चला बरे, आपण ही, हे रामरक्षारूपीकवच धारण करू या.

 ८.१ .२०२४ .चला बरे, आपण ही, हे रामरक्षारूपी कवच धारण करू या.

  रामरक्षा २१ ते २५

  माझ्या प्रमाणेच २२जानेवारीची, चातकाप्रमाणे, वाट बघण्यार्‍या, सच्चा हिंदू बंधु- भगिनीनो, आता आपण रामरक्षारूपी कवचाचे धारण करण्यासाठी,

                पुढील २१ ते  २५, आपलेसे करू या.                                                                 

        संनद्ध: कवची खड्‌गी चापबाणधरो युवा ।

         गच्छन्‌मनोरथोऽस्माकं राम: पातु सलक्ष्मण: ॥२१॥ 

    श्रीराम नेहमीच भक्तवत्सल - म्हणजे भक्तांसाठी तत्पर असतात.  स्वतः कवचधारी  आहेतच. अन्, या रामरक्षेच्या रूपाने, ते  भक्तांसाठी, " कवच" होतात. त्यांच्या हातात, सदैव खड्ग व धनुष्य बाण असतो. आपण जर, सच्चा मनाने, त्यांची भक्ती केली व श्रध्दा ठेवली, तर ते आपल्या बंधु लक्ष्मण समवेत, आपल्यापुढे राहून, संकटापासून, आपली रक्षा करतात.

        रामो दाशरथि: शूरो लक्ष्मणानुचरो बली ।

        काकुत्स्थ: पुरुष: पूर्ण: कौसल्येयो रघुत्तम: ॥२२॥

   कौशिक ऋषी सांगतात, कि राम कसा आहे, तर त्याच्या अनेक नावानुसार श्रीराम, दाशरथी, शूर, लक्ष्मणानुचर, बली, काकुत्स्थ , पुरुष, पूर्ण, कौसल्येय, रघुतम आहे. फक्त त्याचे कोठच्याही नावाने, नामस्मरण करा. 

        वेदान्तवेद्यो यज्ञेश: पुराणपुरुषोत्तम: ।

         जानकीवल्लभ: श्रीमानप्रमेय पराक्रम: ॥२३॥  

  तसेच श्रीराम हे सकल वेदांताचे जाणकार आहेत. ते यज्ञेशः, पुराण पुरूषोत्तम आहेत. जानकीपती व जणू  श्रीमान् व अप्रमेय(अमाप व असीम) पराक्रमी आहेत.

       इत्येतानि जपेन्नित्यं मद्‌भक्त: श्रद्धयान्वित: ।

        अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशय: ॥२४॥

    याप्रकारे, त्यांच्या नामाचा निरंतर जप करणार्‍याला अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य व फळ मिळेल.

           रामं दूर्वादलश्यामं पद्‌माक्षं पीतवाससम्‌ ।

            स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नर: ॥२५॥

        श्रीरामचा वर्ण दूर्वांकूराप्रमाणे, सावळा आहे. त्यांचे नेत्र कमळ दलांप्रमाणे आहेत. राम पितांबरधारी आहेत. राम व कृष्णाचे वैशिष्ट - पितांबर आहे. त्यांच्या वर दिलेल्या नावाची स्तुती व नावाप्रमाणे असलेली, आपल्यातील क्षमता- आत्मारामाचा, योग्य रितीने, उपयोग करणे, हीच खरी  भक्ती होय. पटतेय ना,  माझ्या, सुस्वभावी वाचक हो, मग सदैव सक्रिय रहा. काहीतरी कार्य करीत रहा. मग बघा. इतरेजन, तुम्हाला देवस्वरूपच मानतील. मग व्हा बरे सज्ज. आणि अशा प्रकारे, परोपकाराची ज्योत तेवत ठेवा. व इतरेजनांना ही या सत्कार्यात सामील करा. For that like,( त्यानुसार वर्तन)and share this blog to each person.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू