कोणाचे जर सांत्वन फक्त प्रत्यच करता येते,असे नव्हे.दिलसे करू शकतो .त्यांना SOLACE देऊ शकतो.

 6.2.2024.   कोणाचे जर सांत्वन  फक्त प्रत्यक्षच  देता येते,असे नव्हे. दिलसे करू शकतो.

      वाचक मंडळी हो, आज मी फक्त हाक दिली आहे साद देणे, तुमच्या हातात आहे. आज माझा लेख खूप छोटासा पण आशयपूर्ण आहे. मी आज जे केले व त्यासाठी ज्यांनी साथ दिली ,त्यांचे शतशः आभार. रविवारी आमच्या सोसायटीतील, एक मुलगा, बाईक अपघातात गेला. सर्व सांत्वनासाठी गेले.मी बाहेर गावी असल्याने जाऊ शकले नाही. पण आमच्या समोरच एक शंकराचे मंदिर आहे. तेथे दोन दिवस, लग्नाचे वरवधू येत आहेत. पण कसे बँड ताशे ढोल गाणी डिजे वाजवत येतात. मुळात देवदर्शन घेणे, सात्विक असावे. असो. पण आज मला जाणवले, त्या मुलाच्या पालकांसाठी, निदान ४.५ दिवस येथे शांतता असावी. म्हणून सेक्रेटरी व इतरांना सुचविले.त्यांनी लगेच मंदिरात विनंती केली. त्य‍ांनी लगेच अमलात आणली. हीच त्या १६.१७ वर्षाच्या मुलाला, आमच्या सर्वांकडून मूक श्रध्दांजली.  तुम्ही पण असे करू शकता. समोरची मंडळी , " ऐकणारच नाहीत,कशाला सांगायला जा, असा पूर्व ग्रह न ठेवता, पुढे व्हा.   तसेच नोव्हे.२००८ मध्ये , जे बॉम्बस्फोटाचे कांड झाले, तेव्हा आम्ही नुकतेच मीरा रोडला राहण्यास आलो होतो. बिल्डींगमध्ये, एका घरी लग्न होते. संपूर्ण बिल्डींगभर त्यांनी दिपमाळा लावल्या होत्या. तेव्हा जे तीन पोलीस इंन्स्पेक्टर मारले गेले होते. त्यांच्यासाठी, आम्ही शोक पाळला होता.माझ्या मुलाने, प्रशांतने, त्यांना विनंती केली.  आमच्या घरावर तरी दिपमाळा नको. कारण सांगितले. नवल म्हणजे त्यांनी, स्वतःच्या मुलाचे लग्न असून,त्या सर्व दिपमाळा उतरवल्या. वरून प्रशांतला धन्यवाद दिले. त्यांच्या हातून, देशप्रेम घडवल्या बद्दल. तर ह्या प्रकारच्या सुचना स्विकारल्या जातात, हो. तर करून बघा. समाधान व पुण्य मिळेल.

 एखाद्याच्या दुःखात सामिल व्हावयाचे, म्हणजे, फक्त, "त्या" दिवशी भेटून अश्रू ढाळायचेच नव्हे तर त्यांना खरा दिलासा द्यावयाचा.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू