कविता:- "प्रमाणात सर्व काही असावे."
कविता:- "प्रमाणात सर्व काही असावे."
कवी वर्य :- श्री. कृष्णाजी नारायण आठल्ये.
अति कोपता कार्य जाते लयाला,
अति नम्रता पात्र होते भयाला |
अति काम ते कोणते ही नसावे,
प्रमाणात सर्व काही असावे ||1||
कोठचीही काम करताना, रागाने केल्यास ते पूर्णत्वा ला जात नाही. उलट त्याचा सत्यानासच होतो. तसेच अति नम्रता म्हणजे भीड बाळगल्यास, समोरचा underestimate करतो.मनात राग राग व मुखात अपशब्द असल्यास, आपली विवेक बुद्धी, सारासार विचार करू शकत नाही. त्यामुळे योग्य निर्णय अन वेळेचा अंदाज न येता शीघ्र कार्य व्हावे, या अपेक्षापूर्ती साठी, चुकीची पावले पडतात. व कार्य पार पडल्याचे सुख नासते. शिवाय यामुळे, स्वभाव चिडचिड बनतो. त्याने आप्त स्वकीय दुरावतात कि, ज्यांची आपल्याला मदत होऊ शकते. त्यापायी आपलीच हानी होते.
अति लोभ आणि जना नित्य लाज,
अति त्याग रोकडा मृत्यू आज,
सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे,
प्रमाणात सर्व काही असावे.||2||
अति लोभ केला, तर इतर काढतात म्हणजे हसतात. अति त्याग करण्याने, आपलाच सर्वनाश ओढवतो. सतत आपल्याला नुकसान सोसावे लागते. कारण लोक आपल्याला भोळे समजून, आपला फायदा उठवतात. जगात समाधानी दिसावे, म्हणजेच हसतमुख असावे. निष्क्रिय होऊ नये, उलट आकांक्षा असावी. अपेक्षा पूर्ती साठी परिश्रम चालू ठेवावे. नेमस्त - सदैव हसतमुख राहिल्याने, परिजन -आपलीकडे आकर्षित होतात. आणि आपले सदैव अभिष्टचिंतन करतात ज्यायोगे आपली हिंमत वाढून, आपल्याला यश सहजी, प्राप्त होते.
अति मोह हा दुःख -शोकांचे मूळ
अति काळजी करणे,हेही खूळ,
सदा चित्त हे सदविचारे करावे,
प्रमाणात सर्व काही असावे||3||
अति मोहवश झाले, म्हणजे हव्यास संपला नाही, तर जे मिळवू शकले नाही, त्याच्या दुःखात जे काही मिळाले मिळवले आहे, त्याचा आनंद नासतो. तसेच प्राप्त परिस्थितीत बदल करणे, आपल्या हाती नसताना,29 उगीचच, कसे होईल काय होईल,यांची काळजी करत बसणे, हे वेडेपणाचे ठरते.मोह वा काळजी न करता, चांगल्या विचाराने चित्त भरून, सदैव positive विचार,उच्चार व आचार करावेत.
(क्रमशः ) हे एकूण 20 कडव्यांचे दीर्घ काव्य आहे..पण यात संपूर्ण जीवनाचा सार सांगितले आहे. हे जर आचरणात आणले, तर जगी सर्व सुखी aapnc🙏असू.
या महान साहित्यकरांचा परिचय करून घेऊ या.
यांचे संपूर्ण नाव श्रीकृष्णाजी नारायण आठल्ये. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1852ला सातारा जिल्हातील ठेंभू या गावी झाला.
एकूण काल 1852ते 1926.
मराठी ग्रंथकार व संपादक, चित्रकार, टीकाकार, निबंधकार व कवी इतके चौफेरव बहुयामी व्यक्तिमत्व, आपणा सर्वांना परिचित असणे आवश्यक आहे.
. त्यांनी सर्व प्रथम मराठी विश्वकोश प्रथमवृत्ती संपादित केली.
त्यांचे शिक्षण कराड व पुणे येथे झाले मुंबईला J J येथे कला शिक्षण झाले. त्यांनी शिक्षक म्हणून नुसता व्यवसाय केला नाहीतर, त्यात जीव ओतला. ते बडोद्याला दिवाण होते. कोचीन मासिकात, 18 वर्षे
" लोकोत्तर चमत्काराचे कथन " हे सदर चालविले.
पुस्तक प्रकाशन 30पेक्षा जास्त निर्णय सागर संपादन व मुद्रण केले.
अनुवाद :- विवेकानंद, सुलभ वेदांत व नरदेहाची रचना (शरीर शास्त्र )तसेच शिक्षण विषयक "आत्मपरीक्षण हा ग्रंथ लिहिला. असे हे साहित्यकार. त्यांच्या बद्दल माहिती जाणून न घेणे, हा अपराध अक्षम आहे. हेही त्या
काळात कि, जेव्हा लिखाण फक्त हाताने लिहावे लागे. No type writer no compiter. निदान हे त्यांचे, जीवनाचे सार सांगणारे महाकाव्य तरी पुढील पिढीला सुपूर्द करावे ही अपेक्षा व आकांक्षा मनी बाळगून, मी या ब्लॉग मधून आपल्या पर्यंत पोहोचवण्यचा प्रयास करीत आहे. ह्यातीलknowledge निश्चित च current मुद्द्याशी निगडित आहे. निदान आजकालच्या, सिने गीतांच्या दणक्यापेक्षा श्रेष्ट आहे, पटतेय नं, सुजाण वाचकहो. मग याल नं, माझ्या बरोबर चर्चा करायल👍👍👍 ::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
Comments
Post a Comment