आता निवडणूजा जवळ आल्या. मतदान करायचेय. योग्य शासनकर्ता निवडायचाय
२२. २ .२०२४ .आता निवडणूका जवळ आल्या. मतदान करायचेय. योग्य शासनकर्ता निवडायचाय.
समस्त भारतिय नागरिक हो, सध्या मी माझ्या प्रिय वाचकांशी बोलतेय. पण हे सकल मतदार संघाला उद्देशून आहे. आता बघा, स्व. राजीव गांधींच्या काळात, मतदारांचे वय २१ वरून १८ केले. पण आज शिक्षणपध्दतीचा विचार करता, १८वर्षाची मुलेमुली आपल्या पायावर उभे आहेत का? जे अजून स्वतः कुठले शिक्षण घ्यावयाचे वा काय व्यवसाय करावयाचा, हा व्यक्तीगत प्रश्न स्वतः सोडवू शकत नाहीत. पालक वर्ग हे ठरवतात. त्यांना, शास्ता कसा असावा, हे तरी आकलन होईल का? जी आज वय वर्षे ७५ वरील आहेत, ते आजच्या राजकारणाशी कितपत जोडलेली आहेत? वर्तमान पत्रे वा मिडिया वार्ताहर खरोखर निःपक्षपाती बातम्या देतात का? नुसते ओरड करतात - कोणाला ही जाब विचारतात- जणू शासनकर्त्यासाठी ते न्यायाधीशच बनतात. आता विशिष्ट राजकिय नेता, फक्त तोडाफोडीची भाषा करतो, दुसरा नेता, कानफडात व जोड्यांनी मारण्याची भाषा करतो. एक लहानवयीन नेता ज्याच्या-त्याच्यावर टिका अस्त्र सोडताना दिसतो. असो.
सध्या आपण आपला मतदार संघाचा विचार करू या. त्यासाठी,सगळेच मतदार खरोखर पात्र व सक्षम आहेत का? १८ वर्षावरील जी मुलेमुली शिक्षणापासून फारकत घेतलेली आहेत,सरळ शब्दात drop out आहेत, ते कमावत आहेत. पण कसे रू १२०००/ १५०००/- त्यात वरून girl friend- boy friend मध्ये गुंतलेले. प्रेमाची व्याख्या ही माहित नसलेले. नुकतीच १४ फेब्रुवारी होऊन गेली. काय म्हणतात ते-" व्हँलेंटाईन डे" ते इतके बोकाळलेय, कि आज बालविवाहाला बंदी घालणारे, राजाराम मोहन रॉय, ह्या काळात अवतरले, तर कपाळावर हात मारून घेतील, पालक शिक्षणांच्या मागे, तर मुलेमुली, प्रेमप्रकरणे करून, घरातून पलायन करून लग्न करण्याच्या मागे. हे मतदान काय करणार कर्म! असो.
मी मध्यंतरी एका गावी, वणीच्या पुढे, आदिवासी मुलींच्या आश्रमात," सेवाव्रती म्हणून , एक वर्ष होते. मुली शाळेत गेल्यावर, बर्याच बायका, माझ्याशी गप्पा मारायला येत. एकदा त्या सर्वांनी मिळून, माझ्याकडे तक्रार केली. काय माहितीय, तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत. म्हणे, अहो काकू, मागल्या इलेशनामधी आम्हास भेटली, ती लुगडी वाईच आखूड होती हो, कळले काय ते? अन् एक धिटाईने बोलती झाली, अहो बाई,( सरळ पूर्वी ज्यांचे सरकार होते व आता जे विरोधी पक्षात आहेत, चक्क त्या मोठ्ठ्या पक्षाचे नाव घेऊन) अन् आमच्या सर्व घरवाल्यांना ही कापड द्यावीत नं, दारवा( दारू) कशाला पाजावी अं? मी मुंबईहून गेले होते, म्हणून बहुदा, मला सांगत होत्या. त्यांचा समज मुंबईच सब कुछ आहे. त्या़ंची मर्यादा बघा. मी विचारले (१४.१५ साली), आपले पंतप्रधान कोण हो, तर एकमुखाने उत्तर आले," सोनिया गांधी".अशी असायची पुर्वापार निवडणूक. आता मागच्या वर्षी अशाच एका गावी गेले होते . जरा विचारणा केली, कसे चाललेय, तर बाया वदल्या, " एक चांगले केले, सरकारने, घराजवळ संडास बांधून घातलेत.आता पोरीबाळींना, फहाटीच्या पारी झाडीत जावयाला नगो. आमच्या वेळी, काय हो, हातकंदील जाळून जावे लागे. घासलेटीची आधीच मारामार. आता कसे बेस झालेय. बघा आपण चार भिंतीत जगतो. अन् राजकारणांच्या बाता करतो. तेथील खर्या सापांची , दोन पायांच्या सापा चिलटांचे भय न बाळगता, निवांत जगतो. आता सांगा कोण योग्य शासन कर्ता बरे? सोचो.सोचो. पहचान कौन? तर उद्याही मतदार ( आपण) कसा असावा, हा विचार करू या. मुंबईतील झोपडपट्टीवासियांना तर झाडी ही नशिबात नसते. असो. उद्या भेटू या.
🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩
Comments
Post a Comment