आनंदाचे वारकरी.

 रसिक वाचक हो, आजही मी आपल्याला, माझ्या खास मैत्रिणीचा, " वारकरी " संबंधी लेख वाचवयास देत आहे.

आनंदाचे वारकरी.

      विठोबा माऊलीच्या ओढीने, पंढरपूरकडे चालणारा वारकरी.

        आनंदी आनंद चोहीकडे, जिकडे तिकडे सगळी कडे. हा अनुभव घ्याव्या, तर विठोबा माऊलीच्या वारीत दिसून येतो. तमाम वारकरी जणू  आनंदाच्या डोही, आनंद तरंग अशा उन्मेष मनी भरलाय असे, मैलोमैल 

पायी पायी चालताना दिसतात.

     आज एक व्हिडीओ पाहिला की,

      पंढरपूर पर्यंत चालत जाऊन, काही कारणाने

 ( बहुदा आजाराने), पोलिसांनी अडवल्यामुळे, त्यालाच, विठ्ठल माऊली मानून पाया पडून, माघारी फिरणारा वारकरी. 

          काय अजब हे रसायन आहे?

          अगदी गाडीने आरामात जाऊन, जर देवाचे दर्शन नाही झाले, तर नाराज होऊन, अगदी नशिबाला दोष देत परत फिरणारे आपण आणि एवढी ओढाताण करून, वेशीवरून हसत मुखाने, देवाचे आभारच मानून, परत फिरणारा असा हा वारकरी.

        मला नेहमीच एक प्रश्न पडतो, एवढी धडपड करत दरवर्षी वारी करणार्यांना, देव देतो तरी काय?

         अनेक वर्षे वारी करूनही, तीच गरिबी, तेच कष्टाचे आयुष्य. कधी समस्त धनिक लोकांनी वारी केलीय? काय कारणाने, "ही अशी" या लोकांना विठुरायाची ओढ असावी? एवढ्या मोठया प्रमाणात, शांतपणे कोणाला ही, काडी इतकाही त्रास न होता, पंढरपूरकडे सरकणारा जमाव. यांची प्रेरणा काय असेल बरे? पोटाला अन्न पाणी असो वा नसो. अगदी आनंदाने,  अतिशय श्रवणीय व भक्तीने ओतप्रोत, अशी भजने गात नाचत, हे लोक वाटचाल करतात. शिवाय मध्येच, अगदी शिस्तीत चालू असलेली "रींगणे ". वेगवेगळ्या गावाकडून आलेले वारकरी -एका ही प्रॅक्टिस शिवाय एकासुरात व एका तालात कसे नाचतात बरे? नवलच आहे ना!

          त्यांच्या या भाबड्या भक्तीने मला नेहमीच मोहित केले आहे. मी काही नास्तिक नाही. परंतु प्रत्येकाची श्रद्धा व श्रद्धास्थाने ही त्यांची वैयक्तिक बाब आहे., आणि ती कोणी कशा प्रकारे ती व्यक्त करावी, ते ज्याने त्याने ठरवावे. मी (सर्वजणच ) खूप अडचणीत असते, तेव्हा मला देवाची मदत हवी असते. धावा केला जातो इतर वेळी... 

             इतर वेळी त्याने जे संकटात असतील, त्यांना मदत करावी. अशा काहींशा आत्म केंद्रित विचाराची, माझी श्रद्धा.

           शक्यतो यशस्वीतेची, सर्व सामान्यांची जी व्याख्या आहे, त्यात बसण्यासाठी धडपड करणारी आणि त्यासाठी देवाच्या मागे लागणारी " मी " व्यक्ती आहे. पण अशा अपेक्षा च्या गर्दीत हरवलेल्या समाधानाकडे, हेतु पुरस्सर दुर्लक्ष करताना, खरोखर हे आध्यात्मिक आनंदी वारकरी मला, एक चमत्कार वाटतात.

           मंजुश्री वैभव.

बघा किती सुंदर लिहिलेय. वारकरींचे जीवन व त्यांना वारीत मिळणारा आनंद, तिच्या बरोबरच आपण ही अनुभवतो. इतकी तिची, भाषा शैली उत्कृष्ट आहे. 

    ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू