कालच्या श्लोकाचा अर्थ व सकल छत्रपतींचे आजच्या मराठेशाहीला आव्हान.

 २५. १. २०२४. कालच्या श्लोकाचा अर्थ व सकल छत्रपतींचे आजच्या मराठेशाहीला आव्हान.

   सुज्ञ व विचारवंत वाचक हो, मी हे जे लिखाण करत आहे, ते देशाभिमानी लोकांना  क्रियाशील करण्यासाठी व track वरून घसरलेल्या,अजाण मंडळींना मार्ग दाखवण्यासाठीच.         *॥*तुम्ही बहुदा पहिल्या वर्गातच असाल ही अपेक्षा व आशा आहे. तर कालच्या शंभुराजांच्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊ या. हे आव्हान, आपल्या लाडक्या शंभुराजांनी, समस्त छत्रपतींच्या वतीने, अाजच्या व पुढील प्रजेला केले आहे.  छत्रपती शिवाजींना मानत असाल तर योग्य विचारी नागरिक बना.🙏. जमेलच तुम्हाला. इच्छा तेथे मार्ग.

              Try try until you succeed.  Then start your path.                      

                मेधावी, मतिमान, दीनवदन, 

                दक्ष, क्षमावान,  ऋजु: ।

             धर्मात्मा, अपि अनुसुयको,लघुकर:,

             षाङग़ुण्यविद्, शक्तिमान् ।

          उत्साही पर रंध्रविद् कृतधृति:,

           वृध्दिक्षयस्थान् विद् ।

              शूरो, न व्यसनी, स्मरति उपकृतं, 

             वृध्दापसेवी च य:।। २ ।।     

                     त्यांनी, राजा व प्रजा कशी असावी, म्हणजे, " रामराज्य" अवतरेल, हे सुचित केले आहे. 

               मेधावी= बुध्दिवान व मती म्हणजे ही बुध्दीच पण मतीवान म्हणजे बुध्दीचा योग्य उपयोग करणारी. 

                दीनवदन= नम्रगुण युक्त.

                 दक्ष= सावध पण क्षमावान. समोरच्याला बरोबर जोखणारी पण लगोलग प्रतिक्रिया न देणारी असावी. क्षमाशील व क्षमावान मध्ये मोठा फरक आहे.  क्षमाशील म्हणजे अपराध्याला माफी करणे. पण क्षमावान म्हणजे मनात समोरच्यासाठी दया असणे. पण सुधारण्याची संधी देणे. otherwise<*>

                धर्मात्मा= स्वतःचा धर्म जाणता व पाळता असा   महा पुरूष.

  अपि तसेच अनसुयको, म्हणजे शिघ्र कोपी नसणारा असा राजा व त्याची प्रजा ही तशीच असणे, अावश्यक आहे. तसेच लघुकर= राजाने कमी प्रमाणात कर बसवावा, प्रजेने ही तो " कर" सचोटीने भरावा.

  षाङ गुणविद्= षट गुणांची जाणिव असणारे असे, सर्व शक्तिमान राजा व प्रजा एकत्र आल्यास सर्व मंगलमय़ होईल. असा अाजचा भारत वर्ष होवो. त्यासाठी आपण सर्व शपथ घेऊ या. आठवतेय ना, शालेय पुस्तकांत प्रतिज्ञा. ती वाचा व वचनबध्द होऊ या. पुढील श्लोकाचा अर्थ उद्या सांगते.   ती ," प्रतिज्ञा"  आत्मसात केली तरच समजेल, छ.शंभुराजेंचे मनोगत, rather  उमजेल अन् जाणता राजा व प्रजा निर्माण होईल.  असा राजा= शासनकर्ता तर आपल्याला लाभलाच आहेच . तर आपणही जाणते होऊ या. तर मग वाचा- :-

                  *  प्रतिज्ञा*

     भारत माझा देश आहे.सारे भारतीय, माझे बांधव आहेत.

        माझ्या देशावर , माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृध्द आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. 

        बघा हेच . अशी लायकी व पात्रता व सुयोग्य नागरीक होण्याची ओढ असावी, हेच शंभूराजे कळकळीने सांगत आहेत.  दुसर्‍या श्लोकाचा अर्थ व उर्वरित , "प्रतिज्ञा, उद्या आत्मसात करू या. मुख्य म्हणजे, काल सांगितल्याप्रमाणे, कोणाच्या foot prints follow करण्यात आपले हित आहे, हे जाणून घ्या. शंभुराजांचे सांगणे. follow करा. विसर न पडो, त्यांच्या बलिदानाचा. हे सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्याची, जबाबदारी पार पाडा. बस. आणखी काय सांगू? 

     

          मनात सलते ती आठवण।

          दिसतो नयना मरता  शंभुराणा ।।

            घळ घळ गळते नेत्री शोकाचे पाणी।।।. 

      ⛺ 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢⛺

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू