रामरक्षा. आपली रक्षा. आपल्यातील आत्मक्षमतेचे रक्षण . ७ ते १०.
४.१ .२०२४ रामरक्षा आपली रक्षा. आपल्यातील आत्मक्षमतेचे रक्षण. ७ ते १०.
माझ्या आत्माभिमानी वाचक हो, तसे पाहता, आपल्यातील , " क्षमता" आपण ओळखून , तिचा उपयोग व उपभोग, आपणच करावयास हवा. म्हणजेच तिची रक्षा- रक्षण होणार. पण त्यासाठी शक्ती, ही भक्तिनेच मिळते.
रामरक्षा पठण, आपले कसे कसे रक्षण करत असते, ते कळले असेलच. हां, कोणी म्हणेल असे कधी होते का?
ठिक आहे, अंधविश्वास ठेवूच नका. फक्त दिवसातून ५ मिनिटे काढून, सध्या हा ब्लॉग वाचा. काही तरी प्रसन्नचित्त जाणवेल, तेव्हा दिवसातून एकदा पूर्ण रामरक्षा म्हणा. निदान मुलांच्यात, ह्या वाचनाने, एकाग्रता वाढलेली दिसून येईल. चला तर मग. Let us try. अर्थासहीत वाचून बघा बरे.
करौ सीतापति: पातु हृदयं जामदग्न्यजित् ।
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रय: ॥७॥
हे सीतापती, माझ्या हाताची रक्षा कर.जमदग्निपुत्र परशुरामजींना जिंकणार्या श्रीरामा, माझ्या ह्रदयाची क्रिया सतत योग्य रितिने चालत राहिल, अशी कृपा कर. खर नावाच्या राक्षसाचा वध करणार्या हे रामा, माझ्या मध्यभागाचे रक्षण कर. हे प्रभुरामा, जंबुवानाला जसे तु आश्रय दिलास, तसेच माझ्या नाभिचेही रक्षण कर.
सुग्रीवेश: कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभु: ।
ऊरू रघुत्तम: पातु रक्ष:कुलविनाशकृत् ॥८॥ हे रामा, सुग्रीव तुला स्वामी मानतो, त्याचप्रमाणे, तु माझाही स्वामी आहेस, तेव्हा तु माझ्या कमरेचे रक्षण कर.
हनुमानाच्या स्वामी प्रभु रामा, माझ्या सर्व हाडांचे रक्षण कर. सर्व राक्षस कुलाचा नाश करणार्या रघुकुलश्रेष्ठा , माझ्या
उराचे(वक्षाचे) रक्षण कर.
जानुनी सेतुकृत्पातु जङ्घे दशमुखान्तक: ।
पादौ बिभीषणश्रीद: पातु रामोSखिलं वपु: ॥९॥
सेतुकर्त्या रामा, माझ्या मांड्याचे रक्षण कर. रावणाचा वध करणार्या रघुराया, माझ्या जांघाचे रक्षण कर. बिभिषणाला राज्य व ऐश्वर्य प्रदान करणार्या श्रीरामा, माझ्या चरणांचे रक्षण कर. तसेच तु माझ्या संपूर्ण शरिराचा रक्षणकर्ता आहेस, या बद्दल मला संदेह नाही.
एतां रामबलोपेतां रक्षां य: सुकृती पठॆत् ।
स चिरायु: सुखी पुत्री विजयी विनयी भवे.१०॥
या प्रकारे पठण कर्त्याचे, रक्षण करून तु श्रीरामा, त्यांना सक्षम व बलवान करतोस, निश्चित. या माझ्या वाचकांना, तु चिरायु, सुखी ठेवतोस. विजयी व विनयी पुत्रांची प्राप्ती करून देतोस. हे करूणानिधी, ही कृपा माझ्यावर व माझ्या वाचकांवर सतत कर. तुम्ही वाचक हो, जर श्रध्दा ठेऊन वाचाल तर, सकल संकटातून वाचाल. निदान प्रयोगस्वरूप तरी वाचा अन् ह्याचा प्रचार व प्रसार करा. कसा ते सांगणे, न लगे. तुम्ही सुज्ञ आहातच. तर उद्या भेटू या. त्या अयोध्या नगरी, मनोजवं मरूत् वेगाने, जाऊ या. घर बसल्या, ही भक्ती मिळवू या.
॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥
Comments
Post a Comment