आपण ही गस्त घालू या. गुन्हाची विषवल्ली गाडून टाकू या.
जे शिष्यांना शिस्त- वेळेवर मन लाऊन अभ्यास करणे व परिक्षेत, ते सादर करणे, हे स्मरणशक्तीचे साधन समजाऊन सांगू शकत नाहीत, ते खरे गुरूच नव्हे. असले शिक्षक तर पैसा टाकला तर , पैशाला पासरी मिळतात. तेव्हा असल्या गुरूंपासून दूर राहावे, यातच आपले भले आहे. हा जो दासबोधातील बोध आहे, तो सर्वांना, सर्वकाळ व संपूर्ण आयुष्यभर लागू पडतो. हे चिरंतर सत्य जाणून घ्या व आत्मसात करा. ह व नुकसानीपासून, स्वतःला वाचवा.
जें जें मन अंगिकारी ।
तें तें स्वयें मुक्त करी ।
तो गुरु नव्हे, भिकारी- ।
झडे आला ॥ २०॥
आता बघा, आपण जो गुरू म्हणून choose केला, तोच वेळकाळ न पाहता, मनमानी करत असेल. तर चेल्यांना काय आदर्श राहणार?
चाणाक्ष. चातुर्य. तुर्यावस्था. चतुर.
हे चार शब्द आठवलेय, चतुर्थीवरून.
तर आपला मुद्दा आहे, गुरूंसंबंधी. या, " गुरू" शब्दाचा नेमका अर्थ आहे महान- मोठा. उलट शब्द आहे- लघु- लहान. तसेच आपल्या नवग्रहात, जो आकाराने, मोठा आहे, तोच "गुरू" असा संबोधला जातो. आपल्याला शिकवणारा शिक्षक, नेहमी महानच असावा,हे पटते नं? तो कोणत्याही अर्थी नीच- कमी बुध्दीचा वा कमी नीतिचा नसावा.
२७.२ २०२४. माझ्या प्रिय वाचक हो,लवकरच मी वेगळया स्वरूपात तुमच्या भेटीस येणार आहे. होईल नं, भेट. त्यासाठी,तुम्हाला, एक पाऊल पुढे यावयाचे आहे. मी पुस्तक स्वरूपात,तुमच्या घरी येण्यास उत्सुक आहे.
जट व बट. .आता, परवाच्या लेखातील कुंतल- केस संभाराची उपमा. उपमेय, सामाजिक व्यवस्था. दोन्ही उच्चार सारखे. केसासंबंधीच. पण अर्थ एकदम विरोधी. जट- गुंता व बट-लडिवाळ. जेव्हा केस बट रूपात असतात, तेव्हा आकर्षक व मनमोहक असतात. सर्वांच्या मानसी हर्ष निर्माण करतात. पण जर गुंतागुंत होऊन, काही केसांची "जट" होते. तेव्हा तितके केस कापून काढावे लागतात. तसेच सामाजिक जीवनात असते. जे कोणी गुन्हेगारीचा मार्ग अनुसरतात,त्यांना नाईलाजाने कारागृही पाठवावे, हाच योग्य मार्ग ठरतो. मूळात, गुंताडा होऊ नये, ह्यासाठी सावध व दक्ष राहणे, हेच सर्वांचे लक्ष असावे. तुम्हास माहीत आहे, त्यासाठीच माझी ही धडपड चालली आहे.
Comments
Post a Comment