गुरू देव दत्त ज्यांना गुरू मानत, ते उर्वरित 12गुरू.

 12  जून 2025.

          दत्तगुरू, ज्यांना गुरू मानत ते उर्वरित 12गुरू.

       वाचक हो, आता पटले नं, आपल्या आयुष्यात, असे अनेक जण येतात, जे गुरू प्रमाणे, उपाय करीत असतात. कधी आपल्याला, ते जाणवते, तर कधी लक्षात ही येत नाही. तर काही प्रसंगी, आपण ते जाणून ही * **.  असो. तर यापुढे दत्तात्रय व कृष्ण देव, ज्यांच्या कडून निगेटिव्ह म्हणजे, काय करणे, अयोग्य आहे, ते ज्ञान मिळवतात. बघाच तर, पुढील 12 गुरू.

        13. गजेंद्र हत्ती :- नेगेटिव्ह गुरू. महाकाय असून, एका अंकुशाच्या आधीन असतो. शक्य असून बळहीन राहतो. बघा नं, आपला देश प्रबळ असून ही दोनदा, (मुस्लिम व इंग्रज) ह्यांच्या हाती, पारतंत्र्यात अडकला. का बरे, विचार करा.

        14.भ्रमर :- मोहात अडकणे. हे नसावे. हा भुंगा, कमळ मिटायची वेळ झाली, तरी मोहवश राहून,तेथेच रेंगाळतो. आपण वेळीच सतर्क व दक्ष असावे.

       15. मृग :- इथेही मोहत्यागच. याची गती अफाट असल्याने, सहसा कोणाच्या  हाती लागत नाही. पण स्वतः च्याच पोटी असलेल्या, कस्तुरीच्या गंधाला, बाहेर शोधण्यासाठी, धावत राहतो व प्राण गमावतो.

      16. मत्स्य :- चवीत गुंतत नाही, पण त्यामुळे गळाचे लोखंड न कळल्याने, काही नवीन मजेशीर वाटून, फशी पडतो. जीव गमावतो.

      17.पिंगळा वेश्या:-   वेश्या आशेचा त्याग करते निरपेक्ष व आशेचा त्याग करण्याला, निराशेचे, अपेक्षाभंगाचे दु:ख बाधत नाही.

       18. टिटवी:-  उपाधीचा त्याग. ती ओरडत राहते. लोक काय म्हणतील, हा विचार करून, निष्क्रिय होऊ नये. आपल्याला योग्य वाटेल, ते करावे. फक्त विवेक असावा.

      19. बालक:- सदैव हसतमुख असते.

      20. कंकण:-  एकांत प्रिय असावे. नाहीतर एकावर एक आपटून काकणे फूटतात. म्हणून शरीराने नाही, पण मनाने एकांत साधावा.

        21. शरकर्ता:- शर म्हणजे बाण. हा एकाग्र पणे बाणाचे पाते, तयार करतो. आजूबाजूला लक्ष देत नाही. कारण, दुर्लक्ष केल्यास, टोकदार करताना ते टोक तुटू शकते. मग तो बाण काय कामाचा. तसेच लक्ष पूर्वक अभ्यास न केल्यास, काय होईल, सांगणे, न लगे 😔. त्यात भक्ती असावी.

      22. सर्प कधी जमावात राहात नाहीत. सावध असतात. No mass behavior. परक्याशी, मोजके बोलावे. अंतर राखावे. सर्व जे करतात, मोर्चा, दगड फेक व सेल्फीकरू नये.

     23. कोळी:-  हा जाळे बनवून राहतो. स्वतः तून धागा काढतो. चिकट जाळ्यात कीटक अडकतात. पण तो स्वतः त्यात चिकटत नाही. तसेच असावे. कमावलेल्या, धनात स्वतः अडकू नये.

    24. फुलपाखरू:- कीटक रूपातील, जीव, कोशातून बाहेर येते, ते उडण्यासाठी पंख व सुंदर रूप घेऊन बाहेर येतो. आपण तसेच भक्तीरुपी कोषात राहून शक्ती पाप्त करावी.

      बघा, हे सर्व आपण ही आत्मसात करू शकतो. फक्त नजरिया पाहिजे. मग गुरुजन, सामोरे येतातच.  आपण त्यांजकडून काय घ्यावयाचे, ते आपल्या वर असते. जसे घोड्याला, पाण्यापर्यंत, स्वार नेईल, पण पाणी घोडयालाच, वाकून पिणे, भाग आहे.    

            ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू