रामरक्षा २ ते ६. आपल्यातील, , " आत्मारामाला" समजून, त्याची शक्ती मिळवा.

 3.1.2024.रामरक्षा. श्लोक २ ते ६. 

 आपल्यातील, " आत्मारामाला" समजून, त्याची शक्ती मिळवा.

        भक्ती हीच शक्ति, अशी इच्छा धारण करणार्‍या, माझ्या प्रियतम वाचक हो,  आता रामरक्षाचे पुढील श्लोक आत्मसात करू या. ज्या योगे, आपण ही समर्थ व यशस्वी होऊ या.                             

  श्री रामरक्षास्त्रोतम्

      ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम्‌ ।

        जानकीलक्ष्मणॊपेतं जटामुकुटमण्डितम्‌ ॥२॥ 

हे रामजी कसे आहेत, तर ते नीलकमलाप्रमाणे, मेघश्याम आहेत. राजीवलोचन आहेत. त्यांचा केससंभार हाच जणू मुकुट आहे, असे जे राम आहेत, त्यांचे लक्ष्मण व सीतेसह, असे स्मरण करा कि ते लक्ष्मण व सीतेसह  सामोरे मूर्तीमंत ठाकतील.

आता यापुढे तुम्हाला समजून येईल कि, श्रीरामाचे स्मरण कसे स्वत:ला फायदेशीर ठरणार आहे

      

          सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तं चरान्तकम्‌ ।

         स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम्‌ ॥३॥

         

           श्रीरामजी सर्वव्यापक  आहेत. हे आपल्याला उमजले आहेच, कारण आपण   "राम" चा   अर्थ ,"क्षमता" हे जाणत आहोत. या अर्थी ते सर्वव्यापक आहेत. अजन्मा आहेत. त्यांच्या हातात खड्ग धनुष्यबाण आहे त्यायोगे ते दुष्ट शक्तीचा संहार, आपल्या लिलातून करणार आहेत. म्हणजेच  आपल्यात, त्यांनी दिलेली " क्षमता " नेमक्या वेळप्रसंगी वापरण्याची बुध्दी व आत्मविश्वास तो राम आपल्याला देवो.


        रामरक्षां पठॆत्प्राज्ञ: पापघ्नीं सर्वकामदाम्‌ ।

           शिरो मे राघव: पातु भालं दशरथात्मज: ॥४॥


आता आपण सर्व सु इच्छापूर्ति व पापांचा नाश होण्यासाठी

रामरक्षा वाचन करत आहोत. राघव माझ्या मस्तकाचे व दशरथपुत्र ललाट व ललाटलेखाचे रक्षण करो.

          कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रिय: श्रुती ।

             घ्राणं पातु मुखत्राता मुखं सौमित्रिवत्सल: ॥५॥


कौशल्यानंदन माझ्या  नेत्रांचे रक्षण कर. हे! विश्वामित्रांव्या प्रियसखा रामा,माझ्या कानांचे रक्षण कर,   हे यज्ञरक्षक रामा,माझ्या नाकाचे रक्षण कर, हे सुमित्रावत्सल, रामा माझ्या मुखाचे रक्षण कर.


           जिव्हां विद्यानिधि: पातु कण्ठं भरतवंदित: ।

             स्कन्धौ दिव्यायुध: पातु भुजौ भग्नेशकार्मुक: ॥६॥


हे विद्यानिधी रामा, माझ्या जिह्वेचे( जीभेचे) रक्षण कर. तु जो भरताला वंदनिय आहेस, अशा रामा, माझ्या कंठाचे रक्षण कर. ज्याच्यापाशी दिव्यायुध आहेत,अशा रामा, माझ्या खांद्यांचे रक्षण कर.. श्री शंकर भगवानाचे धनुष्य

(सीतास्वयंवराच्या समयी) भंग करणार्‍या रामा, माझ्या भुजांचे रक्षण कर. 

  या प्रकारे सर्वांगाचे रक्षण, तो श्रीराम करतो, फक्त त्याला अंत:करणापासून हाक द्या, तो साद (प्रसाद) देतोच. म्हणून या श्रीरामाची आराधना करणे, आपल्याला सुखी करणार आहे. दिवसातून फक्त १५ मिनिटे वाचन करून, सर्वांगाचे रक्षण होणार असेल तर तेवढा वेळ मन एकाग्र करण्याने काही नुकसान तर नाही होणार नं. मग एरवी थोडा time pass कमी करून , हे स्व:कार्य करा. अन् आपल्या स्वकियांना ही, या मार्गी आणा. म्हणजे like&share these blogs to your nearest & dearest.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू