papillon म्हणजे फुलपाखरू.
वाचक मंडळी हो, आज मी आधी, "पॅपिलॉन" या शब्दाचा अर्थ सांगते. पॅपिलॉन म्हणजे "फुलपाखरू". एक स्वच्छदी जीव, या फुलावरून त्या फुलावर बागडणारा. याला लहानपणी, त्याच्या चुळबुळ्या स्वभावामुळे, त्याला पॅपीलॉन म्हणत. असा हा मुलगा स्वतःची चूक नसताना, या प्रकारे डांबून ठेवल्यास नशिबाला दोष देत बसणार थोडीच. त्या बेटावर, इतर अट्टल गुन्हेगारांच्यात, त्याचा जीव गुदमरला नाही तरच नवल. त्याने जिवाच्या आंकांताने व चिकाटीने प्रयत्न चालूच ठेवले. Try try and succeed. हे त्याचे तत्व. आणि हो, सुटके नंतर ही संपूर्ण कहाणी आठवून लिहिणे सोपे नव्हते. तेही 600 पाने. आणि कित्येक वर्षे सुशिक्षित समाजापासून दूर जीवन जगलेला, हा जीव. हो, आणि ते सर्व लेखन, त्याच्याच शब्दात वाचणे योग्य. तर कृपया, हे पुस्तक मिळवून वाचाच. तुमच्या आयुष्यात नक्कीच, चांगला बदल घडून येईल, बघा. गंमत म्हणजे, ज्या जजचा बदला घेण्यासाठी, त्याने, हा वर्षच्यावर्षे, घालविली, त्या जजला शोधून, तो,त्याचासमोर गेला, तेव्हा, तिथे म्हाताऱ्या गृहस्थाला पाहून त्याला जाणवले, ह्याच अट्टहासाने, आपल्याला जगवले व तारले.
आणि त्याने हे सर्व लिखाण केले. आणि ते प्रकाशित झाल्यावर, जगाने, त्याला डोक्यावर घेतले. मुबलक पैसा ही दिला. एरवी हा ऐश आराम व सन्मान न मिळता, सामान्य जीवन जगलो असतो. एकदम Soloman सारखे. हो आता ही कविता स्पष्ट करणे, ओघाने आले. कोणाला ही poem आठवतेय कां?
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.
Comments
Post a Comment