केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.
21.may 2025. प्रिय व सुजाण, मुख्य म्हणजे सजग वाचक हो, काल एका छोट्या व अशिक्षित मुलाची, त्याच्या कुवती नुसार, आभार प्रदर्शनाची, रीत सांगितली. आज एका मुक्या जीवाची, एकनिष्ठ वर्तणूक वाचा. खरे तर आपण माणसाच्या, वाईट वागण्याचा उल्लेख, "पाशवी" असा सहजच करतो. पण पशू किती संवेदनशील असतात. त्याची सत्य कथा वाचा. केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती. हो. हे एक अजब असा अनुभव मनाला व जीवाला चटका देऊन गेला. आठवणीने ही मन भारावून जाते. झाले असे की, माझ्या.मुलांना कुत्रा पाळावयाचा होता. पण माहिमच्या दोन खोल्यांच्या जागेत , ते अशक्य होते. एक तर मीच परिस्थितिमुळे, माझ्या दोघा मुलांसह( प्रशांत व राहूल) आई-दादांकडे(वडील) राहत होते. मुलांना त्याची जाणिव होती.मला भांडूपला क्वार्टर मिळाल्यावर, आम्ही आईदादांसह तेथे shift झालो. चार खोल्यांची प्रशस्त जागा अन् ती ही तळमजल्यावर, तेव्हा कुत्रा पाळायचा हे नक्की केले. एक तर मुलांची हौस व दुपारी आम्ही तिघे बाहेर पडल्यावर आजी दादांना सोबत. ...
Comments
Post a Comment