प्रजासत्ताक दिन. सर्व शाळांतून साजरा करायचा दिन. आजकाल housing society तून ही साजरा करतात. बहुदा कसे ते(?).
२६. १ .२०२४. प्रजासत्ताक दिन. सर्व शाळांतून साजरा करावयाचा दिन. आजकाल housing society तून ही साजरा करतात. बहुदा कसे ते(?).
भारतदेशवासी नागरिक वाचकहो, तुम्ही अाता कोठे आहात हो, नाराज होऊ नका, पण तीन दिवस सलग सुट्टी मिळालेय, त्यामुळे, सर्व रिसॉर्टस्, मॉल मधील मनोरंजनाची ठिकाणे, हिल्स स्टेशन्स आणि अशीच काही स्थळे दुथडी भरून वाहत आहेत. असो. तरीही त्यातून वेळ काढून, माझा ब्लॉग वाचलात, तर देशाला वाचवाल. पर्यायाने आपले व आपल्या मुलांबाळांचे भविष्य वाचेल. तर आता छ.संभाजी राजेंच्या, " बुधभुषण" या ग्रंथातील, श्लोकाचा पुढील भाग, जाणून घेऊ या.
उत्साही पर रंध्रविद् कृतधृति:,
वृध्दिक्षयस्थान् विद् ।
शूरो, न व्यसनी, स्मरति उपकृतं,
वृध्दापसेवी च य:।। २ ।।
सर्वांनी सदैव उत्साही असावे. रंध्र विद् = स्व दोष जाणणारे असावे अाणि कृतधृतिः ते दूर करून साफल्य मिळवणारे असावे.
राजा व त्याची प्रजा कशी असावी, तर वृध्दी व क्षय कशामुळे होऊ शकतो, त्या स्थानाची व मार्गाची माहिती- विद्- असणारी असावी. विद् = ज्ञान- जाणिव.म्हणून विद्+ वान. हा शब्द प्रचलित आहे. विद्वान= ज्ञानी. शूर तर हवीच. आज सर्वच सैनिक होऊ शकणार नाही. पण गरजू व मुलींना छेडणार्यांना जाब विचारण्याचे शाैर्य असलेली मंडळी, सर्वत्र निर्माण झाली व सर्वच निर्व्यसनी झाले, तर गुन्हे होणारच नाही. त्याकाळी जेव्हा मोगल सैनिक, पोरी बाळींना पळवून नेत असत. त्यांना प्रतिकार व्हावा, ही शिकवण, शंभूराजे देत होते. सर्वच, राजाकडे वा शासनाकडे मागण्यासाठी, हात पसरण्यापेक्षा, त्या करतलाला जोडलेल्या मनगटावर, विसंबून स्वःकष्टाने, रक्षण व पोषण( कमाई) मिळवावे, हे तत्व योग्य आहे नं? तसेच , जर रामराज्य हवे, तर प्रत्येकाने, आपल्यावर, ज्यांनी उपकार केलेत वा संकट समयी मदतीचा हात दिला असेल, त्याची जाण ठेवावी व परतफेड करावी. अन् वृध्दांची सेवा करावी. त्यांचे आशिर्वाद मिळवावेत. बघा हे श्लोक, सर्व प्रसंगी, सर्व काळ, समाजोपयोगी आहेत ना? मग मम प्रिय वाचक हो, हे आचरणात आणणार ना?
अाता वर्तमानात या. आपण, शालेय जीवनात, हीच प्रतिज्ञा घेतली होती ना? मग त्याचा विसर न पडो. ते तत्व मार्कात, उपयोगी नव्हते, म्हणून विस्मरण होऊन दिले, तर देशकार्याचे मरण ओढवेल. आपल्या परिवारातील, संबंधाना ही त्या पोषक आहेत.
बघा पुढील ओळी.
मी माझ्या पालकांचा, गुरू जनांचा आणि वडीलधार्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची, मी प्रतिज्ञा करत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृध्दी ह्यातच, माझे सौख्य सामावले आहे.
बघा बरे! सौजन्यावर, सौख्य अवलंबून असते. तर तुम्हीच ठरवा, सौख्य हवे, तर कसे वर्तन असावे. मी पथदर्शक आहे. पाऊले तुम्हीच टाकायची आहेत. share कराल तर चोहीकडे सौजन्य वर्धित होईल व तुम्हालाच indirectly लाभ होईल व बक्षिसी मिळेल.
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆.
Comments
Post a Comment