छ. संभाजीमहाराज लिखित संस्कृत ग्रंथ, " बुधभूषण" मधील बहुमोल सल्ला.

 २३.१ .२०२४.

     छ. संभाजीमहाराज लिखित संस्कृत ग्रंथ, " बुधभूषण" मधील बहुमोल सल्ला.

     सुज्ञ वाचक हो, आज आपण सर्व भारतिय आनंदाच्या सागरात आहोत. त्या माननिय रामानंद सागरांना शतशः वंदन, ज्यांनी त्या वेळच्या मुलांना, श्रीरामाची महती सांगितली व त्यायोगे, त्यांना हिंदुत्वाची दिशा दाखवली होती. त्याच बिजांचे आज रामोत्सव द्वारे- वृक्षांत रूपांतर दिसत आहे. अन् सर्व जनता आज हा उत्सव,मनापासून व श्रध्देने  साजरा करू शकत आहे.

          जर आपल्याला, जीवनात काहीतरी चांगले करायचे असेल, तर मुख्य आपल्याला - स्वतःला ओळखा. आपली योग्यता व क्षमता जाणून घ्या. मी नेहमी एक श्लोक सांगते.         "राम"चा  अर्थ क्षमता. त्याची खरी दखल घ्या. 

          बहुदा सर्व गुणार्थी असतात. विद्यार्थी/ ज्ञानार्थी कोणी नसतात. पदवीसाठी विशिष्ट प्रकारे अभ्यास करतात. पण सखोल अध्ययन करणे, होत नाही. 

    म्हणूनच मी शंभुराजेंच्या या, "बुधभूषण" ग्रंथाची ओळख, अापल्या वाचकांना करून द्यावयाची ठरवली. हां इथे मी "छत्रपती"  ही उपाधी लावली नाही. कारण हा ग्रंथ, शंभुराजांनी वयाच्या १६.१७ व्या वर्षी लिहिलाय. हा परिचय लहान मोठ्यांना फायद्याची होणार आहे. 

     शंभुराजेंनी प्रारंभी ईश स्तवन करताना गणेश, शिव शारदा या देवतांबरोबर गुरूंचे स्तवन केले. त्यात त्यांनी गुरू कसे असावेत. हे सांगितले आहे.  हे वर्णन छत्रपती संभाजीमहाराजांच्या व्यक्तीमत्वाचे  नेमके दर्शन  दाखवत आहे.

       बघा हा श्लोक हं, 

          अज्ञानकृष्णसर्पेण, दंशिता भुवि मानवाः ।

           तेषां जीवनहेत्वर्थे, नौमि जांगुलिकं गुरूम् ।। ४ ।।      ह्या जगतातील माणसांना,  जणू अज्ञानाच्या कृष्णसर्पाने डंख मारला आहे. त्यांना जिवंत (मनाने)  ठेवण्यासाठी , " गुरूरूपि विषवैद्यकांची (सर्पाचे विष उतरविणार्‍या) हेतूपूर्ण निवड  केलेली असते. त्याला शरण जाणे, हितकारक असते. 

        आता बुधभुषणातील समृध्द शैली अभ्यासू या.

      ह्यात ते सूर्याचे स्तवन करत आहेत. बघा.


  सिन्दूरस्पृह्या स्पृशन्ति किरणं कुम्भस्थमाधोरणा ।

  भिल्ली पल्लवशंकया विचिनुते सान्द्रं द्रुमद्रा ।( द्रो? णिषु)

  कान्ताः कुंकमशंकया करतले मृद्रन्ति लग्नंम् यत् ।

  त्ततेजः प्रथमोद्भंव भवकरं, सौर चिरं पातू वः ।। ६१ ।।

  

अर्थ:- सुर्याचे किरण, जणू हत्तीच्या गंडस्थळ मस्तकावर पडल्याने, सिंदूराप्रमाणे चमकत आहेत

   अन् भिल्लीणी तो ओला सिंदूर समजून, द्रोणात  घेऊन, कुंकुम समजून लावत आहे. हे सुर्या, तुझे हे उदय काळीचे पहिले तेज आम्हाला पावन करो.

 

 अाता नीट विचार करा, असे प्रतिभावान  साहित्यिक शेैलीवान व धैर्यशाली साहसवान धर्मनिष्ठ प्रजाहितदक्ष छत्रपती संभाजी महाराज, आपल्याला दिर्घकाल प्रशासक म्हणून लाभले असते, तर आपण नक्कीच विश्वाचे राजे असतो.

    असो. आज आपल्याला सुदैवाने योग्य प्रशासक लाभला आहे, तेव्हा follow, "HIM"  & follow my blogs also and be enrich yourself with proper knowledge  and share to your dears and nears.

मोदींनी, राम मंदिराच्या,सर्व कामगारांवर, पुष्पवृष्टी केली. छोटीसी गोष्ट, पण सर्व कामगार आनंदित झालेत.

होय, कारण त्यांना श्रमिकांच्या श्रमाची जाणिव आहे. तसेच ते संवेदनशील आहेत. 🙏🏻

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू