आज शिवजयंती. फक्त त्यांची जयंती साजरी करू नका. तर त्यांचा आदर्श मनी बाळगा व आचरणात आणा.
१९. २ .२०२४ .आज शिवजयंती. फक्त त्यांची जयंती साजरी करू नका. तर त्यांचा आदर्श मनी बाळगा व आचरणात आणा.
माझ्या प्रिय मराठमोळ्या वाचक मित्रमैत्रिणींनो, आज शिवजयंती. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म दिवस. आपण सर्व मोठ्या अभिमानाने व आनंदाने साजरा करतो. जन्मदिवस हा, मग तो कोणाचा ही असो, तो खरे तर मातेचा स्मरण दिन असतो. तीच आपली जन्मदाती असते. जिजाबाईंनी तर अगदी कठीण परिस्थितीत, शिवरायांना जन्म दिला अन् तेव्हाच त्यांच्या हातूनच,जणू मराठेशाहीचे कार्य घडविण्याचा निश्चय केला व पार पाडला. परंतू आज ही त्यांचा आत्मा, तळमळीने विचारत आहे, " कित्येक वरीस, या भारतवर्षात, माझ्या सुपुत्राप्रमाणे, शिवबाप्रमाणे, शास्ता लाभला नव्हता. अन् आज लाभला आहे. तर बहुतेक, मराठा मावळे, त्याच्या सोबत का नाहीत. श्रीरामाचा जयघोष करण्याऐवजी, हे काय चाललेय?
खरे तर, एखादी गोष्ट शिकणे व त्याचा पूर्णतः मनावर संस्कार होणे, हे जीवनाचे सार्थक ठरते. पण त्यासाठी - इच्छा- ईर्षा- जिद्द असावी लागते. तरच त्या क्षेत्रात शिरकाव व सर्वस्वी रुजणे होते. स्वःला त्यात खोलवर तनमनधनाने "रूतणे." हे त्या मातापुत्राकडून शिकावे. या सोबत एका अनाम कारागिरांची, कमाल दाखवत आहे. दुदैवाने, त्या कलावंताने,त्यासोबत आपला परिचय दिला नाही. त्यामुळे, त्यांच्या परवानगीशिवाय, आपल्या ब्लॉगमध्ये, त्यांचे शिवबा चित्रण, प्रदर्शित करीत आहे.
आज शिवबा- छत्रपती शिवाजी महाराज, आपणा समस्त मानस वंशजांना विचारत आहेत, "माझ्या व माझ्या प्रियतम मावळ्याच्या-उंचावलेल्या मूठीत, तरवारीची पलान असे, पण आज आमच्या वंशजांची मनगटे उरफाटी होऊन, हात खाली येऊन मूठ ही उघडी पडलेय. शौर्य कोठेतरी दूर गेलेय, अन् याचना केली जातेय. शौर्य म्हणजे - जीवहानी नव्हे, तर आत्मबळाची क्षमतेची, कर्तृवाची परीक्षा. माझ्या मराठमोळ्या प्रजानन हो, स्वबळावर यश मिळवा. ते मागून मिळत नसते. वरदहस्त व्हा. याचक नव्हे. आज माझी जयंती साजरी करून उद्या विसरू नका. मला," शिवबा ही हाक आवडते. माझ्या नावाने, जो," शिवाजी पार्क" निर्माण झाला, तो तसाच असून देत. "छत्रपती शिवाजी महाराज पार्क" असे नामाभिमान ठेवाल, तर पुढे त्याचे विलायती रूप होईल. CSM पार्क. नको हो, माझी तरी मराठीच ओळख असू द्यात. हो, अन् आज जे गड किल्ले सजवलेत, तेथे जे काही साजरे केलेत, त्याचे अवशिष्ट - कागद बाटल्या- कचरा तेथेच टाकू नका. नंतर अचानक, एखादा, " स्वच्छता दिन" साजरी करायची वेळ आणू नका. बस, आणखी काय सांगू."
हे राजमाता जिजाबाईंचे व त्यांच्या शिवबांचे बोल सदैव स्मरणात ठेवा व आचरणात आणा, ही विनवणी.कोठेही सहलीला वा प्रवासाला गेल्यावर आपली , " ही इस्टेट"( कचरा- बाटल्या पिशव्या डब्बे इत्यादी) योग्य जागी जमा करा.
Comments
Post a Comment