नऊ वेळा नमस्कार करतेय. आपल्या हिंदुत्वात, " नऊ " संख्येला, फार महत्व आहे बरे का,

 प्रिय वाचक हो, खरे तर मी या लेखाने सुरुवात करणार होते, पण विचार केला, जरा वाचकांना, मी हजर झालेय, हे कळू देत, मग समर्थ रामदास स्वामी, काय सांगतात, ते लिहू.  आता स्वामी, चाणक्य व कबीर, मुख्य म्हणजे आपले छ. शम्भू राजें यांचे सांगणे, समजून घेवूया.पण मजेशीर रीतीने हं.

          आज, "छावा" ने  त्या, "धर्मवीराचे व कवी कलश यांचे बलिदान, पुढच्या पिढी पर्यंत पोहोचले आहे. 

     श्री समर्थरामदास्वामी यांना वंदन करून, मी हे लिखाण सुरू करीत आहे. लेखन कलेचा प्रारंभ कोणी व कसा केला, हे नंतर समजून घेऊ या. आज प्रथम ते कसे करावे, या बाबत उपदेश देणारे समर्थ रामदास हे पहिलेच संत असावेत. या त्यांच्या, या बाबतचा ग्रंथ,

" दासबोध"  या विषयी माहिती देण्याचा, हा माझा खारीचा प्रयास आहे. तो जाणून व आचरणात आणून, त्याचे रूपांतर प्रयत्नात करावे, ही विनंती.

       खरे तर हा ग्रंथ, शिक्षणाच्या सुरवातीलाच, अभ्यासणे, गरजेचे आहे. आपण आज समाजात, ह्या दासबोधाचा उल्लेख, " ग्रंथ" असा करतो.  त्यामुळे, हे काहीतरी, आध्यात्मिक व धार्मिक वगैरे असल्याचा समज पसरलाय. प्रत्यक्षात, हे लिखाण, "कार्मिक" आहे. म्हणजे, लहानपणापासून, आपले वर्तन व कामाची पध्दत- अभ्यास करण्याची रीत सांगणारे लिखाण आहे. पण आपण दुदैवी-- ही तिजोरीची किल्ली, हाती असून ही, विद्यार्थीदशेत, यापासून दूर  राहतो. अन्  निवृत्ती नंतर ह्याचे वाचन करतो. म्हणजे असे होते की, दात पडल्यावर चणे खाणे. वाचकांना समजणारी भाषा ही की, बोळके झाल्यावर, मटण खाणे. असो.

  माझ्याकडे दासबोध आहे, हे माहीत असणारे, अनेकजण, निवृत्ती नंतर,  " जरा तुमचा  दासबोध बघू हो. मला खूप आवड आहे हो, आता सवड ही आहे, तर वाचन करीन." मागायला आलेत.

 अर्थातच मी देत नाही. कारण हे लिखाण  time pass नव्हे. तर खरोखर समजूनच वाचावयास पाहीजे. मनन  व चिंतन करावयाचा, विषय आहे.असो.

          तसेच, आज जवळ जवळ 40.46  वर्षे,प्राथमिक शाळेतून, रामदासस्वामी," मनाच्या श्लोकांचे पाठांतर होते. हे पुस्तक, कदाचित, आकाराने छोटे आहे, म्हणून असावे, बापडे, लहान मुलांसाठी अन् दासबोध आकाराने मोठे म्हणून मोठ्यासाठी, असली गैरसमज, पिढ्यात पिढ्या चालत आला आहे. हो. तेव्हा जरा हा ग्रंथ अभ्यासपूर्वक वाचा. व मुला-नातवंडापर्यंत पोहोचवा. कोठे तरी गटात पारायण करू नका. ही काही पोथी नव्हे. ही तर माहितीची पोतडी आहे. बघा तर खरे.

   🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू