रामरक्षा ही आपल्यासाठी कल्पवृक्षच आहे.

 ६.१ .२०२४ .   रामरक्षा ही जणू, कल्पवृक्षाप्रमाणेच आहे.  

    माझ्या सुज्ञ वाचकहो, ह्या रामरक्षेच्या, पठणामुळे, मुलांची, तरूणांची स्मरणशक्ती वाढते. even म्हातारपणी, ही जी विस्मरणाचा आजार संभवतो, त्यावर ही "रामरक्षा"  हा रामबाण उपाय आहे.  बहुतेक जण,सत्संग - गुरूमावली वगैरे, करतात. पण मन स्थिर नसते. तेव्हा, घरबसल्या, फक्त, हा रामबाण वापरा. बरे. तर आता, पुढील १६ ते २० श्लोकाचे अध्ययन करू या.

आरामः कल्पवृक्षाणां रामः श्रीमान् स नः प्रभु,

अभिरामस्त्रिलोकानां राम: श्रीमान्‌ स न: प्रभु: ॥१६॥


श्रीराम आपले प्रभु परमेश्वर आहेत. ते आपणासाठी जणू कल्पवृक्षासमान आहेत. जे आपल्याला सदैव दिलासा ( आराम)  देतात, आपली सर्व संकटे दूर करतात. अशा विश्वात, सुंदर असलेल्या  राघवावर आपण फक्त पूर्ण भरोसा ठेवला पाहिजे. आता भरवसा ठेवणे, नितांत सुंदर अाहे. सुंदर म्हणजे दिसायला छान असा अर्थ नाही. तर सत्यम् शिवम् सुंदरम् हे समजून घेणे जरूरी आहे. शिवम् म्हणजे  असणे सत्यम् म्हणजे जे चिरंतर व शाश्वत आहे. ते सुंदरम् म्हणजे प्रसन्न चित्त करणारे. हर्षवर्धक आहे.


तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ ।

पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ॥१७॥

             हे रघुरूप कसे आहे तर चिर यौचन, सुंदर( वर सांगितल्याप्रमाणे), बलवान व त्यांचे नेत्र कमलाच्या पाकळी सारखे आहेत.व त्यांनी, मुनीप्रमाणे वस्त्र परिधान केलेली 


फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ ।

पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥१८॥


राघव नियमित फलाहार व कंदमुळेच  खातात. व मुख्य म्हणजे ते संयमी व तपाचरण करतात. जरी ते वनवासाला सीतेसमवेत गेले होते तरी त्यांनी ब्रह्मचर्य व्रतपालन केले होते. असे राजा दशरथांचे दोन्ही पुत्र राम लक्ष्मण आपले रक्षण कर्ते आहेत.


शरण्यौ सर्वसत्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम्‌ ।

रक्ष:कुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघुत्तमौ ॥१९॥


असे हे रघुश्रेष्ठ मर्यादा पुरूषोत्तम महाबलवान, आपल्या समस्त प्राणीमात्रांचे शरणदाता आहेत. शिवाय ते कसे आहेत तर सर्व धनुर्धारीजनात श्रेष्ठ व सर्व दुष्ठ शत्रुसंहारक अशा सैनिकांना वंदनिय आणि आदर्श आहेत. आजच्या काळात धनुर्धारी म्हणजे आज स्वदेश व स्वधर्म रक्षणासाठी लढणारे सैनिक व  समस्त नागरिकांच्या रक्षणार्थ  धडपडणार्‍या पोलीस वर्गाला ते सहकार्य करतात. फक्त त्यांची आराधना मनःपूर्वक करणे आवश्यक आहे. (वअसे ऐकिवात आहे कि. माहीमच्या दर्ग्यात - पण तेथे पूर्वापार कोण विराजमान आहे, ते  राम जाणे. आज श्रीराम, अयोध्येत, विराजमान होत आहेत. लवकरच , भोळे सांब ही सर्वत्र दर्शन देतील)


आत्तसज्जधनुषा विषुस्पृशा वक्षया शुगनिषङ्‌ग सङि‌गनौ ।

रक्षणाय मम रामलक्ष्मणा वग्रत: पथि सदैव गच्छताम्‌॥२०॥

       श्रीरामांनी धनुष्य सज्ज केले आहे, प्रत्यंचा ताणली आहे,  भात्यातील बाणांना स्पर्श केला अाहे. व जणू त्यांचे  हात खल निर्ग्रहणासाठी शिवशिवत आहेत. पण हाय कर्मा! आपण अभागी! श्रीरामाच्या जन्मभूमिवर मंदिर उभारत आहोत. व या रघुकुल बंधूच्या (राम व लक्ष्मण)  स्वागताऐवजी, त्यांना, आपली अजाण बालके( अजाण वयाने नव्हे तर  इर्ष्येच्या भावनेतून व स्वार्थापायी अडवणूक करत आहेत. असो.  बघा तर  ह्या वाचनानंतर कोणत्याही ४ ओळींचे पाठांतर करा बरे, अगदी कमी वेळात, सहजगत्या साध्य होते ना! मग हे व्रत चालूच ठेवू या. आहात नं माझ्या सोबत. तर इतरांना ही आमंत्रण द्या बरे, आपल्या ब्लॉगमध्ये.👍👍👍.

<> <> <> <> <> <> <> <> <> <>

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू