शिक्षण संपले, नोकरीशोध. लगेच लगीन. हे ही पाकांचे कर्तव्य नं? hmm. नंतर संसाराची अगीन गाडी.
१.२ .२०२४. शिक्षण संपले, नोकरी शोध. लगेच लगीन. हे ही पालकांचे कर्तव्य नं? hmm. नंतर संसाराची अगीन गाडी.
मत्प्रिय पालक वर्ग हो, काल ब्लॉग लिहिला नाही, का असे वाटते बरे? लिखाणास सुरूवात केली अन् खालून दणादण डिजे व नवरदेव घोड्यावरून जाताना दिसले. अरे लग्न करा नं, पण इतरांना आवाजाचा त्रास कशाला? लग्न म्हणजे काही शौर्य नाही कि, त्याचा दिखावा करून public ला दुखवा~~! मुलाला नोकरी लागता लागताच लग्नाची घाई का करता हो? त्याच्या कमाईतून, जरा जमाई होऊन द्या नं! मुलींच्या पालकांची, आजकाल, वरपांगी हुंड्यातून सुटका झाली असली तरी एका दिवसासाठी मेंदी मेक-अप हेअर स्टाईल अन् शालूच्या वरताण ड्रेसेस दागिने( जे नंतर कधी वापरले जात नाहीत) हा खर्च - मुलीची हौस म्हणून आईवडिलांवर - मुलीच टाकतात. हा विचित्र हुंड्याचा प्रकार, कायदा काय डोके फोडणार या पुढे! विचार करा. पुर्वी एखाद्या वरपक्षाने, मुलाचा शिक्षणाचा खर्च, हुंडा रूपाने वसूल करावयाचा ठरवला, तर तो खलनायक ठरत असे. पण आजकाल हा खलनायकाचा ( याचे स्त्रीलिंग- वादातीत ठरेल) role मुले व मुलीच निभावत आहेत. काहीजण म्हणतील, हा खर्च आमच्या कमाईतून करतोय. ओके. पण आपल्या लग्नाला event रूप देण्यात व दणकून अफाट खर्च करण्यापेक्षा, आपल्या आईवडिलांस, एखादी छान अशी व आरामदायक ट्रिप arrange केलीत तर ☮! तसेच लहानपणी, ज्या दोन्ही आजी आजोबांनी लाड केले होते, त्यांच्या या वयातील गरजा पुर्या केल्यात, तर काय हरकत आहे. त्यांच्या, संभाव्य आजारपणासाठी, fix deposit ठेवा नं, हाच विचार आपले धर्म ग्रंथ सांगत आहेत. खोटे वाटते का? तर ते श्लोक सांगते. तसेच आजकाल बहुतेक मम्मीज job करतात. मुले दिवसाचा अर्धा वेळ baby sitters कडे वाढतात. कित्येक बेबीसीटर, शाळेतील home work ही पूरा करून घेतात. त्यांची आठवण ठेवून,थोडा खिसा मोकळा करावयास काय हरकत आहे. मी, हे," लोका सांगे ब्रह्मज्ञान" असे सांगत नाही. मी माझ्या दोन मुलांच्या मुंजीत, दोन्ही मुलांच्या तान्हेपणी, मसाज व अंघोळ घालण्यार्या, सुईणींचा शोध लाऊन, त्यांचा सन्मान केला होता. माझ्या नोकरीच्या काळात, माझ्या आईवडिलांनी, त्यांना संभाळले. पण दुदैवाने,लग्नापर्यंत ते राहीले नाहीत. असो.
सुजाण वाचक हो, तुम्हाला वाटले असेल, हे काय पुराणावरून, एकदम लगीनघाईवर, माझी अगीन गाडी कशी काय वळलीय? नाही, मी track बदलला नाही. पूर्वी च्या समाजातील, लग्न कशी होत असत, आपला धर्म काय सांगतो? हा विचार करा. नका ग्रंथ वाचू. पण पुत्रधर्म/ कन्याधर्म तर आचरणात आणाल ना? पूर्वीपासून, आपले काही पुरोहित, झरझर मंत्र म्हणत, अन् इतर बायका साड्या दागिने यात मश्गुल असतात. पुरूषमंडळी क्रिकेट व राजकारण यात दंग असत. परंतू जरा इतर धर्मियांच्या लग्नातून जाऊन बघा. नंतर हैदोस घालतील. पण लग्न लागत असताना, एक प्रकारचे गांभिर्याचे वातावरण असते.
वेदाची भाषा कठिण आहे. पुराणातून जे संस्कार करण्याचा, ऋषीमुनींनी, प्रयास केला आहे. नैतिकता उपदेशिली आहे, ती सर्वांगिण आहे. त्या काळाच्या scale प्रमाणे असली, तरी.मतितार्थ घेण्यास काय हरकत आहे? आज, नैतिकता म्हणजे फक्त अनैतिक संबंधापूरता अर्थ मानला जातो. अन् आम्ही नाय बा त्यातले, म्हणून स्वतः ला gentle मानले जाते. पण नैतिकता अनेक प्रकारची असते. बस. हेच मला , आजच्या लहानथोर पिढीला सांगायचे आहे. हा विचार- अाचार, सर्वदूर पसरण्यात मला मदत करणार नं? I think, the way, you know. No need to explain. Am I correct?
Comments
Post a Comment