आज एक व्हिडिओ पाहिला व एक आठवण जागृत झाली. वाचा तर त्या महान व्यक्तीची निरपेक्ष कृती
८.२ .२०२४ .आज एक व्हिडिओ पाहीला व एक आठवण जागृत झाली. वाचा तर त्या महान व्यक्तीची निरपेक्ष कृती.
वाचक हो, आज खास मायना नाही लिहिलाय. कारण त्या आठवणीने मन भरून येते.
वाचा तर. माझ्या पुनर्जन्माची कहाणी. स्वतःचे जीवन धोक्यात घालून, माझा जीव वाचवण्यार्या, त्या अज्ञात जीवाला शतशः प्रणाम. हा अनुभव मी प्रथमच लिहावयास पाहिजे होता. पण मला कोणी , " किन्नरांची चेष्टा वा राग केलेला , पहिल्यापासून आवडत नाही. जसे आपण, इतर अपंगांना मानतो, तसेच एक प्रकारे तेही दुदैवी होत. हल्ली भाजप सरकारच्या कृपेने या सर्वांंना ,
" दिव्यांग" म्हणतात. अन् आज आपण सर्व, रवि. जाधव दिग्दर्शित व, " सुश्मिता सेन" ने, आपल्या अद्वितिय अभिनयाने, सर्वांपुढे आणलेली , गौरी सावंतच्या जीवनावरील " टाली" ही मालिका पाहीली असेलच.
तर झाले असे,
आम्ही माहिमवरून मालाडला शिप्ट झालो, तेव्हा मला ट्रेनचा प्रवास जमेना. एकदा भयंकर प्रसंग ओढवला. गाडीत चढताना, गर्दीत, धक्काबुक्कीत, मी पडले. बायका तशाच चढत होत्या. त्यामुळे मी गाडी व प्लटफाॅर्मच्या फटीकडे सरकले गेले व माझे पाय गुडघ्यापर्यंत खाली गेले. गाडी सुटणार होती. तरी ही इतर चढत होत्या. येवढ्यात , एक दमदार आवाज आला., "ऐ, दूर हटो सब", सगळ्या भयाने दूर झाल्या. अन् मला कोणीतरी झटकन् , मागे ओढले. पण मला त्यातील मायेचा स्पर्श जाणवला. माझे पाय अडकल्याने, त्या व्यक्तीने, पायाने ते सोडविले. अन् तसेच काखेत धरून मला मागे नेले. बायका का दूर झाल्या माहीत आहेत, ती व्यक्ती, " किन्नर" होती. मी सावरून, आभार मानणार , तेवढ्यात, त्या माझ्या जीवनदात्याने, माझ्या डोक्यावर हात ठेवला, अन् पुलावरून निघूनही गेला. तसे तर सर्व बघत होते, काय होणार हेही कळत असेल, पण अशा प्रसंगी मदतीला येणारी व्यक्तीही वेगाबरोबर खेचली जाते. तिच्या जीवालाही धोका असतो. पण माझ्या या प्राणदात्याने, ही पर्वा न करता मला वाचविले. कोण होते, मी त्याची. शिवाय काही मोठेपणा न घेता. दूरही झाला. मग " इथे कर माझे जुळती!" मग मला सांगा, एवढी मोठी risk नका घेऊ, पण थोडेफार इतर जे आपले, कोणी लागत नाहीत, त्यांच्यासाठी कराल नं काहीतरी! मग ते निश्चितच देवाच्या दरबारी रूजू होईल. नेहमी give then take हे तत्व मनी बाळगा.No take then~~~ give.
☀☀☀☀☀☀☀
Comments
Post a Comment