21.may 2025. प्रिय व सुजाण, मुख्य म्हणजे सजग वाचक हो, काल एका छोट्या व अशिक्षित मुलाची, त्याच्या कुवती नुसार, आभार प्रदर्शनाची, रीत सांगितली. आज एका मुक्या जीवाची, एकनिष्ठ वर्तणूक वाचा. खरे तर आपण माणसाच्या, वाईट वागण्याचा उल्लेख, "पाशवी" असा सहजच करतो. पण पशू किती संवेदनशील असतात. त्याची सत्य कथा वाचा. केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती. हो. हे एक अजब असा अनुभव मनाला व जीवाला चटका देऊन गेला. आठवणीने ही मन भारावून जाते. झाले असे की, माझ्या.मुलांना कुत्रा पाळावयाचा होता. पण माहिमच्या दोन खोल्यांच्या जागेत , ते अशक्य होते. एक तर मीच परिस्थितिमुळे, माझ्या दोघा मुलांसह( प्रशांत व राहूल) आई-दादांकडे(वडील) राहत होते. मुलांना त्याची जाणिव होती.मला भांडूपला क्वार्टर मिळाल्यावर, आम्ही आईदादांसह तेथे shift झालो. चार खोल्यांची प्रशस्त जागा अन् ती ही तळमजल्यावर, तेव्हा कुत्रा पाळायचा हे नक्की केले. एक तर मुलांची हौस व दुपारी आम्ही तिघे बाहेर पडल्यावर आजी दादांना सोबत. ...
माझ्या सुजाण वाचक हो,मी आपले स्वागत करत आहे. व आभार ही मानत आहे. तसे तर कित्येक दा कोणा ना कोणाचे आभार मानतो. कधी कधी इतर जण आपले आभार मानतात. त्याच वेळी काही gift ही देतो वा स्वीकारतो. पण आज इतक्या दिवसाने, मी आपल्याला भेटत आहे. तेव्हा एका अनोख्या आभार प्रदर्शनाची कथा सांगणार आहे. यात मला, एक अनोखा व अनमोल नजराणा मिळाला, एका छोट्या अनामिक मुलाकडून. तर वाचाच, ती हकीकत. कृतज्ञता. एक अनोखा अनुभव ही एक सत्य कथा आहे. आपण, आभार मानतो, तेव्हा ती बहुदा शाब्दिक असते. कधी कधी return gift च्या स्वरूपात असते. या बाबतीतला ना शाब्दिक ना भेट स्वरूप असा एक नजराणा, मला मिळालाय. नुसत्या आठवणीने, मन भरून व भारून जाते हो. हाच माझा एक अनुभव, मी तुम्हाला सांगणार आहे. अापण दुसर्यासाठी थोडे केले, तर देवाच्या दारी नक्कीच रूजू होते. ही घटना आहे १९९७ ची. अशी ही एक, दिलसे, कृतज्ञता. आम्ही मालाडला रहात होतो. माझे वडिल अचानक आजारी पडले. पण CGHS ची सोय अ सल्याने त्यांनी प्रायव्हेट मध्ये जाणे, नाकारले. तेव्हा त्यां...
दादरकर मुलांमुलीचा गुरू. स्वागत आहे, माझ्या प्रिय वाचक हो, परवा, माझ्या बहिणीची पदवीधर होण्याची जिद्द बघितलीत नं? आता मी तुम्हाला शिक्षण विषयी, एक गंमतीदार खरी घटना सांगणार आहे.आमच्या लहानपणीची. खरे तर अभ्यास करणे, त्या शालेय जीवनात काही आवडीचा विषय नसतो. मी दादरच्या खांडके चाळीत राहत होते. खांडके 5 नं. मध्ये, मजल्यावर नऊ बिऱ्हाडे. आम्हाला अभ्यासू बनवण्याचे श्रेय कोणाला जाते,कल्पना आहे का? पुढे वाचून हसाल, हसा बापूडे. पण हे सत्य आहे की,दर दिवसा आड येणाऱ्या, डब्बेबाटली वाल्याचे, हे महान कार्य होय. आता सविस्तर सांगतेच, ऐका, I mean वाचा. तो काळा कुट्ट, दातपुढे त्यात ही एक दात सोनेरी, खांद्यावर कळकट पोते. एक डोळ्यात पांढरे.. एकूण भयानकच. गल्लीच्या तोंडा वरून, ओरडायचा, " डब्बेबाटलीय, नंतर सर्व मजल्या वर येई. आम्हा पोरांना दम देई. " बुक वाचली का, पाटी लिवली का अं, की घालू पोत्यात? आम्ही सर्व त्याला गल्लीत शिरताना पाहून, धडाधड पाटी पेन्सिल वही पुस्तकं घेऊन, ...
Comments
Post a Comment