आजची १८ ते २१ वयाची पिढी. rather त्यांच्या संबधित व्यक्ती- पालक व नातलग (आजी- आजोबा)
२३.२.२०२४. आजची १८ ते २१ वयाची पिढी. rather त्यांच्या संबंधित व्यक्ती पालक व नातलग ( आजी आजोबा).यांना लेख समर्पित.
मत्प्रिय वाचकहो, मी तरी तुम्हा सर्वांना प्रियतम मानते. समोरून काय भावना आहे, राम जाणे. मी सतत लिहिते, "राम" शब्दाचा अर्थ आपली क्षमता. त्यावर भरोसा ठेऊन, आपल्याकडून काहीतरी चांगले घडेल, अशी अपेक्षा व आशा आहे. ह्या लेखांचे' नुसतेच कथा कांदबरीसारखे वाचन नको हो.
" राजस्व मनाचे"ची साठवणूक व्हावी. आज ३.४ दिवस मी मुद्दाम, typing mistake करत राहिले. पण कोणाच्या ध्यानात आले नाही कि कसे, राम जाणे😍😊. असो.
मी,माझ्या विषयाकडे वळते.
१४ फेब्रुवारी - व्हँलेंटाईन डे. अाज हा प्रकार आपल्या देशात इतका बोकाळलाय. अहो, पाश्चिमात्यांचे अनुकरण करावयाचे, तर त्यांचे धार्मिक एकत्रिकरण, अंगिकारा. नियमित चर्चमध्ये जाणे व लग्नाच्या वेळेस, शांतता बाळगणे. तेव्हा पाद्री जे सांगतात, ते सर्वजण,अगदी मुले ही गांभिर्याने ऐकतात.
हे मात्र माझ्याकडून विषयांतर झाले.
मूळ विषय, व्हँलेंटाईन डे. हा दिवस,त्यांच्या कडे ज्या संताने सुरू केला. त्यात, त्यांच्या मूळ संस्कृतीची, पार्श्वभूमी आहे. समाजाचे एकत्रिकरण करणे, परिवारांस एकत्र आणणे वगैरे. पण आज भारतात, ह्याची व्याप्ती फक्त तरूण-तरूणींना, rather किशोरवयीन, कुमार- कुमारींना, नको त्या प्रकारे जवळीक साधण्याच्या कामापुरतीच राहिली आहे. एखाद्या मुलीला, एकापेक्षा एक वरचढ gift देण्यात,पालकांचा पैसा उडविला जातोय. मुलींचे आईबाप, (अशा निष्जाळजींना वडील- पिता ही पत देऊ शकत नाही) ही मुलींना अशा महागड्या वस्तू स्विकारण्यास, मनाई करत नाहीत. ही दुदैवाची बाब! अरे मुलांनो, आधी स्वकमाई करा. थोडीफार जमाई करा. आपल्या मनाला, असा मनाई हुकूम द्या. कि, मी पालकांच्या जीवावर, girl friend ची चैन करणार नाही. आधी लक्ष शिक्षणावर. कमाईचे साधन, त्यातून सर्व प्रथम, परिवारांची गरज व खुशीवर खर्च करीन.
आज कित्येक व्यापारी वर्ग ह्याचा फायदा उठवत आहेत. rather तुम्हाला ," ऊल्लू" बनवत आहेत. मुलांमुलींच्या एकमेकांना, "नजराणे" देण्याच्या हव्यासापायी, त्यांची मात्र, मस्त कमाई होतेय. वरून, " हे" बॉलिवूडवाले, क्रिकटर्स जाहीरातीतून खोर्याने पैसा खेचत आहेत. अन् आपण मूर्ख. एक उदाहरण देते. सोप १०%ने स्वस्त झाला, म्हणून एक अरबपती( ह्याचे स्त्रीलिंग काय) म्हणे - खूश झाली. सर्वात मोठा जोक म्हणजे, डिटर्जंट पावडरची जाहिरात, एक मोठ्ठा सुपरस्टार करत आहे. त्यांना ह्यातून बक्कळ पैसा मिळतो. तो ही आपल्या खिश्यातूनच जातो नं. लोक GST च्या नावाने बोंब मारतात . पण या व्हँलेंटाईन डे, च्या बाबतीतील, जाहिरातीचा आकडा, कधी विचारात घेतलात. तो ही आपल्यासाठी unofficial taxation च आहे. खरे तर हा मोसम, आपल्याकडे, " परिक्षांचा" असतो. तर मग ही लचांडं का, एखाद्या बांडगुळासारखी फैलावत आहे. मुलांनो विचार करा, विवेकी व संयमी बना. पालकांनो ह्या season मध्ये मुलांच्या pocket money ला कात्री लावा. त्यातच पालक- मुलांचे भले आहे. पुढच्या वर्षी लवकर विचारी बना. आतापासून सावध ऐका, पुढच्या हाका. बस! आणखी काय सांगू. माझे बोल,पालथ्था घड्यावर पाणी पडून वाया जाऊ नयेत, आस मनी बाळगून आहे. पटल्यास हा विचार share करा. बस touch the fingure. ह्या शब्दातला, "N" काढा .It will be figure. Figure out the truth.
🚧🚧🚧🚧🚧🚧🚧🚧🚧.
Comments
Post a Comment