आपला आत्माराम जागृत ठेवा अन् रामकवच मिळवा. रामरक्षा ११तेच १५
५.१ .२०२४ . आपला आत्माराम जागृत ठेवा.अन् रामकवच मिळवा. रामरक्षा ११ते १५.
सक्षम व आत्मारामाला ओळखण्यार्या वाचक हो, पुढील श्लोकांचे अध्ययन करून, स्मरणशक्ति वाढवू या.
पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिण: ।
न द्र्ष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभि: ॥११॥
जे जीव पाताळ पृथ्वी व आकाशात वेगळ्याच रूपात(सोप्या शब्दात, भुतेखेते) वावरतात आणि मनात कपट राखून आसतात, त्यांच्या नजरा, श्रीरामाच्या नामरूपी कवचधारी लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. म्हणजेच रामजप करणार्यांना असल्या जीवांपासून भय नसते.
रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन् ।
नरो न लिप्यते पापै भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥१२॥
तसेच श्रीरामाचा सदैव व सतत जो जप करणारा, तो कधीही पापकर्माला आपलेसे करू शकत नाही. तो नेहमी पापभीरू असतो. येवढेच नाही तर, त्याला नेहमी चांगले भोग व मोक्ष प्राप्ती होत असत.
जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् ।
याय: कण्ठे धारयेत्तस्य करस्था: सर्वसिद्द्दय: ॥१३॥
जी व्यक्ती हे सर्व जगावर विजय मिळून देणार्या सुरक्षित अशा रामनामाचा जपाचे, पाठांतर करून, केव्हाही कधीही स्मरण करू शकतो, त्याला सर्व सिध्दी प्राप्त होतात. म्हणजेच तो जी विद्या शिकण्याचे ठरवतो व प्रयत्न करतो, त्यात त्याला निश्चित यश मिळते. स्मरणशक्ती वाढून, अभ्यासात यश मिळते.
वज्रपंजरनामेदं यो रामकवचं स्मरेत् ।
अव्याहताज्ञ: सर्वत्र लभते जयमंगलम् ॥१४॥
जी व्यक्ती या वज्रपंजर नावाच्या रामकवच्याचे निरंतर स्मरण करते, तिच्या आज्ञा सर्व ऐकत असतात. त्यामुळे अशा व्यक्तीचे सदैव मंगल होते व त्यांना विजयश्री माळ घालते.
आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हर: ।
तथा लिखितवान् प्रात: प्रबुद्धो बुधकौशिक: ॥१५॥
भगवान शंकरजींनी, बुध कौशिकांच्या स्वप्नात येऊन, या रामरक्षा स्त्रोत्र सांगितले व लिहिण्याची आज्ञा केली. त्यांनी तशीच आज्ञा पालन केली. आणि सामान्यासाठी हे कवच उपलब्ध करून दिले.
त्याचा आपण उपयोग करून घेतला नाही, तर आपण समर्थांच्या शब्दात मूर्खच ठरू. त्यासाठी परत आठवण करा. जंगलात लूटमार करणार्या, वाल्या कोळ्याला नारद मुनींनी राम नामाचा जप दिला. तो अविरत करून वाल्याचा वाल्मिकी मुनी झाले. व त्यांच्या हातून, रामायणाचे लिखाण घडले. अयोध्येजवळील वनात त्यांच्या निंदकांची कट सीता व लवकुश वाढले. त्या दोघां रघुरायांच्या पुत्रांच्या मुखातून श्रीरामचरित श्रीरामांनी ऐकले. हे त्याकाळी घडलेय, त्याला आजच्या जमान्याचा scale कसा लावून चालेल. तेव्हा फक्त विश्वासाने, रामनाम जप करा. त्या श्रीरामाचे कवच धारण करा. म्हणजेच,आत्माराम जागृत करा. अन् सर्व क्षेत्रात, "निखळ यश" मिळवा. व इतरजनांना ही यशाची गुरू किल्ली द्या. ती कशी द्यावयाची, ते वेगळे सांगायला नको.ONLY SHARE THESE BLOGS TO EVERY PERSON WHO ARE DEAR AND NEAR TO YOU.
Comments
Post a Comment