मोर्चा कार्यकर्ता व झेंडा.
मोर्चा, कार्यकर्ता व झेंडा.
माझ्या सुजाण व सावध वाचक हो,
घाबरू नका, मी काही राजकारणावर लिहिणार नाहीये,माझा मूळ हेतू व जागरण, समाजकारण हेच आहे. मी पूर्णतः त्या संबंधीच लिहिते व लिहिणार आहे.
प्रथम मी एक माझ्या आयुष्यातील किस्सा सांगते.
मी व माझी मैत्रिण नलिनी आरेकर, मालाडला, "रामलीला प्रचार समितीच्या जागेत, गरजू मुलांसाठी अभ्यास वर्ग सुरू केला, मुले खुशीने येत, अभ्यास मनापासून करीत., जवळपासच्या पाच शाळेतील मुले येत. त्या शाळातून ही त्यांच्या प्रगती बद्दल, आमचे कौतुक झाले. मुलांची संख्या वाढत होती. पहिली ते कॉलेज सर्व मुले येऊ लागली. आणि अचानक एक दिवस फक्त सहावी पर्यंतचीच, मुले हजर, वरच्या वर्गातील मुले मुली गायब. आम्ही दोघी चक्रावलो. चौकशी केली, छोटी मुले सांगू लागली. सर्व वडापावाचा, झेंडा धरायला गेलेत. अरे देवा, म्हणजे मोर्चाला. एक धिटूकली,"आणि. मॅडम, पैसे बी भेटतात.", या निष्पाप पोरांना, मोर्चाचा हेतू माहीत नाही. शिवाय आणखी एक बाब कळली. बहुतेक मुलांना, त्यांचे वडील बरोबर घेऊन जातात. पैसे, बापाकडे, संध्याकाळ सोय. बघा तेव्हा माझे सामाजिक मन जागे झाले. गर्दी जमा करण्यासाठी, हे काही पक्ष लोकांना कसे बिघडवतात, बघा. मग आम्ही, राम लीला कडून (राजस्थानी -आपल्या मराठठी लोकांच्या भाषेत चिक्कू मारवाडी ) मुलांना, पार्ले बिस्किटे दिली जात, त्या बद्दल कधी कधी वडापाव सामोसा किंवा फरसाण देऊ लागलो. मुळात, महत्वाचा मुद्दा असा की, विशिष्ट पक्ष आपल्या फायद्यासाठी, ह्या नकळत्या वयाच्या मुलांच्या, आयुष्याशी व भविष्याशी कसे खेळतात, ते बघा. माझा हे लिहिण्याचा उद्देश, वाचून सोडून द्याव्या, असा नाही. तर तुमच्या कामवालीची मुले, अशी फसत नाहीत ना, ह्याची खात्री करून, त्यांना वाचवा - परावृत करा हो. हीच नंतर स्वतः कार्यकर्ता समजून, शिक्षणापासून drop out होतात. आजूबाजूला जर लक्ष दिलेत व हे छोटेसे कार्य केलेत, तर देवदर्शनाचे पुण्य लाभेल. हं, मी वर "झेंडा"लिहिलेय. हा सिनेमा बघितला का? नसेल तर नक्की बघा. गणेशोत्सवात, उत्साहाने काम करणारी मुले टार्गेट करून पक्ष नेते, त्यांना, आपल्या फायद्यासाठी, कठपुतळीप्रमाणे नाचवतात. मग ना शिक्षण ना जगण्यासाठी मार्ग अशी भरकटतात.
आता ही, हाच मुद्दा मी, तुमच्या समोर का ठेवला. ते सांगते. सध्या, जो मराठी हिंदी शिकवण्या वरून घोळ चालू आहे, त्यातील, दुटप्पीपणा समजून व उमजून घ्या. हा GR प्रथम माळशेकर आयोगाने दिलेल्या रिपोर्टवरून उबाठाच्या काळातच, स्वीकारला आहे. फक्त आत्ताच्या सरकारने, सर्वांच्या पुढे, अशा प्रकारे आणला. एरवी फक्त रहित केला असता, तर जनता म्हणाली असती, हे काय, पूर्वीचे सर्वच नाकाम ठरवतेय, हे सरकार. त्या फेसबुकवर तर सर्वच, स्वतः ला सर्वेशा समजून आगपाखड करीत आहेत. मुळात, तेव्हा सरसकट लागू होणारी हिंदीची सक्ती, या सरकारने, ऐच्छीक केलेय..
खरेच, या सर्व राजकारणापासून, या पौगंडावस्थेतील, मुलांना दूर ठेवायचे तर, हा मोर्चा प्रकार बंद ठेवावयास, हवा, नेत्यांना काही करावयास मुभा आहे. त्यांनी उपाशी रहावे, उन्हात बसावे, नाही तर परिवारासह धरणा धरावा. पटतेय का? आता खालील पोस्ट बघा.
https://www.facebook.com/share/1R51aQwZXi/
तेव्हा सावध मनुजा सावध रे. आपण मध्यम वर्गीय ही, एका अर्थी, ह्याचे शिकार होतोय, कसे ते, उद्या सांगते.
Comments
Post a Comment