Soloman Grandy नर्सरी poem.
24जून 2025. Soloman Grandy.
माझ्या प्रिय वाचक मित्र मैत्रिणी नो.
काल आपण, henry शेरिअर च्या "पॅपी लॉन वरून,
फुलपाखरा प्रमाणे उडत, नर्सरी बडबडगीतावर पोहोचलो. हे व्यक्तीमत्व, अगदी पॅपिलॉनच्या, पूर्णतः विरोधी आहे. कोठे हेनरीचा संकटाला सामोरे जाण्याचा खळखळाटी उत्साह व चिकाटी, तर या सोलोमानचे, मिळमिळीत जगणे. आता ह्याचीही ओळख करून घेऊ या.
जसे आपण, आपल्या दत्तात्रय माऊलीचे, positive व negative गुरू अभ्यासले, तसेच आता आपण पॅपीलॉनला आपला आदर्श गुरू व सोलोमानला, आपला negative गुरू म्हणजे आपले आयुष्य कसे नसावे, हे मानून, चांगले जीवन जगू या.
आता ही कविता नर्सरी rydem म्हणून शिशु वर्गात शिकविली जाते. पण त्यात किती महान आशय दडला आहे याचा विचार कोणी केलाच नाही. असो.
आता मूळ विषय म्हणजे ही कविता आधी वाचू या.
Soloman ग्राउंडया born on Monday
Christened on Tuesday,
Got married on Wednesday,
Fell ill on Thursday,
Got worse on Friday,
Died on Saturday,
And burried on Sunday
म्हणजे जो कोणी एकसूरी आयुष्य जगतो. फक्त आपल्या पुरते बघत जगतो, सोलोमान ठरतो. ना ईर्षा ना स्फूरण ना कोणासाठी काही करणे, थोडक्यात काय जन्मला, म्हणून जगला, मरण आले, तेव्हा मेला. सहावीत, वयाच्या 12व्या वर्षी प्रश्न पडायचा, म्हणजे हा सात दिवसाचा तान्हा बाळ गेला तर त्यात काव्य करण्यासारखे, काय आहे. पण तीच तर मेख आहे. तुम्ही जर किती ही (90वर्षेही) जगला तरी दुसऱ्या साठी सामाजिक कार्य वा आर्थिक उलाघाल वा विशिष्ट निर्मिती न करताच आयुष्य फुकट घालविलेत, तर ते, परमेश्वराच्या लेखी, सातच दिवसाचे जीवन ठरेल.
आपल्यात, एक वचन, रूढ आहे ना कोणाच्या अध्यात ना कोण्याच्या मध्यात. पण हा काही गुण नव्हेच. उलट आजूबाजूला चाहूल घ्या, काही चूकीचे होत असेल तर अडवा. कोणाची फसवणूक होत असेल तर त्याला सजग करा. कोणी लहान. मुलांना वा महिलांना छेडत असेल, तर त्यांना हटका. आणि, " हटके "बना.
असो. ही कविता मोठयासाठी आहे, जसे समर्थ रामदास स्वामी लिखित," मनाचे श्लोक " पण लक्षात कोण घेतो??
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.
Comments
Post a Comment