प्रेमाचा संकुचित अर्थ व मर्म. GF/BF. अन् तिपेडी वेणी (😀).

 २४.२ .२०२४ .  प्रेमाचा संकुचित अर्थ व मर्म.

     माझ्या सजग व सुज्ञ वाचक मंडळींनो, तुम्ही सर्व वयांच्या गटातून आहात, हे मी जाणते. पण आपण समस्त सामाजिक रित्या एकमेकांत गुंतलेले असतो. कुमारवयीन मुलांचेच जीवन वेगळे, विचारात घेणे, अशक्य आहे. किंवा जेष्ठ नागरिक म्हणजे, काही वेगळा, गट नसतो. यातील महिलांना, ही उपमा नेमकी, समजेल, आपण तिपेढी वेणी घालतो, अंबाडा बांधतो वा केस मोकळे सोडतो. पण केसरचना ही सर्व केसांची मिळून असते. तशीच ही समाज रचना आहे. आपले केस काळे असतात. पाश्चात्यांचे सोनेरी तर निग्रोंचे अगदी कुरळे. पण ते एकमेकांशी सलग्न असतात. हे सगळे, गोंधळात टाकणारे लिखाण वाटले, तरी ह्यातच, आपल्या समाजाचा प्रतिबिंब आहे. 

     तर कालचा मुद्दा. girl friend- boy friend चे फॅड. 

          मित्रमैत्रिणी असाव्यात. पण त्या अर्थपूर्ण असाव्यात. एकमेकांना सहाय्य करण्यासाठी असाव्यात. अडचणीच्या वेळी हात देणार्‍या असाव्यात. मदत मिळेल, हा विश्वास असावा. नुसतेच गळ्यात हात घालून मैत्री होत नसते. 

          माझ्या धाकट्या मुलाला, कॉलेजपासून मित्र मैत्रिणी होत्या. पण त्यांचे बंध कसे निर्मळ होते. ते उदाहरण देऊन सांगते. तेव्हा नुकतेच मोबाईल पर्व सुरू झाले होते. आम्ही मालाडला राहत होतो. मी तेथे, रामलिला प्रसार मंडळाच्या जागेत, under privilege मुलांसाठी वर्ग चालवत असे. त्या दिवशी माझा मुलगा कॉलेजमध्ये गेला होता. त्याचवेळी त्यांच्या ग्रुपमधील एक मुलगी काही कामासाठी मालाडला आली होती. स्टेशनमध्ये उतरताना, ती फोनवर बोलत असताना, तिची संपूर्ण पर्स चोरीला गेली. तिने मदतीसाठी, राहूलला फोन केला. तो चर्चगेटला होता. त्याने शांतपणे, माझा पत्ता दिला व माझ्या आईला भेट, सांगितले. ती भितभितच, माझ्याकडे आली. मी बसवून समजावले व तिला जरूरीचे पैसे देऊन पाठवले. लक्षात आले का? त्यांची मैत्री इतकी निष्पाप होती की, आईपर्यंत येणे, सहजी घडले.  

           आज मित्रमैत्रिण,  हा मराठीत न बोलता इंग्लिश मध्ये उल्लेख केला कि, वेगळाच meaning अभिप्रेत होतो. जोडी  pair असा होतो. मग त्याला/ तिला ditched केल्यावरच दुसरा Bf-Gf होऊ शकतो. 

            पण पालकांपर्यंत friend circle पोहोचत नाही.  वाढ दिवस बाहेर पैशांच्या चुराडा करूनच साजरे केला जातात. नाहीतर म्हणे, prestige जाते. सगळे करतात, या बहाण्याने, सगळेच, पालकांच्या कमाईच्या पैशाच्या जोरावर, पार्ट्या करतात. जितके friends तितकी, पालकांच्या खिशाचा चाट. अन् तितक्या वेळेस, junk food पोटात.  असो- म्हणून सोडण्याची ही बाब नव्हे. हया मैत्री + प्रेमप्रकरणात, कॉलेज हे विद्येचे - सरस्वतीच्या उपासनेचे स्थान आहे. हाच उद्देश side track होतोय. एकामागून दुसरा/दुसरी gf- bf करण्यातून भावनिक गुंता होतो. अन्  अपराधाकडे लक्ष वळते. 

             ह्यात भर पाडतात, कित्येक  जेष्ठ ( श्रेष्ट नव्हेत) नागरिक. आज काही तुरळक का होईनात, live in  वयस्क, किशोरवयींना, काय उदाहरण देतात.  हे आहे, अापल्या समाजाचे, विघातक दर्शन. विचार करायला लावणारे.  वयस्क - अल्प पौढ व किशोर- तरूण वर्ग, जर आपल्या तिपेढी वेणीप्रमाणे, एकमेकांना समजून, बध्द राहिले, तर मग संताच्या म्हणण्याप्रमाणे, आनंदाच्या डोही आनंदच तरंगेल.  पण लक्षात कोण घेतो! माझ्या जागृत व दक्ष वाचक हो, उठा सज्ज व्हा. Do something which is possible to you. If like - spread these thoughts, everywhere.

    ☺😊☺😊☺☺😉.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू