स्वातंत्रवीर सावरकरांचीच- एज विचारधारा - माझा एक ब्लॉग- पुनःश्च हरी ॐ

 १५.२. २०२४. स्वातंत्रवीर सावरकरांचीच -

 एक विचारधारा- माझा एक ब्लॉग. पुनःश्च हरी ॐ.

          माझ्या सुज्ञ व सुजाण वाचक वर्ग हो,  आज लग्नसराई जोरदार चालू आहे. लग्न म्हणजे, दोन घराणी, एकरूप होणे. ते दोघे जीव - पवित्र बंधनात- एकत्र येणे. त्यासाठी तसेच वातावरण असावे नं? पण आज त्याचा कित्येकदा, "पोरखेळ" चाललेला दिसून येतो. कसा  ते परत वाचा. सावरकरांनी ही अशा अनावश्यक खर्चाला प्रतिबंध केला होता. स्वतः च्या घरच्या विवाह समारंभातून याला आळा घातला होता.  तेव्हा ,माझा या बाबतचा लेख पुनर्वाचनसाठी rather - अमलात आणण्यासाठी देत आहे. बघा. विचार आचार बदला हो.

       १फेब्रुवारीचाच आहे. पण अापल्या समाजाला परत परत hammer करणे,गरजेचे आहे.  

        मत्प्रिय पालक वर्ग हो, काल ब्लॉग लिहिला नाही, का असे वाटते बरे? लिखाणास सुरूवात केली अन् खालून दणादण डिजे व नवरदेव घोड्यावरून जाताना दिसले.  अरे लग्न करा नं, पण इतरांना  आवाजाचा त्रास कशाला?  लग्न म्हणजे काही शौर्य नाही कि, त्याचा दिखावा करून public ला दुखवा~~!   मुलाला नोकरी लागता लागताच लग्नाची घाई का करता हो? त्याच्या कमाईतून, जरा जमाई होऊन द्या नं! मुलींच्या पालकांची, आजकाल, वरपांगी हुंड्यातून सुटका झाली असली तरी एका दिवसासाठी मेंदी मेक-अप हेअर स्टाईल अन् शालूच्या वरताण ड्रेसेस दागिने( जे नंतर कधी वापरले जात नाहीत) हा खर्च - मुलीची हौस म्हणून आईवडिलांवर - मुलीच टाकतात. हा विचित्र हुंड्याचा प्रकार, कायदा काय डोके फोडणार या पुढे! विचार करा. पुर्वी एखाद्या वरपक्षाने, मुलाचा शिक्षणाचा खर्च, हुंडा रूपाने वसूल करावयाचा ठरवला, तर तो खलनायक ठरत असे. पण आजकाल हा खलनायकाचा ( याचे स्त्रीलिंग-  वादातीत ठरेल) role  मुले व मुलीच निभावत आहेत. काहीजण म्हणतील, हा खर्च आमच्या कमाईतून करतोय. ओके. पण आपल्या लग्नाला event रूप देण्यात व दणकून अफाट खर्च करण्यापेक्षा, आपल्या आईवडिलांस, एखादी छान अशी व आरामदायक ट्रिप arrange केलीत तर ☮!  तसेच लहानपणी, ज्या दोन्ही आजी आजोबांनी लाड केले होते, त्यांच्या या वयातील गरजा पुर्‍या केल्यात, तर काय हरकत आहे. त्यांच्या, संभाव्य आजारपणासाठी, fix deposit ठेवा नं, हाच विचार आपले धर्म ग्रंथ सांगत आहेत. खोटे वाटते का? तर ते श्लोक सांगते. तसेच आजकाल बहुतेक मम्मीज job करतात. मुले दिवसाचा अर्धा वेळ baby sitters कडे वाढतात. कित्येक बेबीसीटर, शाळेतील home work ही पूरा करून घेतात. त्यांची आठवण ठेवून,थोडा खिसा मोकळा करावयास काय हरकत आहे. 

           बाकी, त्यांच्यासारखा देशासाठी - त्याग - हाल अपेष्ठा नको, पण हे विचार जाणून घ्या,अहो  हे आचरणात आणाल, तर तुमचाच फायदा आहे. तेव्हा निदान स्वतःसाठी तरी करा हो, हा बदल अन् सर्वदूर पसरवा, हे विचार व आचार. यानि, like & share these blogs to your near & dear.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू