिय सज्ञान, खरे तर सुज्ञात वाचक हो,  माझे हे गंभीर परंतु  आश्वासक लिखाण,  आपण वाचून, समजून घेत आहात. हेच माझे व आपल्या सर्वांचे भाग्यआहे. भाग्य हे नशिबावर अवलंबून  नसते, तर प्रयत्नांच्या खंबीर पायांवर उभे  राहते. हे दोन पाय म्हणजे - प्रयास व चिकाटी. तेव्हा सर्वात AVOID काय करायचे, तर-मला काय माहीत? अं हं, माहित करून घ्या. तसेच लहान मुलांची जिज्ञासा पुरी करा. आपल्या घरातील जेष्ट व्यक्तींची ही जिज्ञासा पूर्ण करा. आजकालच्या बँक व्यवहाराची त्यांना माहीती करून द्या. मग त्यांना- - ATM debit credit card KYC  येणारे Unknown नंबरचे calls  वगैरे. त्या बाबत ते बालकच असतात. मग ते तेथे जाऊन परक्याची मदत घेतात. अन् फसवणूक होते. अहो, त्यांची फसवणूक म्हणजे तुमचीच फसगत. ह्या दोन्ही शब्दात मोठा फरक आहे. फसवणूक समोरचे करतात व फसगत आपल्या नजरचुकीने होते. यासाठी आपण आत्म क्षमतेत कमजोर होऊ नये, दुसरे म्हणजे, " मला येत नाही." अं हं ! "I can do it." हा मंत्र जपा. यासाठी तत्पर रहावे, हेच खरे!  यासाठीच तर आपली संत मंडळी, आपल्याला सदैव जागृत करीत असतात. पण आपण, jack& jill च्या संस्कृतील बुडून गेले असतो नं! तर वेळ नसेल, तरी निदान मोबाईलच्या वाटेने ग्रंथसंपदा, नजरेखालून घाला हो. 

त्यासाठी उद्या गीतेचे ‍ १०व्या अध्यायातील पहिले १ ते ५ श्लोक सोप्या शब्दात सांगेन. 

       आता करूणाष्टकांतील, फक्त पुढील दोन ( ९ व १०) स्वबळावर - बुध्दीवर समजण्याची कोशिश करा.  हे ऐकलेच असेल, कोशिश करनेवाले की हार नही होती।

           जननिजनकमाया लेंकरूं काय जाणे ।

              पय न लगत मूखीं हाणिता वत्स नेणे ॥

                 जळधरकण आशा लागली चातकासी ।

                   हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी ॥ ९ ॥

          तुजविण मज तैंसे जाहलें देवराया ।

              विलग विषमकाळीं तूटली सर्व माया ॥

                सकळजनसखा तूं स्वामि आणीक नाहीं ।

                    वमकवमन जैसें त्यागिलें सर्व कांहीं ॥ १० ॥

    तुजविण= क्षमतेविण. चातकाची आस ही क्रियेविन असते. no adjustment.

   विषम काल= संकटकाल. वमक= आळस.  वमन= टाकणे. तर अाज व उद्या दोन दिवस, तुमच्याकडे आहेत.  १ ते १० वाचा परत परत. ओके. आणखी काय सांगू. नेहमीचेच.काय बरे?.😉😊   ॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू