भोचकपणा नेहमी वाईट नसतो, तर त्यातून भले होते हो.
वाचक हो, काल मुद्दाम, मी लेख लिहिला नाही. कारण कालचा, बातमी वरील लेख जास्तीतजास्त लोकांनी वाचावा, परत परत वाचून, इतरांशी चर्चा करावी, ही मनीषा होती.
आता अशाच, एका बातमीचा, "समाचार" घेऊ या.
शीर्षकात, अल्पवयीन म्हटलेय. बातमी त वय 13 म्हटलेय. पण नववीत होती. मग नक्कीच वय 15 असणार. लग्नाचे आमिष देऊन, वारंवार अत्याचार केला म्हणे, या 15 वर्षीय मुलीला अशी काय लग्नाची घाई झाली होती. आजकाल ही प्रेमीची, व एकत्र राहण्याची बाब अगदी बोकाळलेय पण मला कळत नाही. या साठी ही मुलगी अवेळी घराबाहेर जातच असेल, ते पालकांना कसे जाणवले नाही. आता नीट वाचा ही बातमी पुढे काय झाले...
त्याच्या दोन मित्रांसह....
पण यात ती पीडित मुलगी, अगदीच, बिच्चारी आहे का? आता पोलीस आहेतच, दिमतीला! हे एक गाव आहे. अशी किती वस्ती असणार? आणि कोणीच सुरुवातीपासून पाहिले नसणार? लॉजिक पटतेय का? पण सर्वांनी " मला काय करायचेय " हा stand घेतला असणार. मग आता गावाचे नाव, रोशन " झाले ना, या प्रकारे!मुलीच्या, तसेच मुलांच्या पालकांना, दोष द्यावयाला पाहिजे. त्या पहिल्या प्रेमीचे पालक ही झोपले होते का? वेळीच मुलाकडे लक्ष दिले असते तर... पोलिसांना,एक अनुभव नेहमी येतो, अशा वेळी पालक म्हणतात, आमचा " बाब्या "असा नाही हो! ,.....
तर वाचक हो, सावध व्हा व भोचक व्हा. आणि हटका.
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ

Comments
Post a Comment