आपली ओळख करून घ्या. स्वतंत्र व्हा.सावरकरांनी, " स्वातंत्र्याबरोबर स्वतंत्रतेवर भर दिला आहे.

 १४.२ .२०२४ .  आपली ओळख करून घ्या. स्वतंत्र व्हा. सावरकर‍ांनी, " स्वातंत्र्याबरोबर स्वतंत्रतेवर भर दिला आहे.

    हो, मत्प्रिय सुज्ञान वाचक मंडळीनो, मी या दोन्ही शब्दातील अंतर कित्येकदा सांगितले आहे. आपल्या देशाचे स्वातंत्र आपण मिळवायचेच, हा सावरकर बंधूचा निर्धार, त्यांच्या अलौकिक त्यागाची महती, मी सांगणार आहेच.पण त्य‍ांचे एक सांगणे होते, स्वातंत्र टिकवायचे, तर "स्वतंत्र" व्हा. आज आपले पंतप्रधान ही हेच सांगत आहेत." आत्मनिर्भर व्हा. आजच्या पिढीच्या कळणार्‍या भाषेत बोलायचे, तर Self dependability  हवी. तीच, या त्रिबंधूच्या- तिघांच्या पत्नींनी, आयुष्यभर दाखवली.   काल मी तुम्हाला ही त्यांच्या बद्दलची पुस्तके विकत घेऊन वाचा,असे सांगितले. त्यात एक महत्वाचे पुस्तक म्हणजे

      डॉ. शुभा साठे, ह्य‍ांचे, " त्या तिघी" . त्या तिघांना ,या यज्ञकुंडात साथ देणार्‍या तिघी जावा.  सौ. यशोदा गणेश( बाबाराव) स‍ावरकर, सौ.यमुना विनायक सावरकर व सौ. शांताबाई नारायण( डॉ) सावरकर. यांची देशनिष्ठा. ही गाथा लिहिताना, ह्या शुभा अक्षरशः त्या काळात, त्यांचे जीवन जगल्यात. माझ्या वाचक बंधूभगिनींनो, हे पुस्तक वाचाच. बघा तुमची देशनिष्ठा वर्धन होईल.  खाली पुस्तकांचे मुखपृष्ठ देत आहे. त्याला वंदन करून, हे पुस्तक विकत घेऊन तुम्ही वाचाच.  कारण ते तुमच्या मुलानातवंडाना उत्कृष्ट वारसा होईल. 

       मी कित्येकदा, माझ्या आजीचा ( काकीचा) उल्लेख केलाय. तिचा ही १९४२ साली, या लढ्यात खारीचा वाटा होता. पण  तिच‍ा, तिच्या मुलाला,( म्हणजे माझ्या वडिलांना) आग्रह होता कि, त्यांनी सरकारी नोकरीच करावी. मला मोठी झाल्यावर, ह्याचे नवल वाटले. पण सावरकर‍ांचे हे विचार होते. वर लिहिल्याप्रमाणे, स्वातंत्र मिळवण्याबरोबर, ते टिकवणे ,महत्वाचे आहे. त्यासाठी आपण स्वतंत्र होणे, आवश्यक आहे. त्यासाठी शासनाच्या संपूर्ण खात्यात,आपली माणसे, पारंगत असावी, हा सावरकारांचा आग्रह होता. अन् तो योग्यच होता. माझे वडिल १० महिन्याचे व आत्या  अडीच वर्षाची असताना, आजोबा गेले. पण तिने दोघांना, त्या काळात शिकवले. आत्याला  शिक्षिकेचा पेशा व वडिलांना, C.D.A (nevy) त जाण्यास उद्दुक्त केले. ती ही थोडीफार प्रवचने करीत असे. तिचे आदर्श किर्तनकार ह.भ.प.आफळे बुवा ही, सावरकर भक्त होते. मग माझे समस्त वाचक - सावरकरप्रेमी व्हावेत, ही मनिषा बाळगून आहे. 🙏🙏🙏.



Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू