आज मी जे लिहिणार आहे, ते ह्रदयावर कोरून ठेवा. त्यात तुमचेच भले आहे.

 १६.२ .२०२४. 

      आज मी जे लिहिणार आहे, ते ह्रदयावर कोरून ठेवा. तुमचेच त्यात भले आहे. 

       श्रीराम. 

       माझ्या प्रिय देशप्रेमी वाचक मंडळी हो.

          जरा स्पष्ट rather परखड लिहिणार आहे. कृपया नाराज न होता, विचार करा. दोनदा वाचा. मग नक्की पटेल. आज राममंदिर निर्मिती झालीय.पण आमच्या पिढीपासून, कित्येकांना ,एक सवाल बोचतोय. एका महान नेत्याने,  हिंदू धर्म सोडून वेगळा धर्म स्विकारला. अन् एक समाज निर्माण केला. त्यांचे अनुयायी, फेसबुकवर, आम्ही सरस्वती देवी मानत नाही. आमची देवी खरी वेगळी आहे व तीच सत्य आहे, सांगतात. रामाने, सितेला सोडले, ह्याची टिका करतात. पण मग महात्मा बुध्दाने मात्र, सर्वसंग परित्याग केला, असे मानतात. पण त्यांचा पुत्र तान्हा होता, त्यामुळे, नंतर त्या राज्याला, शासनकर्ता कोण होता बरे? श्रीरामाने राज्यकर्त्याचे कर्तव्य श्रेष्ठ मानले. हां, आणखीन् एक आरोप ही मंडळी करतात. सीता रावणाकडे होती, म्हणून तिला अग्निपरीक्षा करावयास लागली. वाचक हो विचार करा.  व्याकरण तर तुम्ही सर्वांनी शालेय जीवनात अभ्यासले असेल. संधी- विग्रह माहित आहे ना? आता बघा, काही शब्द - रत्नपरीक्षा - अश्वपरीक्षा-  म्हणजे  रत्नाची पारख. अश्व परीक्षा म्हणजे घोड्यांची  पारख. अापलीच परीक्षा - या अर्थी- आपले त्या विषयाचे ज्ञान पारखले जाते. मग त्याच धर्तीवर अग्नीपरीक्षा. बघा आपल्यात एक अग्नी असतो.त्याला - उर्जा म्हणतात. त्यालाच आत्म निर्भरता/ आत्मक्षमता असे, " नाव" आहे. त्या स्पुलिंगाची - निखार्‍याची परीक्षा घेतली असणार. काही प्रश्न विचारून, हे का नाही कोणाच्या मनात येत. मुळात सीता ही रामासोबत वल्कले नेसत होती. ती मारिचाच्या सोनेरी झळाळीच्या मोहात पडेल का, हा सवाल समस्त हिंदूना का पडला नाही. आज अगदी आमच्या पिढीतील किती जणांनी वाल्मिकी रामायण अाणि व्यासकृत महाभारत वाचलेय.  आमच्या पिढीपासून, आजची युवा पिढी, एखाद्या बुवाच्याच नादी असते. ह्यांची भक्ती म्हणजे, सत्संग ATTEND करायचा नाहीतर भल्या मोठ्या मंदिरात, लांबलचक रांगा लावून तासन् तास , मंद गतीने पुढे सरकायचे. खरे तर This is waste of manpowers. मी बर्‍याचदा बाहेरगावी जाते. रस्त्याने युवक मंडळी गटाने, हाती झेंडे घेऊन, पायी पायी, एखाद्या मंदीरात जाताना आढळतात. मग वाटेत, गावातील लोक,त्यांना, " रसद" पुरवतात. सांगावेसे वाटते, आपला देव हे असले रिकामे उद्योग करायला नाही सांगत. व्यवसाय करा. स्वतःचा चरितार्थ करा.  दाता व्हा - घेता नको.

     तसेच आपली मध्यमवयीन मंडळी- घरातच गुंतलेली आढळतात. महिला वर्ग मालिकेत गर्क. पुरूषवर्ग क्रिकेट मध्ये गुंग.  एक नोकरी केली कि, डोक्यावरून पूर.  आजच्याच पेपरात वाचले. मुंबई मराठ्यांची. मान्य. पण इतिहास वाचला. तर लक्षात येते इतर प्रांतियांनी, तिला समृध्द केलेय.  जे.जे.हॉस्पिटल- वाडिया हॉस्पिटल- हिंदुजा हॉस्पिटल- नायर हॉस्पिटल - कामा हॉस्पिटलाचे निर्माते कोण आहेत बरे?  हे वाचल्यावर माझ्यावर नाराज न होता सत्य जाणून घ्या. त्याकाळी दादर - बांदर्‍याला जोडणारा खाडीवरील पूल बांधून, मुंबईची  वाढीव कोणी केली? अहो, अाज फक्त एल. जे. रोड म्हणुन माहीती असलेला मार्ग, लेडी जमशेटजी रोड अाहे. तो त्यांच्या स्मरणार्थ कोणी बांधला, हे जाणून घ्या हो, बस, एवढेच सांगणे,आहे.  S.V Road कोणाची आठवण देतोय बरे? विचार करा. आपण ही असे का करत नाही हो? उद्या आपण, सर्वांनी,  शिकलेली एक कविता सांगेन. तसेच जगणे, अविरत, अनेकजण जगत आहेत. तर उद्या येणार नं, माझ्या या लिखित प्रवचनाला?  

      सहपरिवार मित्रमैत्रिणीसह या. means share these blogs.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू