श्रीराम म्हणजे आत्मिक क्षमता. रामरक्षा २६ ते ३०.
९.१ .२०२४. श्रीराम म्हणजे आत्मिक क्षमता.
रामरक्षा २६ ते३०.
मत्प्रिय आणि धर्मनिष्ट वाचकवृंद हो, तुम्हाला, या रामरक्षेची महती पटली असेलच. या वाचनाने व पाठांतराने, स्मरणशक्तीत वृध्दी होतेच, तसेच, एक प्रकारचा आत्मविश्वास, निर्माण होतो. कोणी हा प्रयोग करून बघितलाय का? नसेल तर आता करा. चांगल्या कार्याला, फक्त ५मिनिटे द्या. अन् बघा चमत्कार.
रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरम् ।
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम्
राजेन्द्रं सत्यसंधं दशरथनयं श्यामलं शान्तमूर्तिम् ।
वन्दे लोकभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम् ॥२६॥
श्रीलक्ष्मणांचे अग्रज, सीतापती, काकुत्स्थ कुळाचे सुपुत्र, करूणाकर, गुण सागर, विप्र ( अध्ययन करणारे) भक्त, परम धर्मनिष्ठ व राजांचे राजा, सत्यनिष्ठ असे दशरथ नंदन हे शामवर्णी व सुशांत आहेत. सर्व लोकांत, ते लावण्यमूर्ती रघुकुलतिलक असे राघव आहेत. अशा रावणांचे शत्रु ठरलेल्या श्रीरामाला, मी वंदन करीत आहे.
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय सीताया: पतये नम: ॥२७॥
श्रीरामा, रामभद्रा( सभ्य), रामचंद्रा, विधातस्वरूपा (विधाता निर्माता), रघुनाथा, हे प्रभो, सीतापती, मी
अंत: करणापासून नमस्कार करत आहे.
श्रीराम राम रघुनन्दन राम राम ।
श्रीराम राम भरताग्रज राम राम ।
श्रीराम राम रणकर्कश राम राम ।
श्रीराम राम शरणं भव राम राम ॥२८॥
हे रघुनंदन श्रीरामा, भरताच्या अग्रजा, भगवान रामा, रणधीर व मर्यादा पुरूषोत्तमा, मला आपले शरणागत माना. रणकर्कश- इथे ह्याचा अर्थ रणभेरी आहे.
श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥२९॥
मी एकाग्र मनाने , आपल्या चरणकमलांचे स्मरण व वाचेने , आपली स्तुती करत आहे. व पूर्ण श्रध्दापूर्वक, भगवान रामचंद्रांच्या पदकमलांना नमन करत आहे व त्यांच्या पायांशी, शरण येत आहे.
माता रामो मत्पिता रामचंन्द्र: ।
स्वामी रामो मत्सखा रामचंद्र: ।
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु ।
नान्यं जाने नैव जाने न जाने ॥३०॥
श्रीराम हेच माझे माता पिता स्वामी व सखा आहेत. असे हे दयावंत श्रीराम माझे सर्वस्व आहेत. त्यांच्या शिवाय मी कोणाला ही जाणत वा मानत नाही.
या प्रकारे जेव्हा कोणीही श्रीरामांशी एकरूप होईल, तेव्हा
मनात काही किंतु उरत नाही. शंका काढणारे शहाणे म्हणतात, अयोध्देला राममंदीर बांधत आहेत. पण त्या मुख्य मंहतांना जेव्हा कोरोना झाला होता तेव्हा कोणीतरी विद्वान(?) बरगळले," काय राम वाचवणार आहे? औषधच घ्यायला पाहिजे. असा इनोद करणारे, हे विसरतात, देव भक्त असणे म्हणजे चमत्काराची अपेक्षा करायची नसते. कर्म हे करावेच. इथे कर्म म्हणजे योग्य औषध घेणे. समर्थ रामदासांनी दासबोधात सांगितले आहेच. रोग असून औषध घेत नाही, पथ्य पाळत नाही, तो मूर्ख. आणि ही व्यक्ति, " नाव लावणार श्रीशंकराचे, ज्यांनी रामरक्षा सांगितली व बुध कौशिक मुनींनी लिहिली. निखिल हे शिव शंकराचे नाव. असो. अशांनी देवांची नावे लाऊ नये. वाचक वर्ग, हे सदैव लक्षात ठेवा, अशी विनाकारण टिका करणार्याच्या नादी लागू नये, तर नेहमी positive thinking असावे. अन् चांगले विचारच मनी बाळगावे. त्यासाठीच मी हा ब्लॉगचा प्रपंच मांडला आहे. मका यश द्या व ह्यासाठी हातभार लावा. कसा तर like& share these blogs every where🙏.
Comments
Post a Comment