अद्वितीय - आपल्या सनातन धर्माची देणगी.
वाचक हो, मला माहीत आहे. दिवाळी अंक म्हणजे, तुम्हाला विनोद मजेशीर कथा वाचून मज्जा हवी असणार.. पण आज आपल्या हिंदुत्वाची खरी ओळख करून घ्या, तरच तुम्ही तुमच्या वंशजाना खरी व योग्य गिफ्ट देऊ शकाल. ही भेट चिरंतर असणार आहे. आपले पूर्वज आपल्यासाठी किती मोठा ठेवा, निर्माण करून गेलेत, तो,मी तुम्हाला सुपूर्द करीत आहे. इंग्रजी भाषा
A ते Z अक्षरात सीमित असली तरी, असा अजुबा, त्यांना ही जमला नाहीये.
आज मी,ज्या अद्वितीय ग्रंथाचा परिचय करून देणार आहे, तो कांचीपूरम येथील 17व्या शतकातील कवी वेंकटाध्वरी यांनी लिहिला-रचिला आहे शतकात लिहिला आहे. तो ग्रंथकर्ता ही अनामिकच आहे. खरे तर, हा अत्यंत दुर्मिळ असा सनातन धर्म ग्रंथ आहे. खरे तर, याला जगातील सात आश्चर्यात, प्रथम स्थान व सन्मान मिळायला हवा..
हा दक्षिण भारतातील एक अनमोल असा ग्रंथ आहे. संस्कृत भाषा ही एक प्रकारे short hand लिपी आहे. यात एक एक अक्षराला वेगळा अर्थ आहे..
या ग्रंथात जर सरळ वाचन केल्यास, राम चरित्र समजून येते. तेच त्यातील प्रत्येक श्लोकातील, प्रत्येक अक्षरे, उलट क्रमाने वाचली, तर कृष्ण चरित्र दिसून येते. आता बघा, मराठीतच उदाहरण द्यावयाचे तर "नमन, डालडा कसाही वाचा. तोच शब्द तोच अर्थ.
या ग्रंथाचे नाव, राघवयादवीयम आहे. नावावरून देखील हेच दिसून येते. राघव -राम व यादव -कृष्ण.
आत 30सुलट व 30 उलट श्लोक आहेत. म्हणजे एकूण 60 श्लोक आहेत. खरेच कमालीचे लेखन आहे.
याची झलक म्हणून पहिला श्लोक बघु या.
अनुलोम
वंदे S हं देवं तं श्रीतं रन्तारं कालं भासा यं:|
रामो रामाधी राप्यागो लिलामारायोध्ये वासे ||1||
अर्थ :-
मी अशा भगवान श्री रामाच्या चरणी नमन करीत आहे. ज्याचे हृदयात सीता माता विराजमान आहे. तसेच ज्यांनी आपली पत्नी सीते करीता, सह्याद्री पर्वत पार करीत, लंकेत जाऊन, रावणाचा वध केला व आपला वनवास पूर्ण करून, अयोध्या नगरीत परत आले, ते मला व सर्व विश्वाला वंदनीय आहेत.
आता हाच श्लोक उलट अक्षरे वाचत बघू या.
विलोम
सेवाध्येयो रामालाली गोप्याराधी भारामोरा : |
यस्साभालंकारं तारं तं श्रीतं वंन्दे S हं देवं ||1||
अर्थ :-
मी रुक्मिणी तसेच गोपिकाना पूजनीय,
भगवान श्री कृष्ण चरणी नमन करीत आहे., जो केशव सदैव माता लक्ष्मी सोबत विराजमान आहे. तसेच ज्यांची शोभा, समस्त हिरे -जवाहरांची शोभा निस्तेज करते.
बघा नीट, वाचा. हा ग्रंथ, व्याकरण दृष्टीने, "अनुलोम विलोम" या नावाने ओळखला जातो.
लवकर हा संपूर्ण ग्रंथ हिंदी व मराठी अर्थासह प्रकाशित करणार आहे. यात एकूण 30 श्लोक आहेत. लवकरच आपण ह्याचे अध्ययन करू या. हा ग्रंथ मुळातच मजेशीर असल्याने, त्याचा अभ्यास ही, मजेत मजेतच होईल. ही माझी खात्री आहे. तर लवकरच तयार रहा, ह्याची माहिती करून घेण्यासाठी. तोपर्यत, इतर ही current topic वर बोलू या. तर भेटू या. उद्या.......
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
Comments
Post a Comment