श्रीराम जय राम जय जय राम॥ एका गीता जयंतीला सुरू झालेला, हा संग्राम आज प्रत्ययास येत आहे

 २२. १. २०२४ . श्री राम जयराम जय जय राम। एका गीता जयंतीला सुरू झालेला, संग्राम आज प्रत्ययास येत आहे.

     हिंदु भक्त हो,आज कित्येक वर्षांपासून ही हाक देत, व राम राज्याची अास मनी बाळगत, अनेक पिढ्या ईश्वर चरणी लीन झाल्या. त्यात माझी आजी( जिला सर्वजण काकी म्हणत) . तिचाच हा वरील जप होता. तिची ही अास होती, तेथे रामराजा वनवासात आहे, तो महाली कधी राहील. 

                   हे श्रीरामाऽ ऽ ऽ 

            एक आस मज एक विसावा, 

             एकवार तरी राम दिसावा ॥

      हे व अशीच गीते  आळवली गेली. मग ग.दि.मा.च्या गीत रामायणाने,मराठी मनाचा ठाव  घेतला. पण सर्वांत वरचढ ठरले, माननिय रामानंद सागर. त्यांनी , दूरदर्शनाचा, खरा उपयोग करून, जनमानसात, श्रीरामाला विराजमान केले. जेव्हा रामायण दाखवले जाई, तेव्हा रस्ते सामसूम असत.  मला सांगायला खेद वाटतो. आपल्या निधर्मी संविधानाच्या, काही कलमानुसार, हिंदू धर्माच्या ग्रंथाचे वाचन शिक्षण, शाळेतून देणे, कायद्यात बसत नव्हते. तेव्हा या महान विभुतीने( रामानंद सागर), स्वतःला आर्थिक खार लावून,  दूरदर्शनाच्या माध्यमातून, लहान थोर, समस्त जनतेला, श्रीरामाच्या  मालिकेतून, रामायतनाचा समग्र परिचय घडविला. आज जी पिढी रामोत्सव करीत आहे. त्यांना, त्या मालिकेतूनच धर्म शिक्षण दिलेय.  अन् अयोध्देची महती पटवली आहे. अर्थात् त्यांना कलाकार ही  खरे अदाकार लाभले. ते त्या त्या भूमिका जगले. त्यांनी रामलक्ष्मण व सीता हनुमान साक्षात, समक्ष उभे केले. दूरदर्शन हे शिक्षणाचे मोठ्ठे साधन आहे, असे मा. रामानंद सागर यांनी सिध्द केले.  असेच पुढे चालत  राहील, अशा श्रध्देवर, आमची पिढी जगली. पण हाय रे देवा! आज त्या सिध्द साधनाचा दुरूपयोग होतोय. नको ते हिंस्त्र व अश्लील दाखवले, जातेय. रामा रघुनंदना,यांना सुबुध्दी दे रे। समर्थरामदास स्वामींनी रामरायाकडे, सर्व जनतेसाठी - जनतेच्यावतीने मागणी मागितली होती.

       ती दे रे रामा! तु आज प्रगट झाला आहेस, तर तेही होईलच, अशी श्रध्दा आहे. 

        कोणी, मला काही म्हणो, अंधभक्त म्हणो वा निंदा करो,पण आज, आपल्याला, " हा" सात्विक आणि कार्यशील- विकास शील शास्ता लाभला आहे, हे या भारत देशाचे भाग्य आहे. दशावतारातील, दहावा अवतार,                " कलंकी केशवा" आहे. तो कलीयुगात येणार आहे. हे ठरले होते. पण विश्वमान्यता लाभली तरी त्याला स्वकियांकडून निंदा नशिबात असणार. म्हणून तो कलंकी केशवा आहे.( पहचान कौन?) तर आजपासून थोडे राममय होऊ या. सर्वांवर , रामबाण" उपाय मिळवू या. मग चला बरे, उद्योगाला लागू या. व इतर ही सात्विक जनांना सोबत घेऊ या. तर मग काय करणार बरे।

        ॐ श्री ॐ श्री ॐ श्रीरामा ऽ ऽ ऽ ऽ रे! 

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू