सावरकर मूर्तिंना जन्म देणार्या मातेचे,आपल्याअंतःचक्षूंनी दर्शन घ्या.
१३. २ .२०२४. सावरकर त्रिमूर्तिंना जन्म देणार्या मातेचे आपल्या अंतःचक्षूंनी दर्शन घ्या.
माझ्या भारतप्रेमी नागरिक वाचक हो, आपल्या सर्व भारतिय बांधवांनी, एकदा तरी, भगूर या स्वातंत्रवीर सावरकरांच्या जन्मगावी जायलाच पाहिजे. खरे तर अंदमानला भेट द्यावी. पण प्रत्येकाला , ते शक्य नसणार. आर्थिक व शारिरीक कारणास्तव. काल मी लिहिले होते. त्या तीन सुपुत्रांना जन्म देणार्या जगन्मातेचे दर्शन घेतले. हो, तुम्ही म्हणाल, सध्य परिस्थितीत सावरकर बंधू ही स्वर्गवासी असताना, त्यांची आई~~ कसे शक्य आहे? पण ते सहजशक्य आहे. आपल्या मनःचक्षूच्या सहाय्याने हे दर्शन घडू शकते. त्या वाड्यात, मन एकाग्र केल्यावर समस्त सावरकर परिवाराचे ," दर्शन" घडते.
या बाबत, एक दाखला देते. माझा एक अंध विद्यार्थी, एकनाथ, बाह्य रितीने पदवी घेत होता. जोगेश्वरीच्या blind workshop मध्ये मी त्याचा अभ्यास घेण्यास जात असे. परिक्षा झाल्यावर, मी जात नसे. तर तो फोन करून म्हणे, मॅडम तुमचे , " दर्शन" कधी होणार? इतर मुले हसत. तर तो सांगे, " आपल्यासाठी, मॅडमचा आवाजच, " दर्शन" आहे. तसेच भगूरला जाऊन, त्या तिन्हीही, त्यागमूर्तींच्या आईचे दर्शन घडेल हो. नक्की भेट द्या. अन् त्या वाड्यात, उपलब्ध असलेल्या, त्यांच्या विषयीची पुस्तके घ्या व वाचा व इतरांना द्या. सर्वांना तेथे जाण्यास, प्रेरणा द्या. येवढे देशकार्य, विनाआयास कराल नं? please please.
तसेच त्यांची कुलदेवी - अष्टभुजा ही तुम्हाला पावन करील.
कळकळ - देशाबाबत कळकळ बाळगा. वाचन करा. अन् तुम्हीच ठरवा. कोण हिंदुह्रदयसम्राट आहे. कोकणात, रत्नागिरीला जा. तेथील त्यांचे समाजकार्य पहा. तेथील त्यांच्या प्रेरणेने, भागोजी कीर व इतर प्रतिष्ठितांनी, निर्माण केलेल्या
" समाज मंदिराला भेट" द्या.
दोन शब्द लिहीत आहे
कळकळ व कलकल. पहिला शब्द positive अन् दुसरा जरा उच्चारात थोडासा फरक. पण अर्थ = negetive= त्रासदायक आवाज. बघा. कळकळ. देशाबाबत कळकळ बाळगाल, तर सुजाण नागरिक बनाल.
कलकल, ही पक्ष्याची मधूर असते. पण कोणी negetive वृतीचे असेल तर तीच किंवा मुलांची बडबड-- कलकल मानतात व त्यांचे डोके कलकलते. मंडळी हे विषयांतर नाही. तर स्वातंत्रवीरांच्या सारखे भाषा/ शब्द विशेष आहे.
तसेच भगूर येथे , विश्वकर्मा मंदीर आहे. त्याची आज खरी गरज काय आहे, ते समजून घ्या.
मी दोन दिवस, भगूर येथे केलेल्या, सावरकर वाड्यातील व खंडेराव मंदिरातील( इथेच त्या तीन ही त्यागमूर्तींची कुलदेवी विराजमान आहे) shooting च्या आधारे, माझ्या युट्युबवरील चॅनेलवर, त्यांच्या महान कार्याची, सत्य ओळख करून देईन.
त्यासाठी, मी खंडोबा मंदिरातील, श्री वसंत खैरे, तेथील रहिवासी.श्री सुधीर साळवी ह्यांची आभारी आहे. आम्हाला गावातून फिरवण्यार्या श्री. दिलिप वाघ ह्यांचे ही आभार. महत्वाचे म्हणजे सावरकर वाड्यावरील उत्कृष्ट देखरेख करणारी मंडळी, श्री. मनोज कुवर व श्री. भूषण कापसे व इतर ह्यांची तर , मी शतशः ऋणी आहे. त्यांनी, मला, प्रत्यक्षात त्या वाड्यात बोलण्याचे भाग्य दिले.अन् त्या महान व्यक्तींच्या, अंदमानमधील बिल्लाची प्रतिकृती, बहाल केली. ते बंधन मानून,मी त्या त्यागमूर्ती- त्रिमूर्तींचे आदर्शवत असे महान देशप्रेम , पुढच्या पिढीपर्यंत, पोहोचवण्यास बध्द असेन. माझ्या जागृत व भारतप्रेमी वाचक हो, मला आपली मदत पाहिजे हो. कशी ते सांगणे, न लगे! like and share this blogs to everybody who are near and dear to you.
.jpeg)


Comments
Post a Comment