दत्तगुरू चे आगळे वेगळे 24 गुरू
गुरू कोणास म्हणावे.
माझ्या समजदार वाचक हो.
तुम्ही माझा परवाचा लेख वाचला असेल, असे गृहीत धरून, हा पुढील लेख लिहीत आहे. तर माझ्या अनोखा गुरूशी ओळख करून घेऊन, तुम्ही चक्रावले असाल. पण हे काहीच नाही. पूर्वीपासूनच्या. माझ्या वाचक वर्गाला, 2022चा चाणक्य ह्यांच्या सहा गुरू विषयी चा लेख आठवतोय का? कावळा कुत्रा वगैरे सहा.. की वारे इकडून तिकडे गेलेत Sorry हं. तर असो. आपल्या श्री कृष्णाला 36गुरू होते.
प्रत्यक्ष सर्वांना गुरू स्थानी असलेल्या दत्तात्रय, (ब्रह्मा, विष्णू व महेश) यांना ही 24 गुरू होते. ते कोणते व कसे, कोणत्या गुणाखातीर, ते माहीत आहे? तर ऐका I mean वाचा.
1. पृथ्वी:- सहनशीलता व सहिष्णू.
2. वायू:- विरक्ती. वारा कोठेही मोहात पडून, एका जागी थांबत नाही.
3. आकाश:- अचलता. आत्मा हा आकाशाप्रमाणे निर्विकार- सर्वांसाठी समत्व-समानता ठेवतो. तो अभेद व निर्मळ, व निसंग असतो.
4. पाणी:- स्नेहभाव व सर्वांसाठी सारखे गुणधर्म असतात. पक्षपात नसतो.
5. अग्नी:- पवित्रता. स्वतः ला तप्त ठेवून, सर्व जगताला प्रकाशित व चैतन्यशील ठेवते.
6. चंद्र :- विकार वा बाधा न होणे. कला असून ही बाधक नसतो. Up down असून ही स्थितप्रद असतो.
7. सूर्य:- निपक्षपाती. उपयुक्त बाबींचा संचय व विकास करणे. स्वतःचे, 'तपन' नाव सार्थ करून ही विश्वाला जीवन देतो.
8. कपोत:- अलिप्तता. कबुतर, सर्वांपासून विरक्त असते, एखाद्या ऋषी- मुनी प्रमाणे.
9. अजगर:- निर्भयता. तो आपल्याला अवाढव्य व भयप्रद वाटला, तरी त्याला स्वतःचे लांबलचक शरीर संभांळावे लागते. डोक्यापासून, दूर असलेली शेपटी ही जपावी लागते.
10. समुद्र:- परोपकारी. स्वतः पूरतेच न पाहता, स्वधर्म जपून, सुखात ( भरती )ही गर्व करीत नाही.. दुःखात (ओहोटी) निराश होत नाही.
11. पतंग:- मोह त्याग. तो दिव्याकडे झेप घेतो. त्याच्या स्वप्नपूर्ती व निहीत कार्यात स्वतःला झोकून देतो.
12. मधमाशी:- धन संचय. पण निर्मोही. जसे रतन टाटा, मूर्ती (सुधा व नारायण), बिर्ला अंबानी पैसा कमवतात. पण स्वतः बरोबर, इतरांना ही संपत्ती चा उपभोग देतात. मधमाशी कित्येक ठिकाणी जाऊन मध गोळा करते, पण तिचे ते खाद्य नाही.
आता या गुरुदेव दत्तात्रयांच्या, आगळ्या गुरूं बाबत, परत परत वाचा व विचार करा व आठवा की, आजवर आपल्याला, कित्येकजणांनी मार्गदर्शन केले असेल, चुकीच्या मार्गापासून अडविले असेल, त्यांना नमन करून, दत्तगुरू च्या पुढील 12 गुरूं विषयी जाणून घेण्यासाठी तयार व्हा.
ॐॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.
Comments
Post a Comment