माझे पथदर्शन.आपल्या हिंदुत्वाच्या rather ज्ञानभांडाराचा परिचय- ग्रंथ.

 २७.१ .२०२४. माझे पथदर्शन. आपल्या हिंदुत्वाच्या rather ज्ञानभंडाराचा परिचय- ग्रंथ.

 माझ्या ज्ञानार्थी वाचक मित्रमैत्रिणींनो, आपले रामलल्ला आले. हनुमंताची ( पहचान कौन) कमाल. अयोध्देत, अगदी औचित्य साधून मूर्ती स्थापन केली, ती पंचवर्षिय रघुकुल

 तिलकाची. कारण,अयोध्दा ही रामजन्मभूमी आहे. तेथेच त्यांचे तिन्ही बंधुसमवेत, शिक्षण झाले. आज आपल्या लहान थोर मंडळींनी, शिक्षणाचे महत्व  जाणले पाहिजे. तेथेच त्यांचे, बालपण- मोठेपणात बदलले. असो.

      आज मी तुमची ज्ञानलालसा जागृत करणार आहे. तुम्ही कोणत्याही वयाचे असा, नवनवीन माहिती करून घ्यावयाची इच्छा असावी. आजच्या या मोबाईलच्या युगात, गुगलवर सर्व माहिती- सर्व भाषेत मिळते, वेगवेगळ्या शब्दांचे अर्थ गुगल सांगतो. तो काय चमत्कार आहे का?

       अं हं! त्या गुगलकर्त्याने, किती प्रयत्नाने, हे ज्ञान भांडार जमवले असेल, ह्याची जाणिव ठेवा.  सकल जग भरच्या देशांचे ज्ञान तेथे एकवटले आहे हो!

      निदान आपण आपल्या हिंदूंच्या सर्व  ग्रंथाची तोंड ओळख तरी करून घेऊ या. तसे तर आपण सर्वांनी, शालेय जीवनात, हे अभ्यासले आहे. पण कसे तर परिक्षार्थी म्हणून. ४थीतून ५वीत गेल्यावर, मागचे सपाट. असो.

        तर आपले ग्रंथ, ते फक्त धार्मिक नाहीत. तर ज्ञानाने परिपूर्ण  आहेत.उगीच का, ह्यातील कित्येक मूळ ग्रंथ, फ्राँ, जर्मनी इटली व चीनमध्ये आहेत, त्यांना ते घेऊन जावेसे का वाटले असेल बरे? सोचो.सोचो. 

        प्रारंभ:- वैदिक संस्कृती.= मुख्यतः वेद ग्रंथांची निर्मिती. वैदिक संस्कृतीचे वैशिष्ट म्हणजे वाङमय. त्या प्राचीन काळात, एवढ्या मोठ्या प्रमाणात, विविध प्रकारचे   व प्रचंड ज्ञानाने युक्त, "ते ही" सुंदर शब्द भांडाराने भारलेले काव्य व गद्य स्वरूपात नटलेले साहित्य, आपल्याकडे आहे. पण म्हण ऐकलीच असेल ना?  

           " हाती कळसा अन् गावाला वळसा"  

        ह्या आपल्या म्हणी सुध्दा किती, अनुभवाचे बोल सांगतात. जरी त्या चौथीच्या आणि सातवीच्या स्कॉलरशिपच्या, अभ्यास क्रमातील, पुस्तक जवळ बाळगले. अन् ते अधनं मधनं चाळले तरी, कोणी ही, विद्वान होईल.

         वेद चार आहेत. 

        १. ऋग्वेद - ऋ हे अक्षर - हा शब्द ही कित्येक संगणकांच्या font  मध्ये  तयार मिळतो. हे कोणीतरी तयार केलेय ना? कोणासाठी बरे? निदान आपण पेनाने, लिहून बघा बरे!😊.

        २. यजुर्वेद-

        ३. सामवेद-

        ४. अथर्ववेद-

                        नंतर येतो- 

      ५. ब्राह्मणग्रंथ. :-ह्यात जातियवाद शोधू नये. ब्रह्म जाणणारा तो ब्राह्मण. आज कित्येकजण - ब्राम्हण असे लिहितात. पण ह चा उच्चार आधी आहे व म चा नंतर. 

      ६ .आरण्यके.  अरण्यात जाऊन चिंतन करून लिहिलेले साहित्य.

      ७ उपनिषदे:- म्हणजे गुरूंच्या सान्निध्यात, राहून शिकलेले ज्ञान.  बघा हा, " सान्निध्य" हा ही शब्द font मध्ये आहे.  ह्यात तत्वज्ञानाची सखोल ओळख rather परीपूर्ण माहीती मिळते. यात सृष्टीची समग्र माहिती - तिची निर्मिती व ईश्वर याची संकल्पना व तत्वज्ञानाची महती समजते. पंचमहाभूते. तचया साहित्यात,पृथ्वीच्या माहितीला "भुगोल" या शब्दात संबोधले आहे. म्हणजे, आपल्या पुर्वजांना म, पृथ्वी, "गोल" आहे, ह्याची जाण होती.

       ओके, उद्या या सर्व ग्रथांचे जरा जास्त अध्ययन करू या.

       तसेच विदूर नीति - चाणक्य नीति -कबीराचे दोहे व आपलेच बूधभुषण ही संस्कृत ग्रंथ हे जणू प्रत्येक, स्वतंत्र ज्ञान- विद्यापीठेच आहेत. तर उद्या येणार नं, मला भेटायला? याच. त्यात तुमचाच फायदा आहे हो, सहपरिवारव सह मित्रमैत्रिणी या बरे!

       🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू