सावधान असाल तर समाधानी असाल.
सावधान राहाल तर च समाधान मिळवाल.
माझ्या प्रिय वाचक मित्र मैत्रिणीनो,
काल मी सांगितले ते पटलेय नं, आपण सुरक्षित राहण्यासाठी, आपले निर्णय व बेत, योग्य रित्या व विचारपूर्वक करावेत. दुर्घटना घडल्यावर, नशिबाला दोष देणे, व मग असे पोकळ समाधान मानून हातावर हात, देऊन बसणे, एकदम चूक.
आपण सुरक्षित राहण्यासाठी आपल्यालाच, सतर्क व जागृत रहावे लागते. आता बघा, आपली कमाई व जमाई योग्य रीतीने ठेवणे, आपल्या हातात असते. पण कित्येक जण, नसत्या मोहा पायी rather हाव व लोभ ठेऊन नको, त्या प्रकारे डबल तिपट करू पाहतात. मग होते फसवणूक. अहो, साधी कामवाली ठेवताना, आपण सर्व परीने, चौकशी करतो. सोसायटी आपल्या कडे, त्यांच्या, "आधार कार्ड " ची कॉपी मागते.
मग लाखो रुपये, एखाद्या जाहिरातीच्या ( 30% परतावा) मागे लागून ठेवताना, निदान पोलीसांकडे, त्या जाहिरातीची खात्री करू शकतो. पण नाही, मोहवश होऊन, मागचा पुढचा विचार न करताना, ही मंडळी on line tranfer करतात. निदान cheque द्यावा नं.... तर ही पुढील बातमी नीट वाचा. नंतर शेवटी पोलिसांकडे धाव घ्यावीच लागते. मग आधीच शहानिशा करावी नं.. थोडे थोडके नव्हे, तर या महिलेने 20 लाख, त्या परदेशी कंपनीत, ठेवले. आणखी एकाने ही तेवढेच ठेवले. आपला मूर्ख पणा, आणि आता पोलिसांनी, म्हणे, शोधून परत मिळवून द्यावेत. बघा, ही बातमी.

Comments
Post a Comment